Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नायक क्रमांक एक

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 04/02/2013 - 12:47
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे) सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक , धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जरासा टेक, (सुरुवाती पासून सगळे २ वेळा म्हणावे) तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, हेSSS तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ|| (नायिकेने जवळपास असलेला एखादा खांब पकडुन जोरजोराने कंबर हलवत,( खांब न पाडता), नायिकेने वरील ओळी म्हणाव्या. या वेळेला नायकाने चेहर्‍यावर कॄध्द भाव ठेवुन अंगाला वेडे वाकडे झटके देत रस्त्याने चालावे. झटके देताना पायातल्या चप्पल उडणार नाही अशा बेताने झटके द्यावे. (चप्पल उडाली किंवा खांब पडला तर रीटेकचे पैसे नायक किंवा नायिकेच्या मानधनातुन कापुन घेण्यात येतील.) मधेच नायिके कडे रागा रागाने पहावे. संपूर्ण गाण्यात नायिकेच्या चेहेर्‍यावर नम्र भाव आसावे. रस्त्यावरचे लोक आपल्या कडे कुचेष्टेने बघतील पण त्या कडे दुर्लक्ष करावे. (मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे हे लक्षात आले की आपोआप निघुन जातील) येथे टेक हा शब्दाचा मराठी अर्थ गॄहित धरुन त्याप्रमाणे अभिनय करावा) (यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता) सोनू तू माझा नायक रे, वेड्या सारखा वागु नको स्वप्नामधल्या राणीला दूर असा तू लोटू नको वाईट राग, झटकुन टाक, देईन तुला मी चॉकलेट केक, ||१|| तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,हेSSS तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, (रस्त्यावरुन जर पी.एम.पी.एम.एल. ची बस जात असताना शक्यतो वरील कडव्याचे चित्रीकरण करावे. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर ला पटवुन सिनेमात नाचायला घेतो असे सांगुन अडकवुन ठेवावे. म्हणजे बराच वेळ बस चित्रीकरणासाठी उपलबब्ध राहील. जर त्यांनी फारच आग्रह केला तर (कॅमेरा सुरु न करता) दोनतीन वेळा त्यांना कॅमेर्‍या समोर नाचायला लावावे. नंतर एडिटरने कट केले असे सांगता येते. चालु बस समोर नायक नायिकेने योग्य अंतर राखत, (स्वतःच्या जबाबदारीवर) नाचावे. चॉकलेट केक दाखवण्या साठी जवळच्या बेकरी मधुन एक वाटी केक नायकाला आणायला सांगावा. जर नायकाने त्याचे पैसे दिले नाही तर नायिकेने तो केक नुसताच त्याला दाखवुन परत दिग्दर्शकाकडे जमा करावा किंवा शुटींग संपल्यावर बेकरीवाल्याला तो परत करावा, असे केल्यास केकचे पैसे नायिकेच्या मानधनातुन वळते करावे.) (यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता) मन माझे करते बंड, पण तु गोळ्यासम थंड, ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड, झाले गेले विसरुन दोघे, आता गाठु पाषाण लेक, ||२|| तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक,,हेSSS तु माझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, (यानंतर संगीताचा एक तुकडा वाजेल. तो वाजत असतानाही नायक नायिकेने नॄत्य करायच आहे. आपले ओठ न हलवता) (कात्रजच्या किंवा पाषाणच्या तलावाच्या काठी किंवा नदिकाठच्या रस्त्यावर वरिल कडव्याचे चित्रीकरण करावे. एखाद्या बाकड्यावर किंवा हातगाडीवर नायकाने झोपावे व नायिकेने कडव्याला सुरुवात करावी. नाचता नाचता मधेच नायकाच्या छातीवर तीन वेळा डोके अपटावे. डोके आपटताना जवळुन व हळुच अपटावे. डोके आपटायला नायिका जर लांबुन धावत येताना दिसली तर नायकाने झटकन बाजुला व्हावे. वरील कडव्यात अंड दाखवताना ते उकडुन घ्यावे. म्हणजे खाली पडले तरी लगेच फुटून वाया जाणार नाही. चित्रीकरण संपल्यावर दिग्दर्शकाकडे अंडे जमा करायची जबाबदारी नायिकेची असेल. दिग्दर्शकाने अंडे व केक चा हिशोब आम्हाला स्वतंत्र पणे द्यावा) सोने कसला महाग आहे, सोन्या सारखा तुझा मेक , धडधडते माझे हॄदय, ऐकण्या साठी जराशी टेक, मी तुझा (५ वेळा म्हणावे) नायक क्रमांक एक, ||धॄ|| (संगीत पूर्ण संपेपर्यंत नायक नायिकेने नॄत्य करत रहावे) (वरील कडवे नायकाने म्हणायचे आहे. हे कडवे म्हणताना त्याने स्वतःचा शर्ट अंगातुन काढुन तो डोक्यावर अडकवत नाचायचे आहे. नायकाने बनियन घातला आहे की नाही ते चित्रीकरण सुरु व्हायच्या आधी तपासुन घ्यावे. उगाच त्या सलमान सारखी चित्रीकरण चालु झाल्यावर फजिती नको. बनियन फारच पिवळा पडला असेल किंवा बीनबाहीचा असेल तर शर्टकाढणे रद्द करावे. त्या ऐवजी खिशातुन रुमाल काढुन तो डोक्यावर ठेवावा. चेहर्‍यावरचे कॄध्द भाव आता नकोत. त्या ऐवजी नायिके कडे हसुन पहात तिच्याशी प्रेमाचे चाळे करत गाणे म्हणावे. नायिकेची आई आमच्या शेजारच्या चाळीतच रहाते याचे नायकाने भान ठेवावे. शेवटचे "मी तुझा (५ वेळा)" म्हणताना जोरजोरात कंबर हलवावी. )

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12013 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 04/02/2013 - 12:50 नवीन
आमच्या सुचनांसकट प्रसिध्द झाले चुकुन. वाचकांनी सुचना वाचु नयेत फक्त गाण्याचा आस्वाद घ्यावा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 04/02/2013 - 13:30 नवीन
रोसेश साराभाईच्या कवितांची आठवण झाली...:)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 04/02/2013 - 13:38 नवीन
हा, मै भी लुक्खा हुं (
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/02/2013 - 15:04 नवीन
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/02/2013 - 15:59 नवीन
शिशुवर्गाच्या ग्यादरींगची आठवण झाली. ;) पोरांपेक्षा बाईच भारी उत्साहात असतात. (हे अवांतर आहे.)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 04/02/2013 - 16:07 नवीन
=)) पैबू काका मज्जा आली . :D
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/03/2013 - 02:51 नवीन
लै भारी हो पैजारबुवा. ऑडिशन वगैरे कधी झाले?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 04/03/2013 - 05:32 नवीन
नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 04/03/2013 - 19:58 नवीन
हिहिहि पैबू काका इथल्या संपादकांच्या यादीत बगा कोण भेटतीयेका ??? खलनैका हो = ))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 04/03/2013 - 21:34 नवीन
हिरवीनचे नाव कळाल्यास आगामी मिपाम्यान म्हणून ब्याटम्यान हे नांव पुढे करत आहे. लै अ‍ॅक्टीव्ह हाय पोरगं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 04/04/2013 - 20:04 नवीन
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/05/2013 - 07:18 नवीन
तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 04/05/2013 - 21:16 नवीन
:-/ :-/
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 04/04/2013 - 11:57 नवीन
ए कोण गं? कोण गं? मला सांग ना. -(पूजाच्या सासूबैची मैत्रीण) माउ :P
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 04/04/2013 - 12:37 नवीन
कोणे हो हिरवीण ? जोशीकाकांना शोभेशी आहे ना ?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/04/2013 - 20:13 नवीन
पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 04/05/2013 - 21:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 12/09/2016 - 08:18 नवीन
पाशवी शक्ती >>>>> लोलवा ;)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 04/03/2013 - 04:40 नवीन
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 04/03/2013 - 20:39 नवीन
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रिया गुरुवार, 04/04/2013 - 12:22 नवीन
खूपच मजेदार. अजून एक आवृत्ती "सोने जितके आहे पिवळे, तितके तुझे मन सोवळे"
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 04/05/2013 - 07:25 नवीन
=)) =)) आम्हाला बी द्या कि एक छोतुसा रोल
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 04/05/2013 - 20:26 नवीन
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/09/2016 - 07:21 नवीन
शेवटी गाण्याचे चित्रिकरण झाले की नाही पैजारबुवा?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/09/2016 - 07:33 नवीन
त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 12/09/2016 - 07:54 नवीन
=)) मजेदार लेख.
  • Log in or register to post comments
ब
बरखा Fri, 12/09/2016 - 08:09 नवीन
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 12/09/2016 - 10:25 नवीन
ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा