Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बीटाच्या दशम्या

व
वामन देशमुख
Mon, 03/11/2013 - 12:04
साहित्य: ताजे बीट: ३-४, मध्यम आकाराचे साखर: एक वाटी कणिक: दोन-तीन वाट्या (मिश्रणाच्या प्रमाणात) तूप: ५० ग्रॅम दूध: पाव लिटर मीठ: चवीपुरते तीळ: अर्धा चमचा (ऐच्छिक) साहित्य साहित्य पाकृ: बीट साल काढून बारीक किसून घ्या. मंद आचेवर १२-१५ मिनिटे शिजवून घ्या.  शिजवून घ्या मऊसर झाले की दूध आणि साखर घालून, चांगले हलवून अजून दोन मिनिटे शिजवून घ्या. Alt थंड झाल्यावर यात कणिक, तूप आणि चिमुटभर मीठ (हवे असल्यास तीळ) मिसळून साधारण घट्टसर पीठ भिजवून घ्या. Alt नेहमी पोळी जशी लाटतो तश्या दशम्या लाटून घ्या. भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तूप लावा. लालेलाल, गरमागरम दशमीवर तुपाचा किंवा लोण्याचा गोळा घालून खायला द्या. Alt Alt टीपा: १. यात दूध आणि साखरेऐवजी तिखट, हळद, आले-लसणाची पेस्ट इ. घालून तिखटमिठाची आवृत्ती (धपाटे) करता येते. २. फोटोत दाखवलेली दशमी ही तिखट आवृत्ती आहे. (म्हणून हळदीचा पिवळा रंग दिसतोय.) गोड दशम्या फोटो काढण्याआधीच संपून गेल्या. ३. ही पाकृ माझी नसून माझ्या पत्नीची आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5617 views

💬 प्रतिसाद
स
सुप्रिया Mon, 03/11/2013 - 13:32 नवीन
मस्त दिसताहेत. करून बघायला हव्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/11/2013 - 17:37 नवीन
बीटाचं कोशिंबीरीशिवाय काय करता येतं याचं हे उत्तर!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 03/12/2013 - 02:01 नवीन
पाकृ आवडली
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/12/2013 - 02:06 नवीन
बिट इट! बिट इट!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 03/12/2013 - 03:22 नवीन
अरे व्वा लालेलाल दशम्या !!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 03/12/2013 - 15:53 नवीन
बीटाच्या दशम्या खूप आवडल्या :)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Tue, 03/12/2013 - 22:11 नवीन
पण दशम्या सोडून ताटातले बाकीचे पदार्थ बघुनच तोंपासु. :)
  • Log in or register to post comments
स
साऊ Wed, 03/13/2013 - 02:34 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/13/2013 - 04:04 नवीन
मस्त मांडणी आणि पाककृती. आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 03/14/2013 - 09:03 नवीन
फोटो छान आणि सोपी पाकॄ. बीट अनायेसे घरात आहेत तर करुन बघायला पाहिजे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 03/15/2013 - 07:44 नवीन
पत्नी सुगरण आहे हो तुमची !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 03/15/2013 - 07:58 नवीन
विशेषतः स्नेहांकिता यांना आणि सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 03/15/2013 - 08:02 नवीन
मुले गोड प्रकार खायला नाखुश असतात. बाकी ताटातल्या पदार्थांची पण रेसीपी द्या. तेही छान दिसतायत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 03/15/2013 - 10:33 नवीन
मस्त पाकृ!! कोशिंबीर सोडून हा असा "ऑफबीट" वापर पहिल्यांदाच पाहिला :) अवांतरः वामनपंडितांचे सोवळे इतके कडक होते की ते आपल्या बायकोच्या हातचेही न खाता स्वतःच रांधून खात असत असे वाचलेय. क्षणभर वाटले की तुमचीच पाकृ तर नव्हे? स्क्रोलल्यावर कळ्ळं काय ते ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा