॥पक्षिणीचे प्रेम॥
सकाळी सकाळी निवांत,
बसलो होतो सोफ्यावर ।
अचानक नजर गेली ,
चिमणीच्या खोप्यावर॥
तिची ती दोन पिल्ले ,
चिवचिवाट करत होती ।
चिमणी ही मोठ्या प्रेमाने,
त्यांना दाणे चारत होती ॥
तितक्यात घरत लक्ष गेले.....
माझी ही दोन मुले,
रडुन रडून सांगत होती।
खाण्यासाठी आईकडे,
कहीतरी मागत होती ॥
घरात होते सर्व पण,
झोळी तिची खाली होती।
कामावर जाण्याची,
घाई तिला झाली होती॥
करिअर व पैशापुढे,
आईचे ते प्रेम विरले।
माणसाच्या प्रेमापुढे,
"पक्षिणीचे प्रेम" श्रेष्ठ ठरले॥
💬 प्रतिसाद
आ
आतिवास
Mon, 04/01/2013 - 16:48
नवीन
अहो, तुम्ही निवांत बसला होतात ना सोफ्यावर - मग द्यायचात की मुलांना खाऊ -त्यात काय एवढं? :-)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 04/21/2013 - 16:17
नवीन
खाऊपासून सुरुवात तरी करायची!
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 04/21/2013 - 16:15
नवीन
मुलांना खाऊ तर मी देईल हो; पण आईच प्रेम नाही देऊ शकत ना..!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 04/21/2013 - 18:25
नवीन
मग बाबांचं द्या ! चालवून घेतील ती आनंदानं. 
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 04/21/2013 - 19:14
नवीन
आई कामावर गेल्यावर, मुलांची काय कुतरओढ होत असेल, ह्याची कल्पना मी करू शकतो..
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Mon, 04/22/2013 - 11:19
नवीन
हा प्रकार निवांतपणे बघत राहणं खरच एक मजेशिर विरंगुळा असायचा...
- Log in or register to post comments