॥ पगाराचा दिवस॥
पहिल अगदी बर होत
हातात पगार मिळत होता
किती मिळाला पगार
तिथल्या तिथ कळत होता
पगाराचा दिवस तो
सर्वांनाच प्यारा होता
हातात पगार घेण्याचा
आनंदच न्यारा होता
पगाराच्या दिवशी
दांडीबहाद्दर पण यायचे
पगाराच्या रांगेमध्ये
पुढे ऊभे रहायचे
बायको पण विचारायची
झाला का हो पगार?
आणला आहे घरी की
खेळलात सर्व जुगार
मुलांना खाऊ आणायची
हौस तुमची फिटली
स्वतःसाठी मात्र
आणली असेल बाटली
आता मात्र तसे नाही
ईसीएसने पगार जातो
आपापल्या बँकेत
खात्यावरती जमा होतो
कधी जातो कधी घेतो
ते पण कळत नाही
हातात पगार घेण्याचे
समाधान मिळत नाही
💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर
Sun, 04/07/2013 - 09:37
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 04/07/2013 - 13:19
नवीन
स्व. किशोरकुमार यांचे 'आज पहली तारीख है..' आठवले.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Sun, 04/07/2013 - 13:32
नवीन
मस्त ! एक्दम झक्कास, खुप आवड्ले.. :)
- Log in or register to post comments
द
दादा कोंडके
Sun, 04/07/2013 - 14:14
नवीन
पगार हातात घ्यायचा,
आनंद मिळवता येतो,
ब्यांकेत जमा झाला की,
तो काढून घेता येतो...
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 04/07/2013 - 14:50
नवीन
आभारी आहोत
- Log in or register to post comments