पाळ्णा
गुढीपाडवा सण पहिला ।
गुढी उभारुन साजरा केला ।
नविन वार्षास प्रारंभ झाला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
दुसरा सण व्यासपौर्णिमा ।
सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा ।
त्रीजगती नाही उपमा ।
ये श्री दत्ता ये ये ॥
तिसरा सण पंचमी आली ।
नागराजाची पुजा ही केली ।
झोका खेळाया जमल्या मुली ।
ये श्री दत्ता ये ये ॥
चौथा सण रक्षाबंधन ।
भाऊरायाला राखी बांधीन ।
आई बाबांना प्रथम वंदन ।
ये श्री दत्ता ये ये ॥
पाचवा सण गोपाळ काला
गोप्गोपींचा मेळा जमला
हांडी फोडण्या त्वरे निघाला
ये श्री दत्ता ये ये ॥
सहावा सण श्रावण पोळा ।
बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा ।
शेतकरीदादाला आनंद झाला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
सातवा सण गणेश चतुर्थि ।
स्थापना करुन श्रींची मुर्ती ।
सकाळ संध्याकाळ गाऊ आरती ।
ये श्री दत्ता ये ये ॥
आठवा सण पित्तर पाठ ।
पंचपक्वानांच करुन ताट ।
स्वर्गीच्या पितरांची पाहूया वाट ।
ये श्री दत्ता ये ये ॥
नववा सण दसरा आला ।
लहान थोरंना आनंद झाला ।
सोने वाटुन साजरा केला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
दहावा सण आली दिवाळी ।
दारात काढून छान रांगोळी ।
दिप लाऊन रोज ओवाळी ।
ये श्री दत्ता ये ये ॥
अकरावा सण दत्तजयंती ।
काय वर्णावी त्याची महंती ।
स्मरण मात्रे अवगुण जाती ।
ये श्री दत्ता ये ये ॥
बारावा सण आली ही होळी ।
समस्तांचे अवगुण जाळी ।
नैवेद केला पुरणपोळी ।
ये श्री दत्ता ये ये ॥
असे आपुले विविध सण ।
भारतमातेची वाढवी शान ।
पाळणा लिहीतो कवी भगवान ।
ये श्री दत्ता ये ये ॥
💬 प्रतिसाद
श
शुचि
गुरुवार, 04/11/2013 - 08:52
नवीन
अहो पण पाळण्यात जोजवतात ना देवाला? मग "ये ये" कसे?
- Log in or register to post comments
ल
लीलाधर
गुरुवार, 04/11/2013 - 09:01
नवीन
चित्र आंजावरून साभार.......

- Log in or register to post comments
प
पक पक पक
Fri, 04/12/2013 - 04:57
नवीन
चचा तुझ्या नव्या बारश्याचा एक फोटो टाक ना... ;)
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Fri, 04/12/2013 - 11:07
नवीन
देवाला जोजवायच नसतं; देवाला बोलवायच असत,हे देवा तु नामरुपाने नेहमी माझ्या मुखात ये,माझ्या स्मरणात ये,माझ्या प्रतेक कर्मात ये म्हणून ये ये.
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 04/18/2013 - 21:40
नवीन
हे पाळणे कृपया पहावे.
- Log in or register to post comments