Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

नाचणीचे पौष्टीक लाडू

अ
अनन्न्या
Fri, 02/15/2013 - 12:14
साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी(अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार. क्रुती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजुला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही. हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात. ladu

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13345 views

💬 प्रतिसाद
म
मन१ Fri, 02/15/2013 - 12:27 नवीन
माझा प्रचंड आवडता प्रकार हा. पण मी पुण्यात सदैव दुकानातून्,हलवायांकडून गृहौद्योगवाल्यांकडून आणलेले लाडूच खायचो हे.
  • Log in or register to post comments
श
श्रिया Fri, 02/15/2013 - 17:26 नवीन
छान आहे रेसिपी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/15/2013 - 17:30 नवीन
पाकृ आवडली. सोपी आणि मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 02/15/2013 - 17:32 नवीन
स्वादिष्ट आणि पौष्टीक पाकृ. धन्यवाद अनन्यातै. @मनराव: हे लाडू विकतपण मिळतात पुण्यात सर्वत्र? चांगले आहे खरच.
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 02/15/2013 - 18:24 नवीन
पुण्यात मिळतात.. आणि बरे असतात पुण्याच्या मानाने ....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/15/2013 - 19:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sat, 02/16/2013 - 09:18 नवीन
पौष्टीक पाकृ नाचणीचे लाडू आवडतात, अशा प्रकारे करुन बघेन :) धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 02/16/2013 - 09:21 नवीन
आता ईथे उन्हाळा चालु होइल तेव्हा नक्कि करुन पाहिन....धन्यवाद अनन्न्या
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/16/2013 - 11:17 नवीन
करुन बघायला पाहिजे.. पण इथे नाचणीचे पिठ मिळणे मुश्कील.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 02/16/2013 - 12:34 नवीन
फार फार धन्यवाद, ते दोन केक आणि अजुन ते दि.कु.चं पिस्त्याचं काहीतरी, बापरे, मिपा कसलं फॅटी झालं होतं मागच्या आठवडयात. अगदी प्रतिसाद लिहिताना पण धाप लागायची.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 02/16/2013 - 13:03 नवीन
सुरेख पाकृ. ह्या भारतवारीत ह्या लाडवांची खरेदी पक्की.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/16/2013 - 14:33 नवीन
नाचणी ला सहज सहजी कीड लागत नाही.आणि ती अशीच ठेवली तरी त्याल वास लागत नाही .त्यामुळे लाडू बरॆच दिवस टिकतात नाचणी चे पीक अगदी कमी पावसात किंवा निकृष्ट जमिनीत हि येते त्यात चरबीचे प्रमाण फक्त १.५ टक्के आहे त्यामुळे स्थूल (जाड्या) माणसाना देण्यास योग्य. पिष्टमय पदार्थ ८८ % आणि प्रथिने ७.५% असतात सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात् ३७५ मिली ग्राम कल्शियम असते. म्हणजे मुलांना किंवा स्त्रियांना १ लाडू दिल्यास त्यांच्या दिवसभराच्या कल्शियमची गरज भागू शकते.ब जीवनसत्त्व सुद्धा भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे लाडू वाढत्या वयाच्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 02/16/2013 - 14:47 नवीन
सर्वांचे आभार!!
  • Log in or register to post comments
व
विलासिनि Mon, 02/18/2013 - 07:56 नवीन
पोहे घातल्यामुळे टिकावूपणात काही फरक पडेल का?
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 02/18/2013 - 12:32 नवीन
बेसनाच्या लाड्वासारखेच टिकतात!! माझ्याकडे अशी वेळच येत नाही कारण आमचे एकत्र कुटुंब आहे. दोन-तीन दिवसात संपतात सगळे लाडू!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 02/18/2013 - 10:54 नवीन
लाडू पौष्टिक आहेत खरंच. मला नाचणीची घट्ट आंबील जास्त आवडते...पचायलाही हलकी.
  • Log in or register to post comments
B
bela Mon, 02/18/2013 - 12:52 नवीन
यात कोको पावडर देखिल छान लागते
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 02/18/2013 - 20:53 नवीन
अरे वा....... आवडली ही पाककृती.....करुन बघेन नक्की :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा