पनीर - पिस्ता बहार...
नमस्कार मंडळि,
कालची गणेश जयंती आणि आजचा प्रेमदिवस हा दुहेरी संयोग साधुन खालील पाकॄ केली....बाप्पा आणि बायको दोघेहि खुश......अरे हाय काय नाय काय!
सर्व मिपाकरांना प्रेमदिनाच्या हर्दिक शुभेच्छा!
साहित्यः
१. किसलेलं पनीर - २ वाटया
२. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त
३. वेलची पुड - पाव चमचा
४. पिस्ता पुड - १ वाटि मध्यम
५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि
६. बदाम काप - सजावटिसाठि
कॄती:
१. पनीर ताजं मिळालं तर उत्तम. मी अमुलचे फ्रोजन क्युब्स वापरले. फ्रोजन क्युब्स वापरणार असाल तर ते थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ होतील. मउ झाले कि किसुन घ्या किंवा हातानी कुस्करुन घ्या.
२. आता एका भांडयात/बाउल मधे किसलेल पनीर घ्या आणि हळुवार हातानी रगडत रहा.....अगदि पार त्याचा (पनीरचा) पॄष्ठभाग स्मुथ/गुळगुळित होईस्त.....एक साधारण १०-१२ मि.
३. आता त्यात आवडिप्रमाणे पिठिसाखर घालुन परत एकदा मळा. एक ५-७ मि. मिश्रणाचा गोळा होईल
४. आता त्याचे दोन भाग करा. एक भाग पांढरा ठेवा आणि दुस~या भागात आवडता रंग घाला. मी दोन प्रकार केले.
प्रकार १:
१. पिवळ्या पनीरच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करा. आता पांढ~या पनीरचा थोडा मोठा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिवळा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा. पिस्त्याच्या पुड मधे हा गोळा घोळवुन बाजुला ठेवा
प्रकार २:
१. एका वाटित २ मोठे चमचे पिस्त्याची पुड, चवीप्रमाणे पिठिसाखर, वेलची पुड एकत्र करा. त्यात अगदि गरजेप्रमाणे दुध घालुन गोळा करा (दुध अगदि १ ते १.५ चमचा पुरलं)
२. आता पिवळ्या पनीरचा गोळा हातावर घेउन पसरा. त्यात अलगद पिस्त्याचा गोळा ठेवा. बाजुच्या सर्व कडा एकत्र करुन गोलाकार वळा.
५. वरिल दोन्हि प्रकार फ्रिज मधे जरा सेट होण्यासाठि ठेवा म्हणजे पनीर थोडं घट्ट होईल. लगेच सर्व करणार असाल तर जास्त वेळ ठेउ नका नाहितर पनीर खुप कडक होईल. पण दुस~या दिवशी खाणार असाल तर सर्व करण्याआधी एक १०-१५ सेकंद मायक्रोव्हेव मधे गरम करा.
६. एक १५-२० मि. सेट झाले कि बदामाचे काप घालुन सर्व करा :)

६. एक १५-२० मि. सेट झाले कि बदामाचे काप घालुन सर्व करा :)💬 प्रतिसाद
श
श्रिया
गुरुवार, 02/14/2013 - 07:13
नवीन
एक नंबर! फोटो बघूनच खल्लास.
- Log in or register to post comments
अ
अक्षया
गुरुवार, 02/14/2013 - 07:26
नवीन
वाचनखुण साठवण्यात आली आहे.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 02/14/2013 - 07:43
नवीन
खास फोटो आलाय! देखणी आहे पाकृ अगदी आणि अर्थातच झक्कास!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 07:46
नवीन
पाकृ अन फोटो दोन्ही झक्कास!
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 02/14/2013 - 07:50
नवीन
फोटो बघुन जीव गेला हो दीपकभाइ. अगदीच जीवघेणा प्रकार आहे हा.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 02/14/2013 - 07:59
नवीन
मणुक्श अतिशेय भ्याणक हाए !
आम्ही पण अमुलचेच क्युब आणले होते पण ते पालक-पनीरात गेले.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/14/2013 - 08:25
नवीन
अतिशय देखणी पाकृ. आम्हाला असलं काही कधी करता येणार देव जाणे !! ;)
- Log in or register to post comments
B
bharti chandanshive१
गुरुवार, 02/14/2013 - 10:49
नवीन
पाकृ अन फोटो दोन्ही सुन्दर
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 02/14/2013 - 11:01
नवीन
स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प झक्कास !
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
गुरुवार, 02/14/2013 - 11:13
नवीन
नुसता फोटो बघुनच वाटले काहीतरी भन्नाट दिसत आहे
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/14/2013 - 11:38
नवीन
अशक्य आहेस तू राव.
लै भारी. :)
- Log in or register to post comments
त
तर्री
गुरुवार, 02/14/2013 - 11:53
नवीन
हलकट पणा - दुसरे काय ? जाहीर निषेध हया पाकृ चा
....जळून जळून भस्म झाले !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 11:58
नवीन
पनीर आणि बहार हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द एकत्र पाहून अंमळ मौज वाटली.
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
गुरुवार, 02/14/2013 - 13:06
नवीन
बायको खूश ना? हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!!!
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
गुरुवार, 02/14/2013 - 14:42
नवीन
लोक्स...
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/14/2013 - 15:36
नवीन
आहाहा... फोटो पाहुन उगाच सगळ्या बंगाली मिठाया डोळ्या समोरुन नाचुन गेल्या ! ;)
सोपी आणि शॉलिट्ट पाकॄ वाटली. :)
(पनीर प्रेमी):)
- Log in or register to post comments
अ
अश्फाक
गुरुवार, 02/14/2013 - 16:15
नवीन
गनपा भौ आम्ही तुमचे फॅन , पन दीपक शेठ सोलीड टक्कर देउ र्हायले .
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 02/14/2013 - 16:48
नवीन
माय स्वीट स्वीट हनी बनी दीपक काका ...
काकुला खुश करतो पणिर खायला घालुन ... :)
ओह माय स्वीट हनी बनी दीपक काका
आम्हाला जळवतो नुस्तेच फॉटु दाखवुन ... :-/
काका हापिसात कवा जाता वो ??? :( :P
:D
- Log in or register to post comments
ज
जयवी
गुरुवार, 02/14/2013 - 17:06
नवीन
अहाहा......प्रेमदिनाला अगदी साजेसा पदार्थ !!
जियो दीपक :)
- Log in or register to post comments
N
nishant
गुरुवार, 02/14/2013 - 17:07
नवीन
एकदम tempting दिसतय... तोंपासु :)
- Log in or register to post comments
म
मराठे
गुरुवार, 02/14/2013 - 17:08
नवीन
आई ग्ग! मेलो!
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 02/14/2013 - 17:45
नवीन
दिपकशेठ, कसली जबरी मिठाई आहे. मिठाई आणि व्हॅलेंटाईनचे औचित्य बघून जरा वेगळाच विचार मनात आला. असो.
- पिंगू
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 02/14/2013 - 17:49
नवीन
अहो काय फोटो टाकता हो तुम्ही :(
कुठे फेडाल???
नाही खरच सुंदर असतात आपले फोटो.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/14/2013 - 19:57
नवीन
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/14/2013 - 20:04
नवीन
शॉल्लीडच!
पाककृती विभागात दिपक्.कुवेत हे नावं दिसलं की आता हाथ सवयीने माऊसकडे वळतात आणि काही विचार करायच्या आतच धागा उघडला जातो. ;)
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
गुरुवार, 02/14/2013 - 22:41
नवीन
हेच म्हननार होतो.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/14/2013 - 23:28
नवीन
एखादी बंगाली प्रकारातली मिठाई वाटते आहे. भारीच हो कुवेतकर!
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 02/15/2013 - 04:23
नवीन
मस्त रे एकदम, मजा आली फोटो पाहुनच.
- Log in or register to post comments
ह
हासिनी
Fri, 02/15/2013 - 05:43
नवीन
धन्यवाद, एका चांगल्या पाकृ.दिल्याबद्दल.
फोटो एकदम मस्त.
पाकृ सुरेख! करुन पहायलाच हवी.
:)
- Log in or register to post comments
अ
अक्षया
Fri, 02/15/2013 - 05:52
नवीन
कालच पाकॄ करुन पाहिली. मी गुलाबी रंग वापरला होता. फारच छान झाली. :)
धन्यु दिपक.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Fri, 02/15/2013 - 07:39
नवीन
वेगळीच आणी तितकीच सुंदर पाकृ :)
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
Fri, 02/15/2013 - 09:00
नवीन
साष्टांग नमस्कार तुम्हांला
खरच खुप सुंदर पाककृती आहे.
- Log in or register to post comments