Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

फणसाच्या कुवर्याची भाजी.

ज
ज्योति प्रकाश
Sun, 03/10/2013 - 19:55
कुवरा म्हणजे कोवळा फणस. साहित्यः-१)कुवरा २)भिजवलेली तुरडाळ.(काळे वाटाणे,हिरवे वाटाणे,छोले,चवळी,शेंगदाणे पण घालू शकता.) ३)हळद. ४)मीठ ५)हिरवी मिरची.(उभी चिरलेली) ६)चवीपुरता गूळ. ७)खोबरेल तेल. ८)मोहरी(फोडणीसाठी) ९)बारीक चिरलेला कांदा.( optional) १०)खवलेले ओले खोबरे. कृती :-प्रथम कुवर्याच्या फोडी करून कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये दोन शिट्या काधून शिजवून घ्याव्या.(भिजवलेले कडधान्य(तुरडाळ सोडून) घालायचे असल्यास कुकरमधेच फोडीबरोबर घालावे.) शिजलेला कुवरा कुस्करून घ्यावा. त्यात हळद्,गूळ व मीठ घालावे. एका भांड्यात खोबरेल तेल घालून तापल्यावर मोहरी घालून फोडणी करावी. मोहरी तडतडली की भिजवलेली तूरडाळ्,व उभी चिरलेली हिरवी मिरची घालावी व ढवळून झाकण ठेवावे व त्यावर पाणी ठेवावे. डाळ थोडी शिजली की कुस्करलेली भाजी घालून ढवळून थोडे फोडी शिजलेले पाणी घालून झाकून ठेवावे. भाजीतील पाणी आटले की त्यात ओले खोबरे घालून भाजी ढवळावी. ता.क.साहित्याचा फोटो काढताना त्यात हळद व मोहरी ठेवायची राहिली.(चु.भु.दे.घे.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5818 views

💬 प्रतिसाद
प
पिशी अबोली Sun, 03/10/2013 - 19:59 नवीन
'जीवटाकार्ह' भाजी आहे ही..कृतीबद्दल धन्यवाद..आता पर्यंत खाण्यापुरताच विचार केला होता हिचा.. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 03/11/2013 - 01:39 नवीन
छान पाकृ.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 03/11/2013 - 04:05 नवीन
फणसाची भाजी पाहून मन खूश झाले.उत्तम पाक्रु.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 03/12/2013 - 03:26 नवीन
ही भाजी कधी खाल्ली नाहिये ,पण खायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 03/12/2013 - 03:56 नवीन
कच्च्या कैरीनं, कच्च्या फणसाची भाजी खाल्ली नाहीये, असो मी देखील खाल्ली नाहीये. बाकी पातेल्यातल्या तेलात पडलेल्या मोहरीचा फोटो मस्त आला आहे, जॉमेट्री मस्त जमलीय सर्कल्सची. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/12/2013 - 08:07 नवीन
पारंपरिक पाकृ. अशी भाजी लै आवडते. पण फणसाचा चीक काढून चिरणे हे काम कोण करणार? या प्रश्नापाशी गाडी अडून रहाते.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 03/12/2013 - 14:01 नवीन
फणसाचा मधला भाग टणक असतो,( त्याला पाव म्हणतात आमच्याकडे) ती चिरताना काढणे आवश्यक आहे. कारण ती शिजत नाही. वरील फोटोत तो भाग काढलेला दिसत नाही. चिरताना विळीला किंवा ज्याने चिरणार त्या गोष्टीला तेल लावून घ्यावे. ज्या भांड्यात तो शिजवणार त्यालाही तेल लावून घ्यावे मग पाणी घालून पाण्यात शिजलेला फणस घालावा. यामुळे चिक साफ करायचा त्रास वाचतो.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 03/12/2013 - 15:58 नवीन
छान पारंपारीक पाककृती :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 03/15/2013 - 16:40 नवीन
वेगळी पाकृ... कधी खाल्ली नाहिये..
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/16/2013 - 11:33 नवीन
ईकडे कच्चा फणस मिळण जरा कठिण आहे त्यामुळे भारतात आलो कि खायला तुमच्याकडेच येतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Sun, 03/17/2013 - 10:49 नवीन
अवश्य या.आमच्या घरी सर्वांचे स्वागत्.जरूर या.
  • Log in or register to post comments
स
साऊ Mon, 03/18/2013 - 02:51 नवीन
मलापण आवडते फणसाची भाजी.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 03/18/2013 - 05:12 नवीन
हा डिंक फार चिकट असतो. फणस आडवा चिरल्या चिरल्या कागदाचा बोळा घेऊन फणसाच्या कापलेल्या पृष्ठभागावर गोल गोल फिरवल्यास डिंकाची तार त्या बोळ्याभोवती गुंडाळली जाते. पूर्वी हा डिंकाचा गोळा कोनाड्यात भिंतीवर चिकटवून ठेवत. विस्तवाशी संबंध न येणार्‍या भांड्यांना छोटी छिद्रे पडली तर हा डिंक थोडा गरम करून त्यावर चिकटवीत असत. भांडे अगदी वॉटर्-प्रूफ बने. डाग काढणारी माणसे नेहमी उपलब्ध नसत. अशावेळी हा तात्पुरता उपाय कामी येई.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा