Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

तिरफळाची बांगड्याची आमटी.

ज
ज्योति प्रकाश
Tue, 03/19/2013 - 18:47
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे. २)१०-१२ लाल मिरच्या. ३)हळद्पूड. ४)खवलेला नारळ(अर्धा नारळ) ५)५-६ आमसुले. ६)८-९ तिरफळे. ७)मीठ. ८)एक चमचा धणे. कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12641 views

💬 प्रतिसाद
म
मोदक Tue, 03/19/2013 - 20:01 नवीन
तिरफळे म्हणजे काय..?
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 03/20/2013 - 04:03 नवीन
इथे मिळेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 07/28/2013 - 19:18 नवीन
विकत कुठे मिळते हे सांगाल का जरा?? आणि एरवी पण कोणत्या पदार्थात वापरता येईल???
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Tue, 03/19/2013 - 20:28 नवीन
शेजवान पेपर
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 03/19/2013 - 22:21 नवीन
पण बांगडा आवडत नाही :(
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/20/2013 - 00:17 नवीन
अग मिळत नाही की गं बांगडा येथे. काय चव असते बांगडयाला. आहाहा! मी भरलेला बांगडा येथे टाकला होता. मला खुप आवडते बांगड्याचा रस्सा अन भात खायला. वाईट वाईट अवस्था झाली माझी.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 03/20/2013 - 00:30 नवीन
चव चांगली असते पण लैच काटे असतात.. :-( नीट मन लावून खाता येत नाही.. त्यामुळे चव आवडत असूनही हा मासा खायला कंटाळा येतो.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/20/2013 - 00:53 नवीन
एकदा काटे कुठे असतात ते माहित झालं की काही प्रश्न उरत नाही. चपट्या कडा जिथे संपतात त्या दोन्ही बाजुला छोट्या काट्यांची एक रांग असते ती एका फटक्यात निघते. मग उरला मधला मोठ्ठा काटा तो बांगडा अर्धा उकलुन काढुन घ्याय्चा, आहे काय त्यात.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 03/20/2013 - 07:28 नवीन
लैच काटे असल्यामुळे नीट मन लावून खाता येत नाही पण काटे काढले कि एकदम चवीष्ट मासा.....भरलेला बांगडा तर अप्रतीम.....अपर्णा तुझी भरलेला बांगड्याची लिंक दिलीस तर ह्या वीकेंड ला करिन म्हणतोय :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/20/2013 - 11:56 नवीन
http://www.misalpav.com/node/15638 कुवेतला बांगडे मिळतात? फारच नशिबवान ब्वा तुम्ही. खावा खावा बांगडा खावा, भाकर्‍या हाणा. आम्ही आप्ले बसतो सुरमाई, कोलंबी करत.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 03/20/2013 - 15:09 नवीन
लिंक पाहिली आणि रेसीपीची प्रिंटाआउट घेतली आहे. अगं कुवेत मधे काय मीळत नाहि? पण आपण बाबा खायला आणि करायला सोपे अशाच माशांच्या वाटेला जातो...पापलेट, सुरमई, कोलंबी आणि कधी कधी बांगडा ह्या पलीकडे आपली उडि नाय :D
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 03/20/2013 - 08:08 नवीन
खूप काटे असल्यामुळे आवडत नाही :(
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/20/2013 - 06:27 नवीन
माझी फेव्ह आमटी :)
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Wed, 03/20/2013 - 07:43 नवीन
तिरफळे म्हणजे काय
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 03/20/2013 - 07:52 नवीन
बांगड्याची आमटी अ‍ॅप्लाइड आर्ट्स मधे मोडते.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/12/2013 - 01:04 नवीन
=)) =)) =)) आयला! हे आमचं मास्तर म्हणजे लै डेंजर बाबा! कधी कुठं काय टाकतील काय सांगता यायचं नाही. -(एम.ए. (अप्लाईड आर्ट्स) ऑनर्स) धम्या.
  • Log in or register to post comments
स
साऊ Wed, 03/20/2013 - 08:20 नवीन
मलाही बांगडा आवडतो. मस्त वास सुटतो तळल्यावर. अन रश्श्याचाही.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 03/20/2013 - 09:07 नवीन
च्यायला काल बांगडा स्वप्नात आला होता आणि आज बघतो तर मिपावर हजर. :) बादवे बांगड्याला 'फार' काटे असतात हे वाचून 'फार' गंमत वाटली. यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. ;)
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 03/20/2013 - 12:58 नवीन
यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. कुनीतरी काहून..? तूच कर की एखादी रेशिपी. ;-)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 03/20/2013 - 15:35 नवीन
ईथे असले उत्तम मासे मिळत नाहीना राव. :( नायतर मीच नसते का दिले.
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/11/2013 - 15:16 नवीन
>>यांना कुणी तरी कर्ली, काटेरी दाखवारे रे. नाय तं काय. =))
  • Log in or register to post comments
N
nishant Wed, 03/20/2013 - 11:17 नवीन
नुसता फोटो बघुनच तोंडाला पाणी सुट्ले...
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 03/20/2013 - 12:33 नवीन
मस्तच पाकृ.. पण इथे तिरफळे मिळणे अवघड.. :(
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 03/20/2013 - 17:43 नवीन
आधीच बांगडा ... त्यात तिरफळाच्या कालवणातला! तों पा सु हे शब्द खूपच तोकडे आहेत सध्याच्या अवस्थेचं वर्णन करायला...
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/20/2013 - 18:01 नवीन
फोटो एकदम सॉल्लिड आलाय!आणि आमटीचा रंग पण खास!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 03/21/2013 - 03:43 नवीन
आमटीचा रंग पण खास! खरच! असल जेवण जेवायला हाताची बोटच चवदार लागतात. चमच्याने वगैरे अजिबात चव येत नाही. आई ग! मी चक्क मिटक्या मारते आहे इथे बसुन त्या रश्श्याकडे बघुन.
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 03/21/2013 - 08:14 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/21/2013 - 08:26 नवीन
मला पण बांगडा फार काही आवडत नाही म्हणुन फक्त रेसेपी बघुनच खुश होणार :)
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर गुरुवार, 04/11/2013 - 10:44 नवीन
बांगडा सुबेस गो. बाय.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/11/2013 - 23:31 नवीन
बांगड्याची आमटी तीही तिरफळाची....व्वा! अगदी खासमखास बेत म्हणा की. सुट्टीच्या दिवशी सणकून भूक लागली असावी बांगड्याची तिरफळंवाली आमटी, वाफाळणारा पांढराशुभ्र भात आणि एकतरी तळणीतली तुकडी.....नंतर तीनेक तास तरी, भणाणत्या पंख्या खाली, अगदी व्यत्यय विरहीत झोप. स्वर्ग..स्वर्ग म्हणतात तो तरी असा काय असतो?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/12/2013 - 01:06 नवीन
काकानु...एकतर आधी तो वर पाककृतीत टाकलेला फोटू, वर आणि तुम्ही केलेलं हे वर्णन...च्यायला, माझी गत म्हणजे 'नको देवराया अंत असा पाहूऽऽ' अशी झाली हो!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/12/2013 - 02:26 नवीन
वा वा काय जीवघेणा फोटो आहे.
  • Log in or register to post comments
र
रमताराम Sat, 04/13/2013 - 07:54 नवीन
यम्म.
  • Log in or register to post comments
ज
जासुश Sat, 07/27/2013 - 21:19 नवीन
छान दिसत आहे.. ह्यात फोडणी वगैरे साठी तेल वापरावे लागत नाही का? मला बनवायची आहे ..तुमच्या व्यतिरिक्त इतर सदस्यांनी उत्तर दिले तरी चालेल ..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/27/2013 - 22:01 नवीन
नाही. ह्यात तेल, लसूण वापरत नाहीत. त्यामुळे माशाची चव जास्त उठून येते. एक पर्यायी पाककृती म्हणून, आवडत असल्यास, कालवण तयार झाल्या नंतर २ मोठे चमचे (टेबल स्पून) खायचे खोबरेल तेल तापवून त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतून ते तेल नुसते वरून ओतायचे. त्याचीही एक आगळी वेगळी आणि मस्तं चव येते कालवणाला.
  • Log in or register to post comments
J
jaypal Sun, 07/28/2013 - 08:05 नवीन
रंग अप्रतीम. च देखिल तशीच असणार. बहुतेक मी बांगड्याला अ‍ॅलर्जीक आहे. तेंव्हा रावस ,सुरमई किंवा पापलेट सारखा दुसरा मासा चालेल का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 07/29/2013 - 04:43 नवीन
या बांगड्याच्या कालवणाला कारवारकडे हुमण असे म्हणतात.. अतिशय चविष्ट असते ..आणि शिवाय लो कॅलरी :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा