Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

रायआवळ्याचा चटका

अ
अनन्न्या
Tue, 04/09/2013 - 09:58
या उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते. हे रायआवळ्याचे झाड पहा कसे बहरलेय!! aavla या रायआवळ्याचा चट्का फार रुचकर होतो. साहित्यः चाळीस आवळे, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार, फोड्णीचे साहित्य. sahitya कृती: रायआवळे धुऊन बीच्या बाजूचा भाग चिरून घ्यावा. मिरच्या धुऊन मिरच्या व चिरलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरवर फिरवून घ्यावे. आवळ्यांच्या प्रमाणात तुम्हाला पाच सहा मिरच्या कमी वाट्तील पण मी गावठी मिरच्या वापरल्या आहेत त्या खूप तिखट असतात. नेहमीच्या लांबड्या मिरच्या कदाचित जास्त लागतील. वाटलेल्या मिश्रणात साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. वाट्ताना साखर किंवा मीठ घालू नये. आवळ्याला पाणी सुटून चट्का पातळ होतो. एक चमचा तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार झाल्यावर चटक्याला द्यावी. आंबट, गोड, तिखट असा जिभेला चव आणणारा चट्का तयार!! हा चटका फ्रिजमध्ये दोन तीन दिवस टिकतो. याशिवाय या आवळ्याचे सरबत छान होते. नेहमीच्या खोबय्राच्या चटणीत आंबटपणासाठी हा आवळा वापरला तर ती चवही वेगळी लागते. याशिवाय रायआवळ्याचे आणखी काही प्रकार होत असतील तर जरूर शेअर करा. आमच्या बागेत खूप आवळे लागलेत. वर फोटो पाहिलात ना! chatka

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9203 views

💬 प्रतिसाद
आ
आदूबाळ Tue, 04/09/2013 - 10:43 नवीन
भारीच! मिठाऐवजी शेंदेलोणाने जास्त चांगली चव येईल असं वाटतं...
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना Tue, 04/09/2013 - 10:59 नवीन
तोंपासु...झकास!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 04/09/2013 - 11:02 नवीन
चटका.....चटका लावुन गेला. ब्येस्ट तोंडिलावणे
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/09/2013 - 11:02 नवीन
का आठवण काढलीत? आता इथे आवळे कुठे शोधू? भले मोठ्ठाले कोहळे मिळते पण ते देऊनही औषधालाही आवळा मिळायचा नाही. :(
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/09/2013 - 11:07 नवीन
चटकदार एकदम. तोंपासू.
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Tue, 04/09/2013 - 11:11 नवीन
मस्तच. फोटो आणि रेसिपी दोन्ही छान. :)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 04/09/2013 - 11:38 नवीन
तो.पा.सु.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/09/2013 - 11:44 नवीन
चटका राहू देत, राय आवळे खायला येतेच २ दिवसांत!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 04/09/2013 - 15:06 नवीन
नक्की ये.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 04/09/2013 - 14:22 नवीन
चटकदार पाकृ :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 04/09/2013 - 14:30 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 04/09/2013 - 15:25 नवीन
आईग्ग्ग्ग्ग.... स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स... ते आवळे बघुनच तोंडाला पाणी सुटले.. लहान असताना खुप खाल्ले होते हे आवळे. मस्त लागेल चटका. यम्म यम्म...
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/09/2013 - 15:40 नवीन
कोंकणाची पुन्हा एकदा तीव्र आठवण करुन दिलीत. हे आवळे पिकून आंबटगोड झाले की काय टेसदार बनतात.. वा.. त्या तुरट अन्य आवळ्यांना ती चव नाही. पण अजूनही डोंगरी आणि राय या आवळ्यांच्या नावांविषयी माझा गोंधळ होतो. उपरिनिर्दिष्ट आवळे हे मी आपले रत्नांग्रीचे आवळे म्हणून ओळखतो. शिवाय याच्च आवळ्यांची "शिंपटी" आठवते का कुणाला ? अय्याई ग...!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/09/2013 - 15:49 नवीन
च्यायला!!!! आता हे आवळे हुडकणे आले. तोंडात उचंबळणार्‍या कारंज्यांनो, जरा शांत रहा!! :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/09/2013 - 15:52 नवीन
हम्म्म! आवडला 'चटका' -आडनाव आवले असताना आवळे झालेला प्यारे१
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 04/09/2013 - 16:46 नवीन
आईशप्पथ ! :( अ‍ॅड्रेस्स दीयु का ?? आवळे पाठव्तिस का ??? लै खाऊ वाटताइत :( काल मला कच्ची कैरीपण खौ वाटत होती :-/ मिपावरची नै बर्का :D
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/09/2013 - 17:21 नवीन
हार्दिक अभिनंदन पूजातै!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 04/09/2013 - 17:28 नवीन
ओ प्यारे काकु ... कै पण कै :-/
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 04/09/2013 - 18:35 नवीन
आयला, तो पहिला फोटोच इतका चटका लावून गेला की पुढलं वाचणं/पहाणं अशक्यच झालं!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/09/2013 - 18:54 नवीन
मी लहान असतांना या आवळ्यांचे झाड माझ्या मित्राच्या घरी होते. फारच खास वाटायचे हे आवळे पाडून खायला. त्यांना रायआवळे असे म्हणतात हे प्रथमच कळले. त्यानंतर कधीही हे आवळे पुन्हा दिसले नव्हते. पाककृतीही रोचक वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 04/09/2013 - 20:31 नवीन
मस्तच !!
  • Log in or register to post comments
N
nishant Wed, 04/10/2013 - 10:59 नवीन
मस्त चट्कदार ...!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 04/10/2013 - 11:04 नवीन
आई गं........कस्लं पाणी सुटलंय तोंडाला .... !! माझ्या आईकडे मोठं झाड होतं रायआवळ्याचं :) ए रायआवळे जर मिळाले नाही तर साधे आवळे घेऊन पण चव तशीच लागेल का गं ?
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 04/10/2013 - 11:46 नवीन
आवडला चटका :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/10/2013 - 14:41 नवीन
मस्त हं. आवडल्या गेलं आहे. झाडाला लगडलेल्या रायआवळ्याच्या पहिल्याच चित्रास पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 04/10/2013 - 14:55 नवीन
नाहीतर फोटु पाहून समाधान!! हा फोटो सानिकामुळे पोहोचला तुमच्यापर्यंत्, कारण एकापेक्षा जास्त फोटो लोडवता येत नव्ह्ते मला!! सर्व तोंपासुंचे आभार!!
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/11/2013 - 08:40 नवीन
मार डाला!!!
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर गुरुवार, 04/11/2013 - 10:27 नवीन
मस्तच ग अनन्या..
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 04/11/2013 - 10:53 नवीन
पहिला आणि दुसरा फोटो पाहूनच तोंडाला इतकं पाणी सुटलं ना... आता हे आवळे कसे मिळवायचे ते सांगा!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/11/2013 - 13:18 नवीन
किती खायचो लहाणपणी! आता नावालाच काय पण पहाय्लाही मिळत नाही. चटका वाचताना चटका लागला बघ मनाला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/11/2013 - 14:25 नवीन
हा...य!!! Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 04/11/2013 - 15:16 नवीन
आवळ्यांसाठी लटकू नका!! कोण काढून टाकिल ही पोस्ट? उगाच पाडव्याच्या दिवशी लट्कवल्याचे पाप!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/11/2013 - 15:50 नवीन
@कोण काढून टाकिल ही पोस्ट? उगाच पाडव्याच्या दिवशी लट्कवल्याचे पाप!>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :D :D :D ...शॉलीईईईईईईईईईईईईई.......... =)) हम्कू भावना व्यक्त करने कू ऐसाइच होता है, क्या करें??? =))
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 04/12/2013 - 10:23 नवीन
खरोखरचा चटका बसला राव...तोंपासु
  • Log in or register to post comments
ज
जागु Sun, 04/14/2013 - 21:10 नवीन
आहाहा मस्तच.
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Mon, 04/15/2013 - 10:42 नवीन
आवडला चटका
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा