Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोबीची भजी.

ज
ज्योति प्रकाश
Mon, 03/11/2013 - 11:16
साहित्यः-१)बारीक चिरलेला कोबी. २)बारीक चिरलेला कांदा कोबीच्या अर्धा. ३)बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची. ४)आलं-लसूण पेस्ट. ५)बेसन्(चण्याचे पीठ) ६)हळद. ७)लाल मिरची पूड. ८)मीठ. ९)तळण्यासाठी तेल. कृती :-वरील सर्व साहित्य एकत्र करावे.जरुरीपुरते पाणी घालून भिजवून घ्यावे.जास्त पातळ करु नये. कढईत तेल तापत ठेवावे.चांगले तापले की पिठाची छोटी-छोटी भजी तेलात सोडावी व तळून काढावी.(तेल चांगले तापले की गॅस मध्यम करावा). सॉस व गरम गरम चहा अथवा कॉफी बरोबर खायला द्यावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8417 views

💬 प्रतिसाद
क
कच्ची कैरी Tue, 03/12/2013 - 03:25 नवीन
आज संध्याकाळी करुन बघते :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 03/12/2013 - 09:04 नवीन
चांगली आहे पाकृ.. मी कोथिंबीरच्या वड्यांसारख्या कोबीच्या वड्या करते.. त्या पण मस्त लागतात.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 03/12/2013 - 16:04 नवीन
मी पण करते ही बय्राचदा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/12/2013 - 16:24 नवीन
खाउन बघायला हवे...
  • Log in or register to post comments
प
प्राकृत Fri, 03/15/2013 - 08:33 नवीन
तोंडाला पाणी सूटले
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 03/15/2013 - 09:06 नवीन
यात आले-लसूण घालण्या ऐवजी अख्खे धणे आणि मिरीचे दाणे थोडे ठेचून घातले तरी छान चव येते.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/16/2013 - 11:30 नवीन
भजी आणि चहा लगेच उचलुन खावसं वाटतय....मस्त आणि सोपी पाकॄ
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/16/2013 - 11:33 नवीन
कोबीचा एवढा चांगला पदार्थ होतो यावर पटकन विश्वास बसणार नाही!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 03/17/2013 - 18:46 नवीन
"भजी" ऐवजी "भाजी" असे वाचत होतो. असो. भजी कुठलिही असली तरी गरम गरम खाण्यात मजा असते. आता करुन खाल्ल्याशिवाय समाधान होणार नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा