Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

भानोळी

स
साबुदाणा खिचडी
गुरुवार, 04/04/2013 - 02:14
a बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या नारळाचे दूध - १ वाटी मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे २ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी) सोडा चिमूटभर तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला - १ चमचा हळद - १ चमचा धणे-जीरे पूड - १ चमचा मीठ व साखर चवीनुसार तेल - ४ चमचे भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात. रात्रीच्या जेवणात अथवा जेवणाऐवजी हा पदार्थ खाऊ शकतो. कृती - चिरलेला कोबी, वाटण, अंडी, तिखट, मीठ, हळद, धणे-जीरे पूड, २ चमचे तेल व साखर एकत्र करुन घेऊन त्यात डाळीचे पीठ व चिमूटभर सोडा घालावा. वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पीठासारखे भिजवावे.पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम. गरमागरम भानोळी सर्व्ह करावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11560 views

💬 प्रतिसाद
र
रेवती गुरुवार, 04/04/2013 - 02:32 नवीन
पदार्थ छान दिसतोय. अंडे न घालता पदार्थ करायचा असेल तर सोड्याचे प्रमाण वाढवावे लागेल ना? (ही चेष्टा नाही). हे एक छान तोंडीलावणे वाटते आहे. हांडवो नावाच्या पदार्थाची आठवण आली.
  • Log in or register to post comments
स
साबुदाणा खिचडी गुरुवार, 04/04/2013 - 02:38 नवीन
अगदी बरोब्बर. सोडा वाढव फक्त.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/04/2013 - 03:22 नवीन
फोटो एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 04/04/2013 - 06:09 नवीन
किती तो गोंधळ... मला वाटलं की "भानोळी" ने " साबुदाणा खिचडी" बनवली आहे.. डोक्यात घोळ झालाय सगळा... अवांतर... पाककृती छान आहे!! एक्दम वेगळंच काहीतरी..!!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/04/2013 - 10:03 नवीन
सहमत !!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 04/04/2013 - 07:28 नवीन
मस्तच पाकृ! वाचनखुणेत टाकला आहे. भानोळी हे नाव पण भारी आहे. काहीतरी जादूटोणा केल्यासारखं वाटतं...
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 04/04/2013 - 08:02 नवीन
नाव वाचुन वाटल कि घावन वगैरे सारखा तत्सम पदार्थ असेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/04/2013 - 08:21 नवीन
जबर्‍यादस्त एकदम !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 04/04/2013 - 08:22 नवीन
काय मस्त फुललीये केकसारखी. मी हा पदार्थ भानोले म्हणून पाहिलाय. पण इतका फुललेला कधी पाहिला नाही. कदाचित अंड्यामुळे असेल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/04/2013 - 08:29 नवीन
अंड न घालता करता येते का? :D
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 04/04/2013 - 09:10 नवीन
कोबीचे भानोले मस्तंच हे अंडे ही घालून बनवु शकतो माहित नव्हते, आता ट्राय करुन बघीतले पाहीजे. भानोले एकदम टम्म फुगले आहे :) अवांतरः फ्रिटाटासारखे वाटत आहे ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 04/04/2013 - 09:24 नवीन
आवडता पदार्थ. आजीच्या हातच्या गरमा गरम भानोळ्यांची आठवण करुन दिलीत.
  • Log in or register to post comments
श
श्रिया गुरुवार, 04/04/2013 - 12:00 नवीन
भानोळी अजून खाल्ली नाहीत. पण पाककृती आवडली, करून बघेन.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले गुरुवार, 04/04/2013 - 12:00 नवीन
पाकॄची कॄती संपवायची खूपच घाई केलीत, थोडे सविस्तर लिहायला हवे होते पसरट भांड्यात तेल सोडून, भांडे किंचित गरम करून त्यात मिश्रण ओतावे. गॅसवर १५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. ओव्हन असल्यास उत्तम बाकी पाकॄ छानच आहे
  • Log in or register to post comments
त
तर्री गुरुवार, 04/04/2013 - 12:06 नवीन
पाकृ आवडली . नुसतीच खायची की सॉस ,चटणी कश्याला लावून खायची ? की भानोळी ला लावून पोळी - चपाती - भाकरी खायची ? <कशाला तरी काही तरी लावून खायला हवेच का ? >
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 04/04/2013 - 12:54 नवीन
मस्त आणि नविन ! चवीला चांगले असेल असे वाटते :)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/04/2013 - 14:27 नवीन
सर्वांचे प्रतिसादांकरता आभार. आईंनी (सासूबाई= सा.खि.) काल बनवली. मी सॉसबरोबर खल्ली. अतिशय चविष्ट झाली होती. पण नुसतीही मस्त लागते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/04/2013 - 23:49 नवीन
"कोलंबी किंवा करंदीचीही" करता येते, "आलं+लसूण+मिरची+कोथिंबीर वाटण" वगैरे प्रकार वाचून संशय आलाच होता!!!! आयला, गेल्या पंचवीस वर्षांत आमचा अभ्यास काय सुसाट वाढलाय!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 04/05/2013 - 12:27 नवीन
ओह, आत्ता लक्षात आले की तू का आभार मानते आहेस! मज्जा आहे तुझी :) साखिकाकू, इधर भी आना देव भानोली आणि काय काय पदार्थ! ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 04/04/2013 - 18:41 नवीन
खूप छान दिसते आहे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 04/04/2013 - 19:19 नवीन
मस्त दिसते आहे भानोळी... थोडेसे हांडवो सारखेच वाटते.. पण मी अंडे न घालता करुन बघेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2013 - 21:15 नवीन
काय काय नवीन नवीन रेशिप्या यायलागल्यात मिपावर. एकसे बढकर एक. काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे की काय? शुचिमामीच्या मामींना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/04/2013 - 21:42 नवीन
काय अंतर्गत स्पर्धा वगैरे आहे की काय?
काय रे कळ लावणार्‍या नारदा?
शुचिमामीच्या मामींना धन्यवाद
=)) =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2013 - 21:53 नवीन
कळ लावणार्‍या नारदा
कशाला उगीच दुसर्‍याच्या पदव्या मला? :( मी तुमच्या घरातल्या स्पर्धेविषयी थोडेच म्हणले ;) मिपावरच्या सगळ्या मास्टरशेफांना उद्देशून म्हणले.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 04/04/2013 - 21:58 नवीन
>>> मास्टरशेफांना नि शेफा''लिनापण!('र' टाकावा काय मध्ये? ) ऊत ऊत आणलाय रे नुसता! ;) पण मामीच्या मामींना सूट देऊ. रच्याकने साबुदाणा खिचडी उद्या बोंबिल फ्राय नायतर खेकड्याचं सूप करणार नाहीत ना? ;)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/04/2013 - 22:39 नवीन
प्यारे तुम्ही नाही नाही त्या पदर्थांची नावं घेऊन छळू नका. इथे ना बोंबील मिळतात न खेकडे. :(
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/05/2013 - 18:30 नवीन
बोंबलाचं माहिती नाही कारण ते फक्त भाग्यवंतांनाच मिळतात, पण खेकडे इथे नक्की मिळतात आणि तेसुद्धा विविध प्रकारचे!!! शोधा म्हणजे सापडतील!! (या वीकेंडचा शुचिचा गृहपाठ!!!) :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/05/2013 - 18:35 नवीन
पिडां, डेलावेअरला असताना खूप म्हणजे चिक्कार चिक्कार खेकडे (चिंबोर्‍या) खाल्ले हो. पण इथे विस्कॉन्सिन ला नाही ना दिसले (सुपिरीअर मध्ये तरी) इथे तो वालाय मासा मिळतो. तो खायचाय.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/05/2013 - 18:44 नवीन
अरेरे!! :( (आणखी काय बोलणार? एक मिनिट शांत उभा राहिलो आहे!!!)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 04/05/2013 - 05:43 नवीन
पाकृ आवडली. नक्कीच करून बघणार. मला त्या ताटली खाली जे काय क्रोशाचं टाकलय .. तेही खूप आवडलं रंगीबिरंगी!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/05/2013 - 14:22 नवीन
ते विकतचं आहे :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 04/05/2013 - 14:08 नवीन
मस्त दिसतेय भानोळी. खरच आणखी असे वन डिश मील पदार्थ येउ देत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 04/05/2013 - 17:29 नवीन
माझ्याकडे "सी के पी खासीयत" असे एक पुस्तक आहे. त्यात ही पाकृ वाचली होती. पण आज फोटो पाहिल्यामुळे करू शकेन असे वाटत आहे. शुचे, तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप पारंपरिक पाकृ असतील. सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे. अधून मधून अशा पाकृ देत जा.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/05/2013 - 17:44 नवीन
सी के पी लोकांकडचे जेवण अतिशय टेस्टी असते असे ऐकले आहे.
आजवर कधीच खायची संधी मिळाली नाही, जरा आश्चर्यच वाटले...
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 04/05/2013 - 19:14 नवीन
माझे नातेवाईक, मैत्रिणी कोणीच सी के पी नाही! :(
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 04/05/2013 - 19:21 नवीन
यापुढे मिळावेत यासाठी शुभेच्छा!! तुमच्या या प्रतिसादामुळे फार पूर्वी खालेल्या पदार्थांच्या चवी आठवल्या :-). आजकाल घरोघरी टिपिकल चवी असतीलच असे काही राहिले नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/05/2013 - 17:47 नवीन
तुझ्या सासूबाईंकडे अशा खूप पारंपरिक पाकृ असतील त्यातल्या शाकाहारी पाकृही येऊद्या!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/05/2013 - 18:03 नवीन
अगं आमची खिचडी आहे. आई कोब्रा, बाबा सी के पी अन सासूबाई दैवज्ञ (सोनार). :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 04/05/2013 - 18:16 नवीन
मग तर तुला असे काही काही बघायचा आणि करायचा अगदी भरपूर चान्स आहे!!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/05/2013 - 18:22 नवीन
आई खूप चविष्ट कोशींबीरी अन चटण्या , मसालेभात आदि करते. सासूबाई पाया, मटण, मासे, चिकन फार सुरेख बनवतात. हे सगळं शिकायचय :(
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर गुरुवार, 04/11/2013 - 10:32 नवीन
खाल्ले होते आगोदर. पाहून आठवण झाली.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/11/2013 - 17:19 नवीन
कोसळवडीची रेसिपी माहितीये का हो शुचिमामीच्या मामी? (तूरडाळीची करतात ती? इफ आयाम नॉट राँग)
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 04/11/2013 - 17:44 नवीन
विचारते आईंना.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा