Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पनिर - पिस्ता हरयाली

द
दिपक.कुवेत
Wed, 02/20/2013 - 08:19
Pista 1 साहित्यः १. तेल - २ पळ्या २. आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा ३. पनिर क्युब्स / ताज पनिर ४. फ्रेश किम / मलई - २ चमचे ५. कसुरी मेथी - १ चमचा (हातानी पुड्/क्रश करुन गाळुन घेणे म्हणजे खाताना कचकच लागणार नाहि) ६. व्हईट पेस्ट - १/२ वाटि - १ मध्यम कांदा, ५ काजु, २ चमचे मगज बी कुकर मधे एक शीटि देउन उकडणे. गार झाल्यावर मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे ७. पिस्ता पेस्ट - १/२ वाटि - २०-२५ सोललेले पिस्ते पाण्यात टाकुन एक १० मि. उकळणे व लगेच गार पाण्यात टाकणे. गार झाल्यावर वरचं साल काढुन मुठभर कोथींबिर्/पुदिना आणि १ हिरवी मिरची घेउन मिक्सर मधे बारिक पेस्ट करणे. (मिरच्यांच प्रमाण त्यांच्या तिखटपणानुसार ठरवावे) ८. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध १/२ चमचा ९. सजावटिसाठि आल्याच्या पातळ काडया कॄती: १. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करा. २. तेल गरम झाले कि त्यात आलं/लसुण/मिरची पेस्ट टाकुन परता ३. पेस्टचा कच्चा वास गेला कि त्यात तयार केलेली व्हाईट पेस्ट टाका व सतत परतत रहा. काजु मुळे पेस्ट खाली लागण्याची शक्यता आहे ४. आता व्हाईट पेस्ट ब्राउन झाली कि त्यात तयार केलेली पिस्त्याची पेस्ट टाका ५. ग्रेव्हि चांगली परतली कि त्याचा गोळा होईल आणि बाजुच्या कडेने तेल सुटु लागेल. गरज वाटल्यास थोडे पाणि टाका म्हणजे ग्रेव्हि खाली लागणार नाहि ६. आता त्यात पनिर क्युब्स टाका. आवडत असल्यास पनिर मिक्स करण्याआधी क्युब्स थोडे शॅलो फ्राय करु शकता ७. एक ५ मि. ग्रेव्हि चांगली परतली कि कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, साखर किंवा मध घालुन गॅस बंद करा ८. फ्रेश क्रिम/मलई घालुन भाजी हलक्या हाताने मिक्स करा ९. सर्विग साठि वरुन पातळ कापलेल्या आल्याच्या काडया घाला आणि पोळि, फुलके, नान, रुमाली रोटि बरोबर सर्व करा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7565 views

💬 प्रतिसाद
अ
अक्षया Wed, 02/20/2013 - 08:25 नवीन
दिसायला जीतकी छान आहे चवीला तितकीच छान असणार. नक्कीच करुन बघणार. :)
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Wed, 02/20/2013 - 08:34 नवीन
मस्त आहे पाककृती. खुपच सुंदर. (ते तेव्हढे फुलके आणि रुमाली रोटि यांची पाककृती दिली असती तर आम्हां नवशिक्यांसाठी बरे झाले असते. आशा करते कि त्यांची पाककृती लवकरच द्याल.)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 02/20/2013 - 08:41 नवीन
अमिता ते तेव्हढे आयते आण....मी त्यात अगदिच निरक्षर आहे :))
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 02/20/2013 - 08:45 नवीन
पनीर इज माय फेवरेट :) यमयमयम !
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 02/20/2013 - 09:50 नवीन
तोपसू
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/20/2013 - 09:51 नवीन
एव्हढी चांगली पाककृती...आणी फोटू का नैत??? :-( फोटू पायजे,त्याशिवाय प्रति साद नै देणार :-(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/20/2013 - 09:56 नवीन
आय माय स्वारी.......... अता दिसला फोटू...अदुगर दिस्लाच नव्हता :-)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता गुरुवार, 02/21/2013 - 00:12 नवीन
फटू न पाहताच प्रतिक्रिया देणारे-- अत्रुप्त आत्मा !!!:) :)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 02/20/2013 - 09:58 नवीन
ज ब री !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/20/2013 - 09:58 नवीन
च्यायला,अता परतिसाद द्यायचा र्‍हायला..... लै लै झ्याक दिसायलय...त्वांड घालुन नुस्तच खावसं वाटतय. :-)
  • Log in or register to post comments
न
नानबा Wed, 02/20/2013 - 10:18 नवीन
जब्राट... ते दिसायलाच येवढं भारी दिस्तयं तर खैला तर जामच खत्रा असणार. बोंबला आम्हांला चहा आणि पोहे सोडले तर असलं काहीच येत नै बनवायला.. :(
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 02/20/2013 - 10:21 नवीन
खंग्री पाकृ आहे एकदम. आम्ही तुमचे फ्यान झालो दीपकराव. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/20/2013 - 10:25 नवीन
काय मस्त पाकृ आहे! फोटो नेहमीप्रमाणेच लाजवाब!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 02/20/2013 - 10:26 नवीन
पाकृ हटके आहे. पण येवढे पिस्ते वाटून त्याला फोडणी द्यायची? तिखटात पिस्ते लागत असतील छान पण तुमची पनीर आणि पिस्त्याची याआधीची गोडाची पाकृ अधिक उजवी वाटली. गेल्या वीकांतास करूनही पाह्यली. ट्रायल बेसिसवर केल्यामुळे फोटु काढेस्तवर शिल्लक राह्यली नाही. सगळ्यांना आवडली, पण मला मात्र पनीर साखरेसोबत पाचेक मिनीटं शिजवलं तर चव आणखी वाढेलसं वाटलं.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 02/20/2013 - 10:36 नवीन
मलाहि आधि तसच वाटल होत पण केल्यावर चवीला मस्त झाली. हव असल्यास पिस्ते कमी घाला. गोडाची पाकृ केलीत; धन्यवाद. पण माझ्या मते पनीर साखरेसोबत शिजवल तर साखरेचा पाक होईल आणि मग कदाचीत मिश्रण घट्ट होईल...जाणकारांनी कॄपया मार्ग्दर्शन करावे.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Wed, 02/20/2013 - 11:47 नवीन
भन्नाट पाकृ.फोटो पाहुन लगेच खावीशी वाटते.करून बघायलाच हवी.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 02/20/2013 - 12:47 नवीन
छान पाकृ आणी फोटो नेहमीप्रमाणेच :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 02/20/2013 - 12:52 नवीन
आमी बी तुमच्या पाककृतींचे पंखा झालो.
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Wed, 02/20/2013 - 12:54 नवीन
छान,नक्कीच करुन बघणार
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 02/20/2013 - 12:55 नवीन
जबरा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/20/2013 - 13:06 नवीन
मस्तच ! एक प्रश्न ते शिर्षकात हरयाली च्या ऐवजी हरियाली असे हवे का ?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 02/20/2013 - 13:28 नवीन
कुणि बदल करेल काय? धन्यु लोक्स...करा, खिलवा आणि कळवा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/20/2013 - 14:58 नवीन
हो रे बाणा.....(एकेरी चालेल ना?) चालेल काय,धावेल ! ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 02/20/2013 - 14:15 नवीन
तोपासु.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/20/2013 - 23:16 नवीन
करुन बघायला पाहिजे... पिस्ता मुळे वेगळीच चव येईल पनीरला....
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 02/22/2013 - 11:42 नवीन
फोटो आणि पाक्रु दोन्ही जबराट आहेत
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 02/22/2013 - 17:30 नवीन
मेथी व पनीर यांचे सर्व प्रकार बाय डीफॉल्ट आवडतात.. छान पाककृतीबद्दल धन्यवाद. ह्या विकांताला करून बघणार ... पण ते व्हाईट पेस्ट मधलं " मगज बी " म्हणजे काय... तेव्हढं सांगा.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 02/22/2013 - 18:53 नवीन
आजकाल अनेक मॉलमधे मिळ्ते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा