Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

होळी स्पेशल रबडी

स
सानिकास्वप्निल
Tue, 03/26/2013 - 01:14
सर्व मिपाकरांना होळीच्या अनेक शुभेच्छा :) . व्हिडियो पाककृती: साहित्य: १ लिटर दूध ४-५ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टेस्पून दूध मसाला ( ह्यात जायफळपूड, वेलचीपूड,थोडे केशर व सुक्या-मेव्याची पूड असते.तुम्ही हवे असल्यास सगळे वेग-वेगळे घालू शकता) सजावटीसाठी पिस्त्याचे काप चिमूट्भर केशर चांदीचा वर्ख (ऐच्छिक) . पाकृ: एका नॉन-स्टीक भांड्यात दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे. दूधाला उकळी येऊन वर साय जमा व्ह्यायला लागली की , चमच्याने सायीला भांड्याच्या कडेला लावत जावे. जेव्हा-जेव्हा साय दूधावर यायला लागेल तसे-तसे ती कडेला लावावी. आच मंदचं असावी नाहीतर साय करपेल. दूध बर्‍यापैकी आटले असे वाटले की कडेची साय हळू-हळू चमच्याने काढून दुधात मिसळावी. त्यात दूध-मसाला घालून अजुन थोडे आटवून घ्यावे. दूधाला दाटपणा आला की त्यात थोडी-थोडी करुन साखर मिक्स करुन घ्यावी. गॅस बंद करून रबडी पूर्ण गार होऊ द्यावी, गार झाल्यावर रबडी जरा घट्ट वाटेल. सर्व्हिंग बाऊलमध्ये रबडी घ्यावी व त्यावर पिस्त्याचे काप घालावे. चिमूटभर केशर व चांदीचा वर्ख लावून घ्यावे. . ही रबडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जिलेबी, मालपुव्याबरोबर सर्व्ह करु शकता. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12345 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Tue, 03/26/2013 - 04:04 नवीन
जबरी.......... सकाळी सकाळी अत्याचार आहेत हे.
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Tue, 03/26/2013 - 11:55 नवीन
आवडता पदार्थ. बाकी प्रतिक्रीया नेहमीप्रमाणेच :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 12:01 नवीन
पाकॄ पण सोपी आहे. नक्कि करुन बघेन. पण रबडी आणि बासुंदि मधे काय फरक असतो? सर्व मिपाकरांना होळिच्या हर्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/26/2013 - 12:05 नवीन
ओ दिपकराव अहो अजुन रबडी चाखली नाहीत ! स्वर्ग सुखाला अजुन वंचित कसे राहिलात? म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 12:11 नवीन
अरे काय करु? उत्तम रबडी तर दुरच पण खरच चव अजुन अशी चाखलीच नाहि :) (फोटो पाहिल्यापासुन रबडीचा चाहता) दिपक
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/26/2013 - 12:03 नवीन
घरी जाउन पहावे लागणार ! हापिसात हा इमोशल अत्याचार आता सहन होइनासा झाला आहे. ;) अवांतरः-स्वप्निलराव फोटो एडिट करताना ब्लर टुलचा सुयोग्य वापर करतात असे वाटते. (रबडी प्रेमी) :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 03/26/2013 - 12:24 नवीन
पाकृंचे फोटो मीच काढते ओ आणी ह्यात ब्लर टुलचा वापर केला नाहीये फक्त झूम घेतलाय स्वप्निल फक्त व्हिडियो चे काम करतो व पदार्थ खातो ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/26/2013 - 15:45 नवीन
पाकृंचे फोटो मीच काढते ओ आणी ह्यात ब्लर टुलचा वापर केला नाहीये फक्त झूम घेतलाय व्होक्के. :) शेवटचा फोटु पाहुन मला उगाच तसे वाटले.पाकॄ करण्या बरोबरच फोटो सुद्धा अगदी भारी काढता.:)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 03/26/2013 - 12:13 नवीन
सोपी आहे बनवायला. उद्या प्रयत्न करुन बघतो.
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Tue, 03/26/2013 - 12:18 नवीन
तोंपासु. खुप छान दिसत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/26/2013 - 12:22 नवीन
मस्तच...!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/26/2013 - 12:23 नवीन
नेहमीप्रमाणे जबरदस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 03/26/2013 - 12:38 नवीन
काय जीवघेणा प्रकार आहे हा! काश हे फोटो दिसलेच नसते तर.... ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 03/26/2013 - 12:57 नवीन
होळीची लाकडं पेटलेली आहेतच. ठेवा मला त्यावर.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 03/26/2013 - 13:11 नवीन
वा वा वा... एकदम मस्त पाकृ आणि फोटो सुद्धा... सकाळीच आजच्या होळिची पुरणपोळीची फर्माईश झाली आहे ;) .... पण आता तेवढा वेळ नाही त्यामुळे हे करुन देते. :D
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/26/2013 - 13:14 नवीन
सुरेख पाकृ! आमच्या डोळ्यांवर अत्याचार करणार्‍या सानिकेस होळीपोर्णीमेच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 03/26/2013 - 13:17 नवीन
रबडी बघूनही लगेच प्रतिक्रिया दिली गेली नाही. रबडी झकास!! सानिका होळीच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 03/26/2013 - 13:52 नवीन
रबडी हा माझा आवडता पदार्थ आहे. तो मी कशाबरोबरही लावून खात नाही. कारण तो नुसताच चमच्याने तोंडात घोळवत घोळवत खाण्याचा पदार्थ आहे अशी माझी समजूत आहे. डायबिटिस नसल्यामुळे मी तो यथेच्छ हादडू शकतो. रबडी म्हणजे घट्ट बासुंदी! पा.कृ.पेक्षा प्रेझेंटेशनला साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 03/26/2013 - 16:53 नवीन
रबडी, रबडी-जिलेबी... अलम दुनियेत जन्नत म्हणुन कहि असेल तर ते केवळ बल्लवाचार्यांच्या स्वयंपाकघरात. खल्लास. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/26/2013 - 21:35 नवीन
सहमत. देवाऽऽ, मला पुढच्या जन्मी स्वप्निल कर, सानिका मात्र तशीच राहू दे! ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/26/2013 - 17:45 नवीन
होली है भाइ होलि है रबडी मिठी गोली है! ए ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव... ;-) आज आत्मा तृप्त जाहला :-)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 03/26/2013 - 22:14 नवीन
माऊली _______/\_________दंडवत घे बै होळी गोग्गोड केलीस अगदी.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/27/2013 - 01:15 नवीन
रबडी रबडी!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 03/27/2013 - 02:52 नवीन
जागच्या जागी खपलो आहे. प्रभ्या, असुर्‍या अन मेव्या ह्यांना निरोप कळवा, समाधीच्या कामाला लागा म्हणून. :) एकदम आमच्या दिल्लीच्या दिवसांची याद दिलवून दिली यार तुम्हीतर! एका खोपच्यातला तो कन्नु हलवाई शोधला होता...रोज सकाळी देवदर्शनाला जावं तसं त्याच्या दुकानापुढं जाऊन उभं रहायचो आम्ही चारही मित्र आणि मग, एका द्रोणात रबडी, दुसर्‍या द्रोणात गरमागरम जिलेबी...हाण्ण तिच्यायला! दिवसाची सुरुवातच अशी दणकेबाज गोड होऊन जायची. :) साला...तेव्हापासून ह्या रबडीनं काळजात घर केलंय राव. कोणा अनोळखी माणसानं जरी विचारलं, "रबडी देऊ का?" तर मी भिकार्‍यासारखा लगालगा मुंडी डोलावत त्याच्या मागोमाग जाईन अशी गत आहे. :)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 03/27/2013 - 07:01 नवीन
काल अगदी अश्शीच रबडी झाली आमच्याकडे :) फक्त त्यात तुपात खरपूस भाजलेल्या शेवया सुद्धा घातल्या होत्या..... ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 03/27/2013 - 09:50 नवीन
सुंदर!फोटो आणि पाकृ दोन्ही.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 03/28/2013 - 05:10 नवीन
मार डाला ! ! मस्त ग सानिके ,अपुन तेरे पाक्रु आउर प्रेझेन्टॅशन दोनो पर फिदा हय ;)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/28/2013 - 08:15 नवीन
छान पाककृती आणि झक्कास सजावट !!! अवांतर - बाजुला रांगोळीचे रंग वापरले आहेत वाटतं :)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर गुरुवार, 03/28/2013 - 12:45 नवीन
जबरदस्त पाकृ आणी सादरीकरण. क्लास. पण दिपकरावांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 03/28/2013 - 13:32 नवीन
बासुंदी व रबडी बनविण्याची पध्दत साधारण सारखीच. बासुंदीला दूध मंद आचेवर आटत ठेवावे लागते व उलथण्याने सारखे ढवळावे लागते जेणेकरुन वर साय धरणार नाही. रबडीसाठीही दूध मंद आचेवर आटत ठेवावे लागते आणी वर धरणारी साय जमा करुन त्यात मिक्स करावी लागते. बासुंदी बदामी/गुलाबीसर दिसते व दाट असते.(हल्ली कंडेन्सड मिल्क वापरुन इंस्टंट बासुंदी ही बनवतात) रबडी घट्ट, सायीसकट, थलथलीत टेकस्चर असणारी असते. सर्वांचे आभार :)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 03/28/2013 - 15:10 नवीन
मस्त पाकृ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा