Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

प्रेमदिनानिमित्त खास ब्लॅक फॉरेस्ट रसगुल्ला केक

स
सानिकास्वप्निल
गुरुवार, 02/14/2013 - 21:12
. साहित्यः २ रेडीमेड चॉक्लेट स्पाँज केक मिक्स (हे नाही मिळाल्यास बेसीक स्पाँज केकची पाकृ खाली दिली आहे) १२० मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे) ४ अंडी फ्रेश क्रीम २-३ चमचे साखर व्हॅनिला एसेन्स चेरीज सजावटसाठी किसलेले चॉक्लेट केशर रसगुल्ले (तुम्ही पांढरे रसगुल्ले ही वापरु शकता) . पाकृ: ओव्हन १७० डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हीट करा. एका मिक्सींग बाऊल मध्ये एक पॅकेट केक मिक्स, २ अंडी व १२० मिली पाणी एकत्र करुन फेटून घेणे. केक टीनला बेकींग पेपर लावून घ्यावा किंवा बटर ने ग्रीज करून घ्यावे. टीनमध्ये फेटलेले केकचे मिश्रण ओतावे व प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक टीन ठेवून २०-२५ मिनिटे बेक करणे. विणायची सुई घालून पहावी, सुई स्वच्छ निघाली म्हणजे केक तयार झाला समजावे. केकला कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवावे. . केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे. एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा. त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते) आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे. पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे. . केक पूर्ण गार झाला की त्यावरचा क्रस्टी भाग कापून घ्यायचा आहे, असे केल्याने केक एक-मेकांवर ठेवायाला सोपे जाते. केकला केक बोर्ड्वर ठेवून त्यावर रसगुल्ल्याचा पाक थोडा थोडा करुन घालावा, म्हणजे केक मॉईस्ट राहील. केकवर फेटलेले क्रीम पसरवून घ्यावे. त्यावर अर्धे कापलेले रसगुल्ले व चेरीज लावून घ्यावे. थोडे किसलेले चॉक्लेट लावावे. आता त्यावर केकचा दुसरा भाग हलक्या हाताने दाबून ठेवावा व पुन्हा त्यावर रसगुल्ल्याचा पाक लावून घ्यावा. केकला सगळीकढून क्रीम लावून घ्यावे. कडेला किसलेले चॉक्लेट लावून घ्यावे. . मी थोडेसे फेटलेले क्रीम पायपींग बॅगमध्ये काढून केकवर सजावट केली. वर रसगुल्ले, चेरीज व चॉक्लेट ने सजावट करावी. तयार केक फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. . हा केक तुम्ही आज तुमच्या प्रियजनांबरोबर प्रेमदिन मस्त साजरा करून खा :) . . नोटः ज्यांना केक मिक्स सहज उपलब्ध नाही त्यांनी घरीच स्पाँज केकचे मिश्रण तयार करावे. त्यांनी १७५ ग्राम मैदा चाळून घ्यावा. १२५ ग्राम बटर आणी १२५ ग्राम साखर एकत्र हलके होईपर्यंत फेटावे. त्यात एक-एक करत २ अंडी घालून चांगले फेटावे. १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा फेटावे. त्यात चाळून घेतलेला मैदा ५ टेस्पून कोको पावडर थोडे थोडे करून घालावे व मिश्रण फोल्ड करावे. पुढिल कृती वर दिल्याप्रमाणे करावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13099 views

💬 प्रतिसाद
M
Mrunalini गुरुवार, 02/14/2013 - 21:19 नवीन
सही.... छान दिसतोय केक... Happy valentines day!!! :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/14/2013 - 21:21 नवीन
सानिकातै तुमच्या घड्याळात अजून आहे प्रेमदिन. ;) तरी पण तू एवढ्या प्रेमाने आणि नेहमीच्याच सुगरणपणाने दिलेल्या पाकृ बद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच सॉल्ल्लीड फोटो आणि रेसेपी. :) आम्ही परत आजपण प्रेमदिन साजरा करु :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/14/2013 - 22:10 नवीन
सानिकातैच्या पाकृ निर्विवादपणे अप्रतिम असतातच पण मला जास्त कौतुक वाटते ते प्रेझेंटेशनचे. काय एकेक अ‍ॅक्सेसेरीज वापरलेल्या असतात आणि त्यापण रेसेपीला अगदी सूट होतील अशा. काय जबरा त्यांचे काम्पोझीशन दिसते. कलरस्कीम, लाईट आणि टेक्श्चर यातून एकदम अप्रतिम डिझाइनिंग सेन्स जाणवतो. आत्तापर्यंतच्या सगळ्या पाकृच्या फायनल इमेज पार ईंटरनॅशनल ब्रोशर्स च्या तोडीच्या आहेत.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 02/15/2013 - 13:38 नवीन
आणखी काय बोलणार..
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 02/15/2013 - 07:48 नवीन
पाकृ डकवली तेव्हा राणीच्या देशात प्रेमदिन सुरुच होता रे अभ्या :) धन्यवाद रे :)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 02/14/2013 - 21:54 नवीन
पाहता हा केक साला, कलिजा खलास झाला| भरविता आपुलकिने तिजला, प्रेमोमाळे वाहती||
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/14/2013 - 22:28 नवीन
खल्लास!! मिपाकरांची एखादी पंगत तुमच्या घरी पडावी अशी त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/15/2013 - 20:13 नवीन
@मिपाकरांची एखादी पंगत तुमच्या घरी पडावी++++++++१११११११११११ येस येस.......... हम भी किसन द्येव के साथ, भारी मात्रा ;-) मे सेहेमत है। Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/14/2013 - 23:22 नवीन
आता काय बरं म्हणू! ;) कौतुक करायला शब्दच शिल्लक ठेवले नाहीस तू! अगदी वेगळा आणि भारी केक! ग्रेट! अश्या केकची कल्पना कधीही केली नव्हती त्यामुळे आवाक झाले.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/14/2013 - 23:50 नवीन
सानिका काय आत्मविश्वासाने आपण सादर करता पाकृ. फारच छान सादरीकरण. १००/१०० मार्क. केक सुद्धा आवडला.
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 02/15/2013 - 02:38 नवीन
क्लास !!! व्हिडिओ खूप उपयुक्त!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 02/15/2013 - 02:52 नवीन
फारच छान!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Fri, 02/15/2013 - 03:45 नवीन
सानिका, हा वेगळ्या पध्दतीचा केक अगदी ईस्ट आणि वेस्टचे फुजन वाटले. छानदार आणि निगुतीने नटवलेला केक आवडला.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 02/15/2013 - 03:54 नवीन
ज ब र द स्त...!!! दुसरे शब्दचं नाहीत. :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/15/2013 - 03:57 नवीन
झक्कास...रसगुल्ला आणि केक वर जिवापाड प्रेम आहे माझं. :)...दोन्ही एकदम मिळत असेल तर ते सोन्याहुन पिवळंचं :)..!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/15/2013 - 04:03 नवीन
जहबर्‍या
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 02/15/2013 - 04:09 नवीन
लई भारी, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 02/15/2013 - 04:57 नवीन
खल्लास आणि क्लास.. - पिंगू
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 02/15/2013 - 05:11 नवीन
ए सानिका .. पूढच्या जन्मासाठी स्वप्निल ची च्छुट्टी बर्का :-/ माझा नंबर लावुन ठेवलाय हं मी .... च्यायला या जन्मी काश मय लडका व्होती :-/ जेवढी छान दिसतेस तेवढा सुंदर केक आहे :) हॅप्पी वॅलेन्टाइन्स डे डीअर :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Fri, 02/15/2013 - 05:15 नवीन
केक आणि रसगुल्ला याचे हे अप्रतिम कोम्बिनेशन्...आहाहा... आणि केकच्या सूंदर सजावटीचे फोटो,जबरदस्त खरच खूप आवडले...मी नक्की करून बघेन हा केक धन्यवाद सानिकाताई
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/15/2013 - 05:55 नवीन
अत्यंत सुंदर केक दिसतो आहे, प्रेझेंटेशनविषयी वेगळं बोलायलाच नको. झक्कासच. रसगुल्ला आणि तत्सम अन्य चोथट्ट मिठायांशी अजिबात जमत नसल्याने तेवढा भाग वगळून बाकीचा केक आवडला. या बंगाल्यांना दूध पाहताच ते आटवण्याऐवजी फाडावं असं का वाटतं कोण जाणे.. असं (बहुधा पुलंनी) म्हटलं आहे ते योग्यच ... :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/15/2013 - 05:57 नवीन
केक छान दिसतोय. मी ब्लॅक फॉरेस्ट अनेकदा करतो. हे इम्प्रोवायझेशन ट्राय करायला हवं.. बाकी, 'फूड फोटोग्राफी' वरसुद्धा एक स्वतंत्र लेख येऊ दे ही विनंती! काय क्लास फोटोज असतात हो!
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Fri, 02/15/2013 - 06:27 नवीन
खुप छान केक आहे
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/15/2013 - 06:49 नवीन
अगदी परिपूर्ण कलाकृती!
  • Log in or register to post comments
N
nishant Fri, 02/15/2013 - 08:31 नवीन
शेवटून दुसरा फोटो जब्राट आलाय! :) खास आवडला..
  • Log in or register to post comments
ह
हासिनी Fri, 02/15/2013 - 08:43 नवीन
जबरदस्त दिसतोय केक! प्रेझेंटेशन अगदी जबरा!! :)
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 02/15/2013 - 08:46 नवीन
हे असले केक शॉपमध्ये नसतात का हो.. काय जबरी दिसत आहे..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 02/15/2013 - 08:52 नवीन
अग्गागागागागा!! ही अशी रेसिपी आणि मुख्य म्हंजे असे फोटो डकवल्याबद्दल तुमचा प्रेमळ निषेध!! :D
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Fri, 02/15/2013 - 09:19 नवीन
खुपच छान झालाय केक. लगेच खावासा वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 02/15/2013 - 10:09 नवीन
जबरदस्त प्रेझेंटेशन जानेमन :) काय मस्त झालाय केक. तू फार सुरेख बोलतेस....गोड आहे आवाज तुझा. शब्दफेक सुद्धा सही !! ओव्हरऑल......अफलातून .... जियो :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/15/2013 - 10:29 नवीन
ख ला स ................................................................
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 02/15/2013 - 10:41 नवीन
माझीही स्थिती रेवतीताईसारखी झालीये. आता आणखी काही शब्दच उरले नाहियेत कौतुक करायला. एकदा महिनाभराची सुटी घेवून तुझ्याकडे रहायला येईन आणि जाडजूड होवूनच परत जाईन ;)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 02/15/2013 - 10:42 नवीन
___/\___ आमचा दंडवत :)
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Fri, 02/15/2013 - 11:06 नवीन
दर वेळी काय लिहायचे प्रश्न पडतो. शब्द नाहीत. :)
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Fri, 02/15/2013 - 11:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 02/15/2013 - 12:05 नवीन
मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं ट्रेनिंग सेंटर आहे नि त्यावर आम्ही लवकरच कारवाई करु... - प्यारेलकुमार शिंदे. (५० रावांच्या प्रतिक्रियेशी सहमत -प्यारे) मिसळपाव खाद्योत्सव ठेवा रे कुणीतरी!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/15/2013 - 12:05 नवीन
प्रेमदिन 'गोड' झाला..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/15/2013 - 14:55 नवीन
___/\___ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 02/16/2013 - 07:07 नवीन
तुम्ही ह्या पा़कृ बरोबर वजन कमी कसे करावे ह्याचे पण फोटो डकवत चला.असले फोटो बघुन हालत खराब होते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Sat, 02/16/2013 - 07:09 नवीन
खासच वाटतोय ! करायला हवा. (आय मीन, सांगायला हवं करायला :प)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 02/16/2013 - 09:17 नवीन
रसगुल्ला हा केकचा मुख्य घटक होउ शकतो हि कल्पनाच खुप नविन आहे. खुप छान सानिका. खरच तु़झ्या ओव्हरऑल प्रेझंटेशनपुढे शब्दच सुचत नाहित.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 02/16/2013 - 10:30 नवीन
व्वा व्वा... एकदम झक्कास :) :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 02/17/2013 - 15:57 नवीन
केक छान आहे, वेगळेपणा आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आरोही Sat, 02/14/2015 - 08:23 नवीन
Image removed. आज केलाय !!खूप धन्यवाद या सानिका मस्त केक बद्दल !!
  • Log in or register to post comments
आ
आरोही Sat, 02/14/2015 - 08:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sat, 02/14/2015 - 11:57 नवीन
अगदी सुरेख दिसतोय केक आरोही ....क्लास!! इथे आवर्जून कळवल्याबद्दल अनेक धन्यवाद व शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 02/14/2015 - 10:00 नवीन
सही दिसतोय केक
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा