संकल्प
मृत्यु हा अंतिम नाही ,नंतरही करता येते बरेच काही,
करोनी डोळे दान अंधांची वाढवावी शान,
कुणा द्यावे चाम ,जळलेल्या चे होईल काम,
किडनी द्यावी कुणा,आयुष्य जगेल दुणा,
दान करोनी वेगवेगळे भाग,वाचवावे जिवलग,
करोनी शरीर दान मेल्यावरही व्हावे महान ,
करा मनाचा कायाकल्प ,धरा मनी देह दाना चा संकल्प.
💬 प्रतिसाद
B
Bhagwanta Wayal
Wed, 04/03/2013 - 07:28
नवीन
संकल्प चांगला आहे.
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Wed, 04/03/2013 - 15:03
नवीन
छान आहे..
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 04/07/2013 - 13:23
नवीन
??? मनाला पण काया असते ? चान चान .
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sun, 04/07/2013 - 13:48
नवीन
वावा चान चान.. मी पण, मी पण
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 04/07/2013 - 14:46
नवीन
कवितेतून व्यक्त झालेली सद्भावना ही काळाची गरज आहे. हा विचार (आणि त्या पाठून येणारा आचार) जनमानसात रुजावा हीच इच्छा.
शब्दांची निवड करताना आणि भावना काव्यात मांडताना किंचित घाई झाल्यासारखे वाटते आहे. थोडा जास्त विचार करून, अजून चांगली शब्दरचना करायला हवी होती.
दोन डोळे, दोन किडण्या, स्वादूपिंड, हृदय, त्वचा दान करून एका व्यक्तीकडून, एका देहातून ७ जणांना नवजीवन प्राप्त होते. हे धन जाळून किंवा पुरून टाकू नका असा विचार अजून कांही कडव्यांमधून प्रभावीपणे पुढे यायला हवा होता. असो.
- Log in or register to post comments