Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

नाचणीचे सतू.

ज
ज्योति प्रकाश
गुरुवार, 03/21/2013 - 11:19
साहित्यः-१)दोन पेले नाचणे. २)अर्ध्या नारळाचे दूध्.(घट्ट व पातळ.) ३)किसलेला गूळ. ४)चिमूटभर मीठ. ५)काजू किंवा भाजलेले शेंगदाणे. ६)दिड चमचा साजूक तूप. कृती :-नाचणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे.सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे.चोथा येईल तो टाकून द्यावा. गाळून उरलेल्या पाण्यात अजून पाणी घालून ६-७ तास ठेवावे म्हणजे नाचणीचे सत्व खाली बसेल व पाणी वर राहिल.वरचे पाणी हळू काढून टाका.आता जे सत्व राहील त्यात नारळाचे दूध,किसलेला गूळ. काजू व मीठ घालून ढवळून घ्या.गूळ विरघळला कि हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा. जरावेळाने मिश्रण घट्ट होत येईल्.केकच्या बॅटरपेक्षा जरा घट्ट झाले की त्यात तूप घालून ढवळा. तूप लावलेल्या भाड्यांत हे मिश्रण ओता.व थंड करत ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8434 views

💬 प्रतिसाद
स
सानिकास्वप्निल गुरुवार, 03/21/2013 - 11:45 नवीन
छान पाककृती. नाचणीच्या पीठाचे किंवा रेडीमेड साखर-विरहीत सत्वाचे (पॅकेट) होऊ शकेल का?? माझ्याकडे दोन्ही आहे, तसे करुन बघेन मग.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 03/21/2013 - 11:58 नवीन
मी कधी तसे केले नाही.तू करून बघ व मला सांग.
  • Log in or register to post comments
M
Maharani गुरुवार, 03/21/2013 - 15:26 नवीन
छान पाकृ मला पण हाच प्रश्न विचारायचा होता....
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 03/21/2013 - 12:01 नवीन
हे फ्रिजमधे ठेऊन थंड झालं की अप्रतिम लागतं ना? तुम्ही हे असे फोटो टाकून उन्हाने त्रस्त झालेल्या आम्हाला अजून जळवता.. :(
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 03/21/2013 - 12:52 नवीन
छान आणि पौष्टिक प्रकार आहे हा..
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या गुरुवार, 03/21/2013 - 15:15 नवीन
सांदण, खांडवी या कुटुंबातील वाटली.
  • Log in or register to post comments
N
nishant गुरुवार, 03/21/2013 - 15:19 नवीन
मस्त पौष्टिक पाक्रु आणि फोटोहि उत्तम.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 03/21/2013 - 15:27 नवीन
एकदम थंड पाकॄ....:)
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Fri, 03/22/2013 - 08:02 नवीन
अतिशय चांगला पदार्थ-चवीला व प्रक्रुतिला.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Fri, 03/22/2013 - 08:08 नवीन
पौष्टिक लहान मुलांसाठी तर उत्तमच :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा