Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कांदा कैरीची चटणी

अ
अनन्न्या
Mon, 04/01/2013 - 14:02
ह्ळूहळू सुट्टया सुरू झाल्या आणि पाहुणेमंडळी येऊ लागली. त्यानिमित्ताने कोकणातील वेगवेगळे पदार्थ घरी होऊ लागले. त्यातील काही निवडक पदार्थ आपल्यासाठी देत आहे. या आधीचा फणस पुलाव जसा हटके तशीच ही चटणीही!! साहित्यः चार मोठे कांदे, एक मध्यम कैरी, सुक्या मिरच्या दहा-बारा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य. क्रुती: सुक्या मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कांदा, कैरीची साले काढून किसून घ्या. ओले खोबरे, सुक्या मिरच्या मिक्सरला बारिक करून किसलेल्या कांदा कैरीत मिसळा. गुळात खडे असल्यास तेही मिक्सरला बारिक करून गूळ वरील मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घाला. पाव वाटी तेल तापत ठेवा. मोहोरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा. तयार फोडणी चटणीला द्या. मिरच्या भिजवून घातल्यामुळे चटणीला सुंदर रंग येतो. मिरच्यांचा तिखटपणा पुरेसा न वाटल्यास लाल तिखट घालावे. गूळाचे प्रमाणही आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे. तांदुळाची गरमागरम भाकरी आणि कांदा कैरीची चटणी... अहाहा!!!!!!!!!!!! chatni

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14563 views

💬 प्रतिसाद
क
कवितानागेश Mon, 04/01/2013 - 14:07 नवीन
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 04/01/2013 - 14:10 नवीन
जागतीक पातळीवरील आवडत्या पाकृपैकी ही एक आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 04/01/2013 - 14:11 नवीन
तोंपासु ! तोंपासु ! तोंपासु !
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 04/01/2013 - 14:29 नवीन
अशी चटणी (उरली तरच) किती दिवस टिकते? पटकन करायच झाल्यास नुसता कैरी-कांदा पण छान लागतो
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 04/01/2013 - 14:29 नवीन
आम्ही ह्याला कैरी-कांद्याचा तक्कू म्हणतो :) फोटो छान आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 14:35 नवीन
आम्ही पण तक्कू असेच म्हणतो. या चवदार पदार्थाची पाककृती दिल्याबद्दल अनन्या यांचे आभार. फोटो पण छानच.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 04/01/2013 - 14:40 नवीन
तक्कू हा शब्दच फार वर्षंनी ऐकला. आजी करायची कैरीचा. कुणीतरी पाकृ टाका प्लीज.
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 04/01/2013 - 14:34 नवीन
छान आहे...करुन चाखायला हवी.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 04/01/2013 - 15:05 नवीन
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...... पाणी सुटलं तोंडाला :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 04/01/2013 - 15:08 नवीन
ट्क्कूमध्ये कांदा घालत नाहीत. कैरी किसून त्यात गूळ, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा. आणि मोहोरी, हिंग आणि मेथी दाणे घालून फोडणी द्या. हे टक्कू फ्रिजमध्ये आठ दिवस टिकते. @दिपक, ही चटणी टिकाऊ नाही. कच्चा कांदा असतो ना!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 15:52 नवीन
वर +१ लिहिताना हि बाब ध्यानात आली नव्हती. बाकी तक्कूला 'टक्कू' असेही म्हंटले जाते हे प्रथमच वाचले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/01/2013 - 16:27 नवीन
राइट्ट एकदम. तक्कू मध्ये कांदा नसतो म्हणूनच आवडतो. :) ही चटणी नाही :(
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 17:59 नवीन
चटणी न करता तिखट मीठ घालून कांदाकैरी (कोशिंबिरीप्रमाणे) देखील फार चविष्ट लागते. अर्थात न टिकणारा पदार्थ आहे तो. # अभ्या - (१२ महिने श्रावण पाळणार्‍यांव्यतिरिक्त) कांदा घातलेले पदार्थ न आवडणारा मला भेटलेला प्रथम व्यक्ति आहेस तू... ;-).
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/01/2013 - 18:08 नवीन
=)) =)) =)) आहेच. पण तुला कोणी जैन भेटले नाहीत का आत्तापर्यंत? बर्‍याच संप्रदायात पण कांदा वर्ज्य असतो म्हणे. पण इथे मिपावर कांद्याची नुसती बरसात असते. (कांद्याची चॉकलेटं आईस्क्रीम अजून आली नाहीत म्हणून बरेय)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 18:14 नवीन
१२ महिने श्रावण पाळणार्‍यांव्यतिरिक्त म्हणालो की. बाकी उन्हाच्या दिवसात औषध म्हणून तरी कच्चा कांदा (तोंडी लावण्यापूरता का होईना) खात जा... :-).
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 04/01/2013 - 22:34 नवीन
(कांद्याची चॉकलेटं आईस्क्रीम अजून आली नाहीत म्हणून बरेय) अमेरिकेत गार्लिक या नावाची हॉटेलांची चेन आहे. या हॉटेलच्या मेनू मध्ये असलेल्या प्रत्येक पदार्थाचा लसुण हा आवश्यक घटक असतो . मी सान फ्रांसिस्को मधील एका गार्लिक restaurant मध्ये लसुण घातलेले आईस्क्रीम खाल्ले आहे.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 04/01/2013 - 18:44 नवीन
आमच्याकडे तक्कुमध्ये कांदा घालतात खासकरुन पांढरा कांदा उन्हाळ्यात फार चांगला, आणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ३-४ दिवस टिकतो निदान घरी तसे बघीतले आहे :) बाकी तक्कूला टक्कू ही म्हणतात ही नवीन माहिती .
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 04/01/2013 - 16:49 नवीन
मस्त्,मस्त्,मस्त.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 04/01/2013 - 17:09 नवीन
अनन्या, हे मी कांदा न घालता करुन बघते नक्की. कैरीसोबत कांदा कसा लागेल असे वाटते आहे. पुन्हा कांद्यामुळे टिकत नाही म्हणतेस ना?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/01/2013 - 17:19 नवीन
तोंडाला पाणी सुटलं
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 04/01/2013 - 17:37 नवीन
तक्कू हा शब्द आपल्याकडे तेलुगु भाषेतून आला असावा. आजही तो आंध्र प्रदेशात वापरला जातो. त्याची पाककृती वर अनन्या बाईंनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणेच-म्हणजे कांद्या शिवाय .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/01/2013 - 17:56 नवीन
राईट्ट सार. ना इष्टमैना चारू बोवा. :) (भात आणि एक प्रकारचे सार्/आमटी असते.)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Tue, 04/02/2013 - 09:07 नवीन
चारू बोवा नाही "चारू बुव्वा" , आणी तेलुगुत तक्कु नाही म्ह्णत तो शब्द "तोक्कु"(लोणचे) असा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2013 - 10:40 नवीन
टायपो रे नितीन. ;) आपले बुवा चिडतील की. त्यांचापण आवडता पदार्थ आहे तो. ;) (तक्कू मी हॉटेलमध्ये आंध्राच्या गिर्‍हायकांकडे ऐकले होते. अर्थात लोणचे हा पण त्यांचा दारुबरोबर आवडता स्नॅक्स आहे म्हणे)
  • Log in or register to post comments
स
साळसकर Mon, 04/01/2013 - 17:44 नवीन
तांदुळाची गरमागरम भाकरी आणि कांदा कैरीची चटणी... अहाहा!!!!!!!!!!! +++++++ तांदळाची भाकरी खासच... नुसते उल्लेखानेच पिठले, कांदा-तांबाट्याची चटणी, मेथीचीभाजी, बोंबीलबटाटा काय नको नको ते आठवले.. जे फकस्त भाकरीबरोबरच खायला जन्माला आलेत..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 04/01/2013 - 19:01 नवीन
एका कैरीला चार कांदे हे प्रमाण जरा व्यस्त वाटलं.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 04/02/2013 - 02:28 नवीन
आमच्या कडे यालाच तक्कू म्हणतात ( फक्त कांदा चिरलेला असतो, किसलेला नाही). फ्रिज मध्ये आठ दिवस तर नक्कीच राहते ( माझा फ्रिज फारवेळा उघडल्या जात नाही दिवसात म्हणूनही असेल कदाचित). फार आवडीची पाकृ.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 04/02/2013 - 08:54 नवीन
कैरीच नाव वाचुनच माझ्या तोंडाला पाणीच सुटल :) करुन बघेल .
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 04/02/2013 - 13:02 नवीन
@ स्नेहांकिता, कैरी व्यवस्थित आंबट आणि ओले खोबरे, गूळ यामुळे कांद्याचे प्रमाण बरोबर होते. हे केलेल्या चट्णीचे प्रमाण आहे. कांदा कच्चा आवडत नसेल तर प्रमाण कमी करून पहा!! @सानिका, टिकत असेलही, आम्ही घरात पंधरा माणसे असल्याने एकवेळच पुरते ही चटणी!! प्रत्येक भागातील बोलीभाषेचा फरक असेल नावात!! @यशोधरा, कांदा कैरी चांगली लागते एकत्र!!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 04/03/2013 - 19:55 नवीन
ज्वारीच्या गरम आणि पापडा आलेल्या पातळ भाकरी सोबत छान लागते हि चटणी ..... आवडते खुप :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा