Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बीट भाजी

प
प्रतिज्ञा
Mon, 03/04/2013 - 16:27
साहित्य :- १ मोठा बीट, ३ तिखट हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून, कढीपत्ता १५ पान, कोथिंबीर १/२ वाटी स्वच्छ धुवून व चिरून , लसून ठेचून, जिरे, मोहरी, तेल, मीठ. कृती :- प्रथम बीटाची शेपूट व डोक कापून बीटाची वरची पातळ साल काढून घ्यायची. नंतर बीट स्वच्छ धुवून कोरडा करून किसणीवर किसून घ्या. कढईत तेलावर मोहरी व जीरा खमंग फोडणी करा नंतर त्यात टेच्लेला लसून, मिरची व कढीपत्ता खमंग परतवा. नंतर त्यात किसलेला बीट घालून परता. चवीपुरता मीठ घालून मंद आचेवर भाजी शिजवा. १५ मिनटात भाजी व्यवस्थित शिजते. शेवटी कोथांबीर घालून १ मिनिट परतावा. चविष्ट बीट भाजी तयार. टीप :- फोडणी खमंग व जरा जास्तच परतावी. आवडत असेल तर कढीपत्ता व कोथांबीर पण जास्त घालावा. त्याने भाजीला चव तर येतेच पण बीट व कोथांबीर या दोघांच्या रंगाच मेळ पण खूप चं छान जमतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6518 views

💬 प्रतिसाद
M
Mrunalini Mon, 03/04/2013 - 18:13 नवीन
पाकृ आवडली... पण ती बीटाची एक तुराट आणि गोड चव असते... ती चव बदलते का?
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 03/05/2013 - 03:09 नवीन
नक्किच करुन बघेल http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 03/05/2013 - 05:10 नवीन
साधी सोपी पाकृ. पुढच्या वेली फोटो पिकासावरून किंवा फ्लिकरवरून अपलोड करायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 03/05/2013 - 10:52 नवीन
पाकृ आवडली. मी बीट कुकरमध्ये 1 शिट्टी घेवून किसते व वरून फोडणी घालते. आता अश्याप्रकारे करून पाहीन.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 03/05/2013 - 11:01 नवीन
फोटो असता तर रंगाचा मेळ प्रत्यक्ष दिस्ला असता!!
  • Log in or register to post comments
श
श्रिया Tue, 03/05/2013 - 12:58 नवीन
बीट आवडत नाही, पण पाकृ चांगली वाटत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 03/05/2013 - 14:48 नवीन
मृणालिनी ..... बीटाची तूरट चव पूर्ण जाते पण गोडसर पणा थोडासा राहतो. त्यासाठीच मिरची जास्त तिखट वाली घ्यावी.
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 03/05/2013 - 14:50 नवीन
श्रिया ... बीट सहसा कोणालाही जास्त आवडत नाही ग... पण हि भाजी तुला नक्कीच
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 03/05/2013 - 14:52 नवीन
अनन्या , पैसा ..... अग मी इथे एकटीच राहते.... त्यामुळे फोटो काढण जमत नाय ग... पण पुढे नक्की प्रयत्न करेल....
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 03/05/2013 - 15:10 नवीन
त्रिवेणी ..... मला बीटाच जास्त काही येत नाही . हलवा, बर्फी डोसा न हि भाजी सोडून...:(... पण मी बर्याच वेळा बीट सरळ धुवून किसून मिक्सर मध्ये घालून वाटून घेते व चपाती बनवताना त्यात हे वाटण, मीठ व लागेल तेवढ पाणी घालून कणिक मळते व चपाती बनवते.... छान होते ग चपाती... रंग छान येतो बीट पण खाल्ल्या जात. त्यात ताटात कधी नव्हे ते रंगीत चपाती पण दिसते... तेवढाच समाधान ....
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 03/05/2013 - 15:23 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा