Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

दुधी ना मुठिया

स
सानिकास्वप्निल
Fri, 03/01/2013 - 00:57
साहित्यः १ वाटी किसलेला दुधी पाऊण वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी रवा १/२ वाटी बेसन १/२ टीस्पून हळद १ टीस्पून धणे-जीरेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १ टेस्पून आले+लसूण+मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून लिंबाचा रस १/४ टीस्पून साखर २-३ चिमूट खायचा सोडा मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून पांढरे तीळ १/४ टीस्पून हींग ५-६ कढीपत्ता . पाकृ: एका भांड्यात दुधीचा कीस,गव्हाचे पीठ, रवा, बेसन, हळद, धणे-जीरेपूड, बडीशेप पावडर, लिंबाचा रस, मीठ, साखर, खायचा सोडा, आले+लसूण+मिरची पेस्ट व थोडीशी कोथींबीर घालून एकत्र करुन सैलसर पीठ भिजवावे. दुधीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शक्यतो पीठ भिजवताना पाण्याचा वापर करु नका, अगदीच लागले तर किंचित पाणी घालून पीठ भिजवा. आता तेलाच्या हाताने छोटे-छोटे उंडे करुन घ्या. तेल लावलेल्या चाळणीवर तयार उंडे ठेवून,ती चाळणी पाणी घातलेल्या मोठ्या भांड्यात ठेवून, झाकून १५-२० मिनिटे वाफवून घ्या. इडलीपात्रात किंवा कुकरला ही वाफवून घेऊ शकता. वाफवलेले उंडे थोडे गार करुन घ्या. . गार झालेल्या उंड्यांचे स्लाईसेस करुन घ्या. कढईत तेल गरम करुन मोहरी-तीळ,हींग,कढीपत्त्याची फोडणी करुन घ्या . त्यात मुठियेचे स्लाईसेस व कोथींबीर घालून चांगले परता. . आवडत असल्यास वरुन थोडे सुके खोबरे घाला. . गरमा-गरम दुधी ना मुठिया खाण्यासाठी तयार आहे :) . नोटः अशाच पद्धतीने तुम्ही मुळ्याचे, कोबीचे,पालक-मेथी मिक्स किंवा नुसत्या मेथीचे मुठिये बनवू शकता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9826 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Fri, 03/01/2013 - 03:24 नवीन
हम्म. छान. उद्याच करण्याचा विचार आहे, पण कोबीचे. बाकी नेहमीचाच प्रतिसाद समजून घ्यावा.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 03/01/2013 - 03:41 नवीन
बाकी नेहमीचाच प्रतिसाद समजून घ्यावा.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 03/02/2013 - 21:19 नवीन
प्रतिसाद टंकण्याचे माझे कष्ट वाचवल्याबद्दल आभार्स... ;-)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 03/02/2013 - 04:52 नवीन
सध्या वाचनखूण साठवून ठेवतो.. एकदा हे पथ्याचे प्रकरण आटोपले की सवडीने दुधी ना मुठिया बनवेन..
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 03/02/2013 - 05:22 नवीन
चविष्ट आणि पौष्टीक पाककृती.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/02/2013 - 05:36 नवीन
आणखी काय म्हणू ग?
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Sat, 03/02/2013 - 10:36 नवीन
खुप छान, आवडले.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 03/02/2013 - 10:59 नवीन
एकदम मस्त, सोपी आणि चविष्ट पाकॄ.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 03/02/2013 - 15:12 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 03/02/2013 - 15:19 नवीन
मस्तच पाकृ गं.... करुन बघायला पाहिजे.. पण कोबीचे... इथे दुधी मिळणे मुश्किल.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 03/02/2013 - 18:46 नवीन
कहाँ गये वो लोग????????????
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/03/2013 - 19:04 नवीन
मला फोटू का दिसत नैत ? :-(
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 03/04/2013 - 04:25 नवीन
कोबीचे मुठीये करून बघितले. खूपच चांगल्या चवीचे झाले होते.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/04/2013 - 07:19 नवीन
मुलांना डब्याला द्यायला पण छान !! पाककृती आणि फोटो मस्तच !!! http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 03/04/2013 - 08:34 नवीन
कधीपासून ही रेसिपी हवी होती गं......... एकदम झकास :) लग्गेच करुन बघणार :)
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Mon, 03/04/2013 - 15:28 नवीन
मेथीचे केलेले आहेत..आता असेही करुन बघते...
  • Log in or register to post comments
ख
खादाड Tue, 03/05/2013 - 10:50 नवीन
मुठीये करून बघितले. खूपच चांगल्या चवीचे झाले होते. आणि विषेश म्हणजे शेजारी राहाण्यार्या गुजराथी वहिनी आहेत त्यांना ही आवडले !! धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Tue, 03/05/2013 - 12:31 नवीन
नेहमीप्रमाणेच छान रेसीपी, छान फोटो..
  • Log in or register to post comments
श
श्रिया Tue, 03/05/2013 - 12:56 नवीन
मस्त आहे रेसिपी, शेवटचा फोटो जबरदस्त!
  • Log in or register to post comments
व
वैशाली१ Wed, 03/06/2013 - 06:14 नवीन
माझी आई असेच साहित्य वापरून मुठीये बनवते . पण कणिक जाडसर वापरते . ती भाजून घेते आणि कणिक थंड झाल्यावर त्यात बाकीचे साहित्य घालते. मग फ्राय pan वर कडेने तेल सोडून भाजते . पण ती वाफवून घेत नाही. असेही खमंग आणि खरपूस खायला छान लागतात.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 07/18/2014 - 19:50 नवीन
सुंदर फोटो व उत्कॄष्ट आरोग्यदायी पाकॄ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा