Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

खजूराची चटणी ..(पाणी पुरीसाठी)

स
स्मिता चौगुले
Tue, 02/12/2013 - 08:36
साहित्य: १) खजूर (बिया काढून) २) चिंच (जेवढे खजूर घ्याल त्याच्या १/४, जास्त आंबट नको) ३) गूळ (खजूराच्या १/२) ४) चाविपूरत मीठ आणि लाल तिखट ५) चिमूटभर हिंग (हिंगाने चटणीला छान वास येतो) कृती - वरील सर्व साहित्य एका पसरट भांड्यात घेवून पाण्याबरोबर जवळपास २०-२५ minutes मंद आचेवर शिजवावे जेणेकरुन खजूर आणि चिंच एकदम मऊ शिजून निघतील. थंड झाल्यानंतर mixer मधून बारीक करून घ्यावे...आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळावे . झाली खजुराची चटणी तयार. जास्त झाली तरी Refrigerator मध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते सॉस- जॅम सारखी. पाणी पुरी, भेळ पुरीच्या गाड्यावर, गोड चटणी म्हणून वापरतात ती हीच चटणी असते सौ स्मिता चौगुले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6480 views

💬 प्रतिसाद
क
केदार-मिसळपाव Tue, 02/12/2013 - 09:19 नवीन
एक प्रश्न आहे.. खजूर वापरावा कि खारिक?
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 09:30 नवीन
खजूर वापरणे सोईचे ठरेल..खारीक कडक असते, ती शिजायला बराच वेळ लागेल..:) आणि जर खारीकच वापरायची असेल तर ती ७-८ तास पाण्यात भिजवून वापरली तर चालू शकेल (खारीक वापरण्याचा प्रयोग मी कधी केलेला नाही )
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Tue, 02/12/2013 - 10:09 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 12:48 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 12:48 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Tue, 02/12/2013 - 12:53 नवीन
यात काळे मिठ घातल्यास चव अजून छान लागते
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 13:00 नवीन
काळे मीठ तर तिखट पाण्यांत घालतात न?
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Tue, 02/12/2013 - 13:12 नवीन
असेच काहि नाही चट्णी मधे घातले कि चटणीचा स्वाद उत्तम होतोच आणि चिंचे मुळे आलेला आंबटपणा बाधत नाही
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 02/12/2013 - 13:15 नवीन
नवीन आणि उपयुक्त माहिती समजली... धन्यवाद..:)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/12/2013 - 13:23 नवीन
अनवट पाककृती.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Wed, 02/13/2013 - 04:01 नवीन
अनवट ??
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 02/13/2013 - 09:49 नवीन
तुम्ही पाणी पुरी घरी करत असाल तर plz त्या पाण्याची ही रेसीपी द्या. चटणी आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Wed, 02/13/2013 - 12:09 नवीन
मी नवीन धागा उघडला आहे आणि त्यात पाणी पुरीची संपूर्ण पाकृ दिली आहे.. :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाकूल Fri, 02/15/2013 - 12:03 नवीन
फार दिवसापासुन ह्याची पाकृ हवी होती. माझ्या सोलापूरच्या बहिणीनी सांगितली होती पण विसरले होते मी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर गुरुवार, 05/02/2013 - 10:07 नवीन
पाणीपुरीच्या पाकृचा node द्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले गुरुवार, 05/02/2013 - 10:37 नवीन
http://www.misalpav.com/node/23927
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा