ब्रोकोली टोमाटो सूप
साहित्य :३-४ ब्रोकोली चे दाठी सकट मध्यम तुकडे , १ लहान किवा मोठा असेल तर अर्धा टोमाटो , १ लहान चमचा आले लसुन पेष्ट , एक तमाल पत्र ,अर्धा लहान चमचा मिरी पावडर , एक मोठा चमचा कांदा पेष्ट किवा लहान कांदा बारीक चिरून , मीठ , एक मोठा चमचा साजूक तूप, एक चमचा जिरे चिमुट भर हिंग.
कृती : सर्वात आधी एक भांड्यात ब्रोकोली , टोमाटो , तमाल पत्र आणि जर चिरलेला कांदा वापरात असले तर कांदा(कांदे चे चिमुट भर तेल वर परतून केले ले पेष्ट वापरले मी ) हे सर्व १-१/२ गिलास पाणीत ७-८ मिंट उकडून घ्यावे.नंतर मिश्रण गार झाले कि मिक्सर मधून त्याचे पाणी सकट वाटून घ्यावे.आता पैन मध्ये एक लहान चमचा तूप गरम करून त्यात हिंग जिरे ची फोडणी करावी आणिक आले लसुन पेष्ट परतून त्यात वाटण , मिरे पूड , चवीनुसार मीठ घालून परत एक उकडी आणावी.नंतर गरम गरम सूप वर कोथिम्बिर पेरून सर्व करावे .
मी करून बघितले, छान वाटले मन्हुन टाकले इकडे हे पोस्ट. आपण पण करून पहा आणि हो मी फोटो काडहाय ला विसरते कारण करता न लक्षात राहत नाही कि हे पोस्ट करणे आहे ;)पण खात्री आहे सर्वाना आवडेल .
- ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे (देठांसहित) - ३ ते ४
- लहान टोमॅटो - १ (मोठा असल्यास अर्धाही पुरेल)
- आले-लसूण पेस्ट - १ चहाचमचा
- तमालपत्र - १
- मिरपूड - १/२ चहाचमचा
- कांद्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा - १ मोठा चमचा
- जिरे - १ चहाचमचा
- तूप - १ चहाचमचा
- हिंग - चिमूटभर
- मीठ - चवीप्रमाणे
- कोथिंबिर
कृती - सर्वप्रथम एका पातेल्यात ब्रोकोली, (चिरलेला ? ) टोमॅटो, तमालपत्र अन कांद्याची पेस्ट (कांदा चिरलेला असल्यास किंचित तेलावर परतून घ्यावा) घेऊन त्यात १ ते दीड पेला पाणी घालून ७ ते ८ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. हे मिश्रण गार झाले की मिक्सर मध्ये पाण्यासकट वाटून घ्यावे. यानंतर एका कढईमध्ये एक चहाचमचा तूप गरम करून त्यावर हिंगाची व जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात आले-लसुणाची पेस्ट परतून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमधे वाटून घेतलेले मिश्रण व चवीनुसार मीठ घालावे. कढईवर झाकण ठेवून एक उकड येऊ द्यावी. त्यानंतर या गरमागरम सुपावर आवडीप्रमाणे कोथिंबीर पेरावी. गरमागरम ब्रोकोली टोमॅटो सूप चिनिमातीच्या वाडग्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठी तयार!!