॥ अज्ञान ॥
तिर्थयात्रा सर्व करुन आली ।
परी देवाची भेट नाही झाली ।
वेळ आणि अर्थिक वाया गेली ।
व्यर्थ तुझी ही काया झिजवली ।
देव नाही हो कुठे तिर्थस्थानी ।
जेथे जावे तेथे धोंडा-पाणी ।
धंदा मांडला तेथे पुजार्यांनी ।
पावतीविना सोडिना आत कोणी ।
देवा नाही हो गिरी कपारीत ।
तो आहे आपल्याच ह्रुदयात ।
शोधा त्याला आपुल्याच घरात ।
आईवडिलांच्या शुध्द स्वरुपात ।
आला आजार भगताकडे गेला ।
लिंबू देऊन चमत्कार केला ।
राख ताबीत घेऊन घरी आला ।
काय म्हणावे ह्या अज्ञानाला ।
अस्वलाच्या एका केसावरी ।
म्हणे सामर्थ्य आहे तेथे भारी ।
ते अस्वल असते त्याच्या करी ।
मग तो का हिंडतो दारोदारी ।
कोणी काढती फुले हातातुन ।
कोणी काढती साखर मातीतुन ।
लोक भूलती पाहुन चमत्कार ।
तेथेच करिती साष्टांग नमस्कार ।
जर का फुले निघती हातातुन ।
बागा कशाला फुलविल्या शेतातुन ।
मातीतुन जर का निघती साखर ।
पर्वत रांगा ना दिसती भूमीवर ।
कोण काढील अज्ञान मुळातुन ।
अंधश्रध्देच्या मल्लीन गाळातुन ।
सद्गुरु काढतील वर तळातुन ।
निरुपणाच्या शुध्द जळातुन ।
💬 प्रतिसाद
न
नरेश_
Sun, 04/14/2013 - 13:50
नवीन
आवडली कविता :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 04/14/2013 - 15:53
नवीन
>>>निरुपणाच्या शुध्द जळातुन ।
हे शब्द थोडे गोंधळवत आहेत.
'निरुपणाच्या शुद्ध जळाच्या तळातून सद्गुरु वर काढतील' असा अर्थ लागतोय असं मला वाटतं.
'सद्गुरु काढतील खोल तळातून, अज्ञानाच्या घोर तमातून' असं किंवा तत्सम केलं तर?
कविता छान. योग्य संदेश पोचवणारी.
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Mon, 04/15/2013 - 08:12
नवीन
बदल सुचविल्याबद्दल आभार
- Log in or register to post comments