सूप अलॊनीयो ग्रातीने (फ्रेंच आनियन सुप ग्रातीने)
साहित्यः
कांदे - ७-८ मध्यम आकाराचे
लसुण - ३ पाकळ्या
बेसिल - १ छोटा चमचा
तेजपान - २
काळि मिरी पावडर - १ चमचा
फ्रेंच बगेट - १
रेड/व्हाईट वाईन - ४ चमचे
चिकन स्टॉक - ४ कप
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
बटर - १ चमचा
चीज - १ वाटी (२-३ वेगवेगळे चीज. मी या रेसिपी साठी ३ वेगवेगळ्या प्रकाराचे nonsalty स्विस व डच चीज वापरले आहे)
मिठ चवीनुसार
Ovenproof २ बाऊल / मग
कृती:
१. कांदे लांब कापुन घ्यावेत. लसुण बारीक चिरुन घ्यावा.
२. कढईत ऑलिव्ह ऑईल व बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता व लसुण टाकुन १ मिनिट परतावे.
३. त्यात लांब चिरलेला कांदा, बेसिल, काळि मिरी पावडर व थोडे मिठ टाकुन, कांदा ब्राउन रंगाचा होई पर्यंत परतावे.
४. कांदा परतल्यावर त्यात रेड वाईन व चिकन स्टॉ़क टाकुन १५-२० मिनिटे मंद गॅसवर उकळु द्यावे.
५. तो पर्यंत ओव्हन मधे ९० degree celcius वर फ्रेंच बगेटचे तुकडे करुन, टोस्ट करुन घ्यावेत.
६. सुप साठी जे Ovenproof बाऊल किंवा मग घेतले आहेत, त्याच्या तळाशी २ टोस्ट ठेवुन त्यावर थोडे चीज पसरावे.
७. त्यावर तयार झालेल्या सुपामधील १ कप सुप त्यात ओतावे. वरतुन परत २ टोस्ट ठेवुन, वरुन चीज पसरावे.
८. Oven १८० temp ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. त्यात हे सुप भरलेले कप १०-१५ मिनिटे किंवा वरील चीज melt होई पर्यंत ठेवावेत.
९. १०-१५ मिनिटांनी कप बाहेर काढावेत. ५ मिनिटे तसेच ठेवुन द्यावेत.
१०. ५ मिनिटांनी गरमा-गरम फ्रेंच आनियन सुप पिण्यासाठी तयार आहे.

४. कांदा परतल्यावर त्यात रेड वाईन व चिकन स्टॉ़क टाकुन १५-२० मिनिटे मंद गॅसवर उकळु द्यावे.
५. तो पर्यंत ओव्हन मधे ९० degree celcius वर फ्रेंच बगेटचे तुकडे करुन, टोस्ट करुन घ्यावेत.
६. सुप साठी जे Ovenproof बाऊल किंवा मग घेतले आहेत, त्याच्या तळाशी २ टोस्ट ठेवुन त्यावर थोडे चीज पसरावे.
७. त्यावर तयार झालेल्या सुपामधील १ कप सुप त्यात ओतावे. वरतुन परत २ टोस्ट ठेवुन, वरुन चीज पसरावे.
८. Oven १८० temp ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. त्यात हे सुप भरलेले कप १०-१५ मिनिटे किंवा वरील चीज melt होई पर्यंत ठेवावेत.
९. १०-१५ मिनिटांनी कप बाहेर काढावेत. ५ मिनिटे तसेच ठेवुन द्यावेत.
१०. ५ मिनिटांनी गरमा-गरम फ्रेंच आनियन सुप पिण्यासाठी तयार आहे.

💬 प्रतिसाद
र
रेवती
Tue, 02/26/2013 - 23:39
नवीन
आज बर्फाचे वादळ असताना ही पाकृ समजली आहे. चिकन स्टॉक वापरण्याऐवजी व्हेजी. ब्रॉथ वापरला तर चालेल असे वाटते. रेसिपी अगदी आवडली. फोटू आवडले. कांदे हे पांढरे, लाल कि पिवळे घ्यावेत?
- Log in or register to post comments
M
Mrunalini
Tue, 02/26/2013 - 23:45
नवीन
सुप करीता, आवडिचा कोणताही ब्रॉथ व कांदे वापरु शकता :)
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Wed, 02/27/2013 - 00:00
नवीन
फ्रेंच अनियन सूपची पाकृ आवडली, छानच आहे :)
शेवटचा फोटो तर अप्रतिम :) पण सूप ज्यात सर्व्ह केले ते कप खास करुन जास्त आवडले ;)
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Wed, 02/27/2013 - 10:48
नवीन
पाकृ तर आवडलीच पण कप खूप जास्त आवडले. सानिकाकडच्या सारखंच तुझंही भांड्यांचं कलेक्शन छान आहे गं :)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 02/27/2013 - 00:03
नवीन
मलापण चपाती भाजीचा हल्ली कंटाळा आलाय. हे नुसत खाल्ल की पोट भरेल का? तस असेल तर बनवते आता.
अरे हो! माझाच सुर लावुन बसले. फोटोज अन रेसेपि फार छान.
- Log in or register to post comments
र
रश्मि दाते
Wed, 02/27/2013 - 03:23
नवीन
माझे आवड्ते सुप आहे हे.म्स्त रेसेपी आणि फोटो.धन्यवाद.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 02/27/2013 - 07:40
नवीन
रोचक रेसिपी आहे. व्हेज पद्धतीने बनवता येईल तर बघतो
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 02/27/2013 - 08:27
नवीन
भारीचे पदार्थ. (सूपसारखा प्रवाही दिसत नसल्याने पदार्थ म्हटले आहे.)
फोटू क्लास आहेत.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Wed, 02/27/2013 - 08:46
नवीन
फ्रेंच आनियन सुप अस बनवतात तर! पण आपला पास...एक तर ओव्हन नाहि आणि दिलेलं चीजच प्रमाण पहाता डाएट किती दिवस पुढे ढकलावं लागेल देव जाणे! फोटो मात्र खासचं!
- Log in or register to post comments
ल
लिलि काळे
Wed, 02/27/2013 - 08:53
नवीन
वाव!सो यम्मी!
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 02/27/2013 - 15:20
नवीन
कांद्याचं कोणतं तरी हॉरीबल सूप प्याले होते काही वर्षांपूर्वी. धसका घेतला आहे तेव्हापासून.
- Log in or register to post comments
M
Mrunalini
गुरुवार, 02/28/2013 - 09:00
नवीन
सगळ्यांचे धन्यवाद!!! :)
तुम्ही हेच सुप व्हेजिटेबल स्टॉक वापरुन सुद्धा करु शकता.
- Log in or register to post comments
व
वैशाली१
गुरुवार, 02/28/2013 - 13:21
नवीन
पाककृती आणि फोटो खासच आले आहेत.
शेवटच्या कपाचा फोटो पाहून कोणा कमरेवर हात ठेऊन उभी असलेल्या ठमा काकूची आठवण झाली.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 03/03/2013 - 20:41
नवीन
मस्तच आहे. नक्की करुन बघेन.
याच्यात कदाचित मश्रुम्स् पण चांगले लागतील.
कान्द्याच्या पातीचे दूध घालून एक सूप करतात. ते कसे करतात कुणी सांगेल का?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 03/04/2013 - 02:06
नवीन
मस्त! मस्त!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 03/04/2013 - 05:40
नवीन
आज पर्यंत खाल्लेले/प्यायलेले फ्रेन्च ओनियन सुप प्रवाहीच होते. त्यात चिझ लावलेले तळलेले पावचे तुकडे टाकून खाल्लं जातं. फार मस्त लागतं.
पाककृती चविष्ट दिसतेच आहे. चिझमुळे आकर्षकहि दिसते आहे.
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Mon, 03/04/2013 - 07:27
नवीन
पाककृती आनि फोटो दोघही कातिल !!!!
http://mejwani.in/
- Log in or register to post comments