Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

तंदुरी पॉंफ्रेट

म
मी_देव
Tue, 03/05/2013 - 10:37
खुप दिवसांत तंदुरी पॉंफ्रेट खाल्लेला नव्हता, आणि तंदुरी चिकनप्रमाणे सहजही न मिळणरा प्रकार म्हणून हा घाट.. सर्व मत्स्यप्रेमी खवैंयासाठी........ साहित्य - २-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट) मॅरिनेट १ साठी-
  • १ लिंबू
  • १ चमचा मीठ
मॅरिनेट २ साठी-
  • पाच-सहा चमचे घट्ट दही
  • २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा तंदुर मसाला
  • अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे ऑलिव्ह ऑईल
  कृती - पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल. पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे. दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे. मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे. पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत. ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा. गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15165 views

💬 प्रतिसाद
श
शिद Tue, 03/05/2013 - 10:45 नवीन
लाजवाब...आणखी शब्दचं नाहीत. महीन्याअखेरी होळी येत आहे, तेव्हा हा प्रयोग करुन चाखण्यात येईल...पण ओवन न वापरता धगधगत्या कोळश्यावर.
  • Log in or register to post comments
म
मी_देव Tue, 03/05/2013 - 10:56 नवीन
धन्यवाद.. नक्की करून बघा, आणि धगधगत्या कोळश्याची सर ओव्हनला कुठून येणार.. :)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 03/05/2013 - 10:47 नवीन
शेवटचे दोन फोटो एकदम तोपासु
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 03/05/2013 - 10:48 नवीन
एकदम मस्त झालाय :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 03/05/2013 - 10:56 नवीन
वा... मेले मी.... अप्रतिम फोटो... का जळवताय???
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Tue, 03/05/2013 - 12:34 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
N
nishant Tue, 03/05/2013 - 10:59 नवीन
कातिल पाकृ आणि फोटो... शेवट्चा फोटो पाहुन,"दिल पाप्लेट, पाप्लेट हो गया!"... :D
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 03/05/2013 - 11:02 नवीन
शेवटचे दोन फोटो बघुन डोळे धन्य झाले.तों.पा.सु.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Tue, 03/05/2013 - 11:07 नवीन
काय राव …. कायला असे करून राहिले तुमी , जीव घेताय का? तो पा सु ना
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/05/2013 - 11:07 नवीन
कसले भारी फोटो आलेत!
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 03/05/2013 - 11:19 नवीन
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय. रविवारी वाशीला एका कोकण मेळाव्यात हादडून आलोय, उद्या शेवटचा दिवस परत हादडायला आणि पार्सल घ्यायला जातोय. पापलेटच खाल्ले होते पण आकाराने आणखी मोठे असते तर आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटत होते तरी ती कसर या फोटोंनी भरून काढली. आता काय, वाट बघतो उद्याची.. :)
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/06/2013 - 09:19 नवीन
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नानबा गुरुवार, 03/07/2013 - 07:04 नवीन
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.
एकदम खरं... भूक चाळवते असले फोटो बघितले की...
  • Log in or register to post comments
ख
खादाड Tue, 03/05/2013 - 11:19 नवीन
शेवटचे दोन फोटो एकदम मस्त !!!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 03/05/2013 - 11:24 नवीन
पेहलेही बॉल पे सिक्सर !!! :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/05/2013 - 11:27 नवीन
व्वा....!!! केवळ जब्रा फ्राय. सानिका स्वप्निल, गंपा, तुम्ही आणि अजून चार पाच माष्टर लोकांची एक पाककृतीची स्पर्धा घ्या. आणि मी एकटाच परिक्षक. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 03/05/2013 - 12:21 नवीन
एकच परीक्षक क्सा काय? सर्व स्पर्धांना आता तीन जजेस असतात. त्यामुळे मी दुसरा फिक्स. आता तिसरा नसला तरी माझा काही हट्टाग्रह नाही. तुम्ही "महाजज" व्हा हवं तर.. धागाकर्त्यासः वरचा "सा".. सांडाबबाडा परफॉर्मन्स. तोडलंत.. क्या बात.. क्या बात.. क्या बात...!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 03/05/2013 - 13:04 नवीन
ऐवजी महाजन चालेल काय ?
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 03/05/2013 - 13:05 नवीन
दोन अनुभवी जजेस असताना तिसरा कमी अनुभवी चालतो नं.. ;-) जबरदस्त पाककृती आणि फटू :) :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 03/05/2013 - 15:34 नवीन
जजेस च्या संख्यांवर काही बंधन नाहीये. आम्हीपण चालुन जावुसे वाटते. बाकी पाकृ लै म्हन्जे लैच खत्रा हाये.जीभ नुसती पाणावली आहे.केव्हा खाईन केव्हा खाईन असे झालेय नुसते. आल्या आल्या पदार्पणातच डब्बल-टिब्बल शेंचुरी मारलीय देवाने.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/05/2013 - 17:28 नवीन
मी एकटाच परिक्षक राहणार आहे, कृपया कोणीही विनंत्या बिनंत्या करु नये. पाककृत्यांवर मी निर्णय घ्यायला समर्थ आहे. पाककृती सादर केल्यानंतर पाककृती आणि भांडे स्पर्धकांनी सोडून गेले पाहिजे ही अट राहीलच. (मुंबैत या लोकांना बोलावून खर्रखर्र खादाडीचं नियोजन केलं पाहिजे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 03/05/2013 - 19:27 नवीन
ब्वॉर.. ठीक आहे. (आत्ता "हो" म्हणायला काय जाते आपले..? ;-))
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 03/05/2013 - 12:20 नवीन
हे काय वाढलयं? नुसते फोटो पाहुनच जळजळ झाली. आता ईनो घ्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 03/05/2013 - 12:37 नवीन
फोटोत ओवन ग्रिल वर ठवलेल्या पापलेट्ला जे मरिनेशन केले आहे ते इतके व्यवस्थित कसे? (एकदम प्लेन आणि घट्ट) मरिनेट करुन फ्रीज मधे ठेवल्याने तो घट्टपणा आला का?
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/06/2013 - 03:56 नवीन
मरिनेट करुन फ्रीज मध्ये ठेवल्याने थोडा घट्टपणा आला, त्यासाठीच १ तास फ्रीजमध्ये ठेवणे मस्ट!
  • Log in or register to post comments
च
चेतन माने Tue, 03/05/2013 - 12:59 नवीन
शेवटचे दोन फोटू किलर आहेत तोंपासू (च्यायला मंगळवारी वाचतोय )
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/05/2013 - 13:11 नवीन
लैच भारी !! अलिबागला 'फुलोरा' मधे खाल्ला होता ...अगदी तसाच आहे !! तोंपासु !!
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्या Tue, 03/05/2013 - 13:18 नवीन
माझि आवडती ङिश...
  • Log in or register to post comments
भ
भटक्या.. Tue, 03/05/2013 - 13:53 नवीन
क्या बात..!!
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 03/05/2013 - 15:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments
फ
फिरंगी Tue, 03/05/2013 - 15:40 नवीन
ओन्ली द बेस्ट................. खलास आइटम
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 03/05/2013 - 15:42 नवीन
अगदी नेत्रसुखद फोटो. चवही तशीच असणार! एक प्रामाणिक शंका: असा सबंध पापलेट खाताना तो डोळाही खातात का हो? मी कायम पापलेटचे तुकडेच खाल्लेत म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/06/2013 - 03:58 नवीन
धन्यवाद तिमाजी, हो सबंध पापलेट खाताना डोळाही खातो (निदान मी तरी!)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 03/05/2013 - 15:46 नवीन
आई ग्गं! भन्नाट!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 03/05/2013 - 15:57 नवीन
व्वा..............क्या बात है
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 03/05/2013 - 16:13 नवीन
काय भन्नाट दिसत आहेत अहाहा... पापलेट म्हणजे जीवकीप्राण जबरदस्त :)
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Tue, 03/05/2013 - 17:44 नवीन
मस्त पाकक्रुती . मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं .. बोटांची नखं एकदम नखशिकांत कापलेली असल्यामुळे हात एकदम स्वच्छ दिसतायत देवाचे . इतक्या स्वच्छ हातांनी जे बनवाल ते भारी . ( बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि .)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/06/2013 - 01:11 नवीन
अतिशय सहमत !
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/06/2013 - 07:15 नवीन
धन्यवाद लौंगी मिरची!!
बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि
:D १००% सहमत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/05/2013 - 17:54 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/05/2013 - 19:25 नवीन
हे पॉंफ्रेट म्हणजे काय असते,ते बघायला धागा उघडला,तर समोर हा मत्स्यावतार!!! सर्व इतके भारी दिसते आहे,पण जळ्ळे मेले (तंदूर/ओव्हन मधे) तरी ते मासे(च) शेवटी...त्यामुळे आमच्या साठी वाइड बॉल..!!! तरी पण एकंदर टापटीप/पद्धती/फोटूंमुळे कुणीतरी गंपाच्या जोडिचे अवतरले असे वाटायला लागलेय. :-) अ वांतर---अता चोरून खाइन म्हणतो एकदा...!!! ;)
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 03/06/2013 - 15:25 नवीन
चोरुन नको, विकत घेऊन खा! ;) :D
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Tue, 03/05/2013 - 21:12 नवीन
या रविवारिच बन्ग सहकर्याच्य घरी यान्चा रस्सा खाल्ला. आता हे करुन पहय्लाच हवे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/06/2013 - 01:28 नवीन
हाय! हाय! इधरकु प्रॉमफ्रेट मिलता नय. अब क्या करेंगे? देख देख के जान जायली हय. ये भगवान इसकु माफ कर, ये जानता नही ये क्या कर रहा है।
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 03/06/2013 - 04:14 नवीन
झकास !!! फोटो बघून पापलेट लगेच उचलून खावासा वाटतोय http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
म
मनुराणी Wed, 03/06/2013 - 04:40 नवीन
अतिशय तोंपासु पाककृती आहे.देवदत्त साहेब, घरी कधी येऊ आपल्या?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 03/06/2013 - 05:23 नवीन
नक्की करुन बघणार. माशाचं तोंडसुद्धा खायचं असतं का? मी नेहमी तो तुकडा टाकुन देते.
  • Log in or register to post comments
ह
हासिनी Wed, 03/06/2013 - 06:18 नवीन
अप्रतिम फोटो! मस्त पाकृ.करुन बघायलाच हवी!! :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 03/06/2013 - 22:15 नवीन
वॉव ! मिपावरची आत्तापर्यंतची जबरी सर्वात बेस्ट बेस्ट पाक्रु .... फोटो तं क्या केहेने आलाय देवामामा एक्दम दिल्खुश ! :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 03/08/2013 - 11:44 नवीन
पापलेटांनी नातं बदललं
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा