Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बॉईल्ड एग्ज सॅन्डवीच/रोल्स (१००% वीदाउट पनीर रेसीपी )

द
दिपक.कुवेत
Mon, 03/25/2013 - 09:54
फोटो क्रं १ (सारण/स्टफिंग): Stuffing फोटो क्रं २ (तयार सॅन्डवीजेस): Pita bread sandwitch साहित्यः १. उकडलेली अंडि - २ ते ३ २. बारिक चीरलेली हिरवी, पिवळी, लाल, केशरी सीमला मिरची - १.५ वाटि किंवा ज्या कलरच्या मिळतील त्या :D ३. बारिक चीरलेली हिरवी मिरची - आवडिप्रमाणे कमी / जास्त ४. बारिक चीरलेली कोथिंबीर - २ चमचे ५. ब्लॅक ऑलीव्ज - २ चमचे ६. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम ७. बारिक चीरलेला पालक - १/२ वाटि ८. चवीनुसार मीठ ९. प्लेन मेयॉनीज / टोमॅटो केचप/सॉस - २ मोठे चमचे प्रत्येकि (चीली फ्लेवर्ड मेयॉनीज मिळाल तर उत्तम; मेयॉनीज नसेल तर हॉट अ‍ॅन्ड स्वीट टोमॅटो सॉस/केचप पण चालेल) १०. तेल ११. पीटा ब्रेड-कुबुस / पोळि/चपाती / रुमाली रोटि / टॉर्टिला - ह्या पैकि जे उपलब्ध असेल ते; अगदिच काहि नसलं तर ब्रेड (खास बॅचलरांसाठि) १२. आपापल्या आवडिचं किसलेल चीज कॄती: १. एका नॉनस्टिक पॅन मधे एक चमचा तेल तापलं कि बारिक चीरलेला पालक टाकुन कोरडा होइस्त परतुन घ्या २. उकडलेली अंडि किसुन घ्या ३. आता एका भाडयांत / बाउल मधे किसलेली अंडि, परतलेला पालक, बारिक चीरलेल्या सीमला मिरच्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, ब्लॅक ऑलीव्ज, किसलेलं चीज आणि चवीनुसार मीठ घालुन एकजीव करा. हे झालं आपल सारण/स्टफिंग तयार (फोटो क्र. १) ४. एका वाटित मेयॉनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करा ५. आता जे जे उपलब्ध असेल ते ग्रुहित धरुन खालील पाय~या देतोय. माझ्या टोस्टर मधे ३ विकल्प/ऑप्शन्स आहेत. एक आडवा असुन त्याला उभ्या खाचा आहेत. दुसरा वॅफल मेकर आहे आणि तिसरा नॉर्मल सॅन्डवीच मेकर आहे (मधुन खाचा असलेला) अ. पीटा ब्रेड/कुबुस: मधुन कापा; दोन अर्धे गोल होतील. आता प्रत्येक भागात मेयो-सॉसच मिश्रण लावा/स्प्रेड करा. सॉस लावल्यावर वरुन हलका दाब द्या म्हणजे दोन्हि बाजुला समान लागेल (फ्रि हॅन्ड ड्रॉईंन्ग असत तसं :D) तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा (उभ्या खाचा असलेलं). ब. पोळि/चपाती/ रुमाली रोटि / टॉर्टिला: वरुन मेयो-सॉसच मिश्रण लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा किंवा त्याचा रोल करुन तव्यावर अलगद दोन्हि बाजुकडुन शेका क. ब्रेडः मेयो-सॉसच मिश्रण दोन्हि ब्रेड स्लाइसना लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा ६. आवडत्या चटणी/सॉस सोबत गरमागरम सर्व करा :) ७. छोटयांसाठि हिरव्या मिरच्या वगळा ८. ह्यात बारिक चीरलेला / किसलेला ब्रोकोली, मशरुम, कोबी (जांभळ्या रंगाचा नाहितर आपला साधा) पण छान लागेल. टिपः १. हि सॅन्डवीजेस/रोल्स कच्चीपण छान लागतात फक्त तेवढा पालक, ब्रोकोली, मशरुम परतुन घ्या आणि पोळि/चपाती, रुमाली रोटि किंवा टॉर्टिलाला सॉस लावण्याआधि तव्यावर थोडं शेकवुन घ्या अवांतर १. हि पाककॄती अंडे न घालता करता येईल का?...तर हो :D. अंडि वगळुन बाकि सगळं साहित्य तेच ठेवा आणि तशीच कॄती करा :D

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10548 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Mon, 03/25/2013 - 10:00 नवीन
भारी दिसतं आहे! अजून जेवायला जायला मिळालं नाही आणि हे पाहिलं! निषेध!
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Mon, 03/25/2013 - 10:02 नवीन
दिसायला जेवढी छान आहे तेवढीच चवीला पण असणार. अंडे न घालता नक्कीच करुन बघणार. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
न
नानबा Mon, 03/25/2013 - 10:10 नवीन
जब्राट... या विकेंडला करण्यात येईल, आणि या फोटु सारखीच झाली (न करपता वगैरे), तर आपल्याला सांगण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/25/2013 - 11:13 नवीन
आम्हाला बोलवा की साक्षीदार म्हणुन, तुम्हीच करपवणार अन तुम्हीच सांगणार करपलं नाही म्हणुन.
  • Log in or register to post comments
न
नानबा Mon, 03/25/2013 - 11:28 नवीन
ब्वॉरं.... या मग खायला करपलेले बॉईल्ड एग्ज सॅन्डवीच/रोल्स.. :))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/25/2013 - 10:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 03/25/2013 - 10:33 नवीन
एकदम कलर फुल्ल पाकृ. :)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 03/25/2013 - 10:38 नवीन
च्यायला दिपकराव मुरले इथे. अंडी न घालता करता येतील का चे उत्तर पण दिले. बाकी पाकृ नेहमीप्रमाणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/25/2013 - 11:12 नवीन
आणि हो, एक प्रतिसाद आणि चार उपप्रतिसाद सुद्धा घालवले. असो, छान दिसतं आहे, कधीतरी करेन आणि तुम्हाला कळवेन.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/25/2013 - 15:00 नवीन
हे सँडविच करायला .. तुम्हाला का बरं अंडी घालावी लागतिल ?? :! बाकि दीपू काका ओल टैम रॉक्स हं ! ;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/25/2013 - 11:08 नवीन
मस्त. पिकनिकसाठी घेउन जाता येइल अस वाटतय. हल्ली मी पोळीभाजी दिली की मुलं नाक मुरडतात. मग अस काही दिलं तर खातील पण अन पालक, अंड असल्याने माझं चांगल फुड दिल्याच समाधानपण होइल. चला आठवड्याच्या दोनदा जाणार्‍या पास्त्याला पर्याय. ठँक्यु!!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/25/2013 - 15:03 नवीन
अप्पू ... ए तो पास्ता नको हं कँसल करुस :-/ उलट एकावर एक फ्री ची ऑफर ठेव ;) माझी आई मला अस्सच करायची :-/
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 13:25 नवीन
तुला काय ग बोलायला जातय. बिचा~या अपर्णाला मुलांना खायला घालताना नाकि नउ येत असतील :D
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 03/25/2013 - 11:15 नवीन
कसली छान रंगीबेरंगी पाक्रु आहे......... नक्की करेन
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 03/25/2013 - 11:43 नवीन
वाह ख्वाईश पूर्ण केली तर तुम्ही..
  • Log in or register to post comments
N
nishant Mon, 03/25/2013 - 12:08 नवीन
एकदम मस्त पण एक शंका - "यात पनीर घातले तर कसे लागेल?" :D :D
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 03/25/2013 - 12:18 नवीन
प्रश्नाला पर्याय मिळाला......आता प्रत्येक पाकॄ...पनीर घालुन कशी लागेल हे विचाराव लागेल :D...एनिवे तुच कर आणि सांग :)...मला सद्धा "पनीर" शब्द लिहुन अंमळ कंटाळा आलाय
  • Log in or register to post comments
N
nishant Tue, 03/26/2013 - 11:54 नवीन
नक्कि करुन बघणार.. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/25/2013 - 12:09 नवीन
मस्त पाकृ... करायला सागून खाण्यात येईल :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 03/25/2013 - 12:35 नवीन
छान, रंगीबेरंगी पाकृ!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 03/25/2013 - 12:44 नवीन
फोटो ही सुंदर :) पिटा वापरुन करुन बघेन. मी तोरतीया वापरुन केलेले मेक्सिकनचिकन किसाडिया साधारण असेच होते.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/25/2013 - 15:06 नवीन
ए सानिका तुला रीकोटा चीझ वापरुन आम्रखंड बनवता येत का ?? दीपू काका तुमाला येतं का ?? येत असल्यास संपर्क साधावा ...
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 03/25/2013 - 15:26 नवीन
आग होतीस कुट ईतके दिस? डोले सुकलं कि ग! तुझ्या परतिसादाबिगर अन्न काय ग्वाड लागलं नाहि बग! आता आम्रखंड बनवलीस कि तोंड गोड कराया विसरु नकोस :D
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 03/25/2013 - 19:27 नवीन
असं हो काय दीपू काका :-/ मी एकदा प्रयत्न केला होता .. रीकोटा चीझ आणि मँगो पल्प एकत्र मिक्सरला लावलं पण ते बहुत पातळ हूवा :( मग फीझ मे ठेवा ... पण मी एका पार्टीत खाल्लं होतं तेवढं टेस्टी नवतं झालं :( ... काहितरी कमी होतं , नेमकं काय ते कळत नवतं :( येत असेल तर सांगाना काका :( :-/
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 13:33 नवीन
आज्जे तुझा आत्मवीश्वासच कमी पडला असेल.....परत जोमाने प्रयत्न कर......बघ नक्कि जमेल
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 03/26/2013 - 14:20 नवीन
कै-या मिक्सरमधुन पुड करुन घालायच्या ना, झालं असतं घट्ट हाकानाका. असो.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 03/26/2013 - 15:01 नवीन
:-/ :-/
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Mon, 03/25/2013 - 17:55 नवीन
वा,, खुपच छान दिसते आहे रंगीबेरंगी सँडविच... नक्की करुन बघेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/25/2013 - 18:56 नवीन
एकदम रंगीबेरंगी आणि हेल्दी!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 12:24 नवीन
मस्त खा आणि स्वस्थ रहा :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 03/26/2013 - 12:58 नवीन
अंड्याला पर्याय म्हणून पनीरच वापरणार!! त्यामुळे मी केलेली सँडविच परफेक्ट होणार!! तुमचा पनीर फ्रीचा पर्याय फसला आहे!! ही पाक्रु. पनीरसह झकास!!!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/26/2013 - 13:22 नवीन
पण नुसतं पनीर बेचव असतं/लागत म्हणुन तर ते आपण वेगवेगळ्या प्रकारात वापरतो...उदा. मटार पनीर, पनीर टिक्का मसाला ई. अगदि रसगुल्ले सुद्धा आपण साखरेच्या पाण्यातुन काढतो. तरि सुद्धा प्रयत्न करायचाच असेल तर आधी एकाच सँडविच/रोल मधे घालुन पहा... मग आवडल तर सगळ्यात घाल :)
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 03/28/2013 - 05:12 नवीन
अर्धा जीव त्या सानिकेने घेतला अर्धा तुम्ही घ्या आता ;) झक्कास !
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/28/2013 - 08:23 नवीन
ह्यात अंड्याएवजी पनीर हवे होते मजा आली असती :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 03/28/2013 - 09:18 नवीन
किसुन घातली तरि मजा येईल आणि एक वेगळिच चव लागेल (कॄ.ह.घे :D)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 03/28/2013 - 14:09 नवीन
करून पाहिले आणि खाल्ले. धन्यवाद दीपकशेठ! सारणासाठी आमची चाराण्याची वर्गणी: - बटाटा उकडून घातला - मिठाऐवजी शेंदेलोण घातले. - थोडे ऑलिव्ह ऑईल घातले
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 03/28/2013 - 15:21 नवीन
अंडं घालून ही पाकृ करायला किती वेळ लागला तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Fri, 03/29/2013 - 08:58 नवीन
किती अंडि घालतो त्यावर अवलंबुन आहे....तुला कमी वेळात हवी असतील तर अंडि नको घालुस :D
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 03/29/2013 - 12:04 नवीन
मैने बन्व्या, खाया, मजा आया.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 03/30/2013 - 09:13 नवीन
कसले जीवघेणे फोटॉ आहेत हो कुवेतवाले ! पण आमी नाय बा बनवणार. खट्पट लै, इतका वेळ स्वैपाकघरात काढणं आपल्याला जमत नै बॉ ! तुमच्याकडेच टेस्ट घ्यायला आलं तर कसं ?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/30/2013 - 09:21 नवीन
ऑल मिपाकर्स आर ऑलवेज वेलकम......:) नाहितर जेव्हा मी भारतात येईन तेव्हा कट्टा करु कसं?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 03/30/2013 - 09:29 नवीन
ब्येस्ट ब्येस्ट. आणि कट्ट्याला ते गुलकंद अनार चे आईस्क्रीम. :) कराच एकदा मिपाच्या बल्लवाचार्यांचा आणि सुगरणीचा कट्टा. (भारतात) जिथं कराल तिथं येऊ. :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/30/2013 - 09:39 नवीन
अरे तुम्हि (मिपाकरांनी) फर्माईश करावी (खाण्याची) आणि मी ती पुरवावी अशी फार ईच्छा आहे.....लाईव्ह प्रतीसाद आणि कव्तुकाचे चार शब्द ऐकले कि काहितरि चांगल केल्याच आणि खाउ घातल्याच समाधान तरी मिळेल :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 03/30/2013 - 16:21 नवीन
दीपू ़काका मीपण येणार हं :D
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/30/2013 - 16:35 नवीन
अग तुला घातल्याबिगर मला अन्न कस ग्वाड लागेल?
  • Log in or register to post comments
क
कुहू Sat, 03/30/2013 - 17:11 नवीन
नक्किच ट्राय करेन!!
  • Log in or register to post comments
स
साऊ Sun, 03/31/2013 - 15:10 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा