Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आंबा - पनीर बर्फि

द
दिपक.कुवेत
Sat, 03/02/2013 - 11:52
नमस्कार मंडळि, आता लवकरच भारतात आंब्याचा सीजन चालु होईल तेव्हा खालील बर्फि हि तमाम आंबा आणि पनीर प्रेमींसाठि. barfi साहित्यः १. आंब्याचा पल्प / ताजा रस - १.५ वाटि (ताजा असेल तर मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित) २. ताजं पनीर / क्युब्स - १ वाटि (क्रश करुन/किसुन) ३. खवा - १ वाटि ४. साखर किंवा नेस्ले स्वीट कंन्डेस्ड मिल्क - आवडिप्रमाणे कमी / जास्त (आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात) ५. तुप - १.५ पळि ६. वेलची पुड - १/२ चमचा ७. सजावटिसाठि बदाम, पिस्ता पुड किंवा तुमच्या आवडिचे ड्राय फ्रुटस कॄती: १. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत / पातेल्यात तुप तापले कि त्यात खवा आणि किसलेल पनीर घालुन परतावे २. खवा / पनीर चांगल परतल कि त्यात आंबा पल्प घालुन मिश्रण एकजीव करावे ३. सतत परतावे नाहितर पल्प, खव्यामुळे मिश्रण खाली चिकटण्याची शक्यता आहे ४. एक ८-१० मि. परतलं कि त्यात आवडिप्रमाणे साखर/कंन्डेस्ड मिल्क घालाव व परतत रहावे ५. एक ५-६ मिनटानी साखर विरघळली कि मिश्रणाचा गोळा होईल ६. आता त्यात वेलची पुड, आवडिचे ड्राय फ्रुटस घालुन एक ४-५ मि. गॅस बंद करावा ७. गरम मिश्रण तुप लावलेल्या थाळित काढावे व सगळिकडे एकसारखे पसरुन घ्यावे ८. पुर्ण गार झाल्यावर वडया ह्व्या त्या आकारात कापुन आंबामिश्रित पनीर बर्फिचा लुफ्त घ्या; इतरांना द्या :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8641 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/02/2013 - 12:00 नवीन
मस्त दिसतंय... अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Sat, 03/02/2013 - 12:09 नवीन
मस्त दिसते आहे बर्फी, अंबा, पनीर आणि खवा काँबीनेशन छानच. नक्की करुन बघणार.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/02/2013 - 12:12 नवीन
या दुष्टाला ब्यान करा रे!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/04/2013 - 03:53 नवीन
ही जाहीर मागणी मी दिपक यांच्या पहिल्याच धाग्यात केली होती, आता मा.संपादक माझ्याबरोबर आहेत म्हणल्यावर लगेच एक स्टेज,फ्लेक्स आणि टोप्या करुन घेतो आंदोलनासाठी.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 03/02/2013 - 15:02 नवीन
लगेच करून पाहीन.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 03/02/2013 - 15:20 नवीन
वा... छान.... तुम्हाला पनीर खुप आवडते वाटते.. ;)
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Sun, 03/03/2013 - 00:27 नवीन
सुंदर आणि नाजुक वडी पाहुनच तोंडात विरघळेल. इथे अमेरिकेत आंबा बाराही महीने मिळतो पण आपल्या आंब्यासारखी चव नसते. भारतीय ग्रोसरीस्टोअर्समध्ये उत्तम आंबरस डब्यातला मिळतो. तोच वापरु म्हणते. पाकृबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 03/03/2013 - 14:01 नवीन
आंबा - पनीर बर्फी छानच दिसत आहे:) सुंदर
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 03/03/2013 - 14:39 नवीन
फार जीवघेणा फटू!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Sun, 03/03/2013 - 14:46 नवीन
आहाहा !! कातिल फोटू आहे राव.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/03/2013 - 18:56 नवीन
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..............!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/04/2013 - 07:29 नवीन
आंबा आवडत फळ असल्याने हा पदार्थही आवडेल :) http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 03/04/2013 - 08:16 नवीन
लोक्स! करा, खा आणि खिलवा! मस्त खा आणि फिट रहा!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 03/04/2013 - 08:25 नवीन
अहाहा...............अतिशय सुंदर......आंबा बर्फी सगळ्यात जास्त आवडते.............:)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 03/04/2013 - 08:36 नवीन
झक्कास :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 03/04/2013 - 12:47 नवीन
मस्तंच! फोटू लय भारीय राव.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/04/2013 - 12:49 नवीन
मस्त फोटो! बर्फी उचलून खावीशी वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा