Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कढी आणि फुणके

त
त्रिवेणी
Mon, 02/11/2013 - 17:54
साहित्य- हरबरा डाळ – 1 वाटी तुरीची डाळ – 1 वाटी चवलीची डाळ – 1 वाटी (माझ्याकडे नव्हती म्हणून चवळी घेतली) . कांदे – 2 मोठे आल – अंदाजे लसूण – 1 जिरे – 1 चमचा हळद – ½ चमचा लाल तिखट – आवडिनुसार . कृती- प्रथम वरील सर्व डाळी 5-6 पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर चाळणीवर उपसून घ्याव्यात. मिक्सर च्या भांड्यात थोडी-थोडी डाल, लसूण, आलं एकत्र करून भरड वाटून घ्यावे. (मिश्रण पातळ करू नये, त्यासाठीच डाळीतले पाणी पूर्ण काढून घ्यावे.) . आता वाटलेल्या डाळीत जिरे, हळद, लाल तिखट, कांदा, कोथंबीर घालून मुटके वळावेत व इडली पात्रात किवा पसरट कढईत वाफौन घ्यावेत. हे वाफवून ही खाता येतात किवा एका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी ची फोडणी करून हे मुटके कुस्करून एक छान वाफ आणावी. व कढी सोबत खावे. . कढी करताना फक्त डाळीच्या पिठाएवजी वरील वाटलेली डाल अजून जास्त बारीक करून तकाला लावावी. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7991 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Mon, 02/11/2013 - 18:00 नवीन
एकदम भारी पदार्थ.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Mon, 02/11/2013 - 18:09 नवीन
धन्यवाद रेवती ताई
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 02/11/2013 - 18:18 नवीन
मस्त. नक्की करुन बघेन. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/11/2013 - 18:34 नवीन
सुरेख!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/11/2013 - 19:14 नवीन
असे असतात काय फुणके! मस्त पाकृ.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/11/2013 - 22:03 नवीन
आमच्याकडे कढीगोळे नामक एक प्रकार होत असे. तो हाच/असाच का? त्यात कांदा-कोथिंबीर नसे, फक्त हळद, जिरं आणि मीठ असायचं. कढीच्या फोडणीत लाल मिरची असायची आणि कढीगोळे कढीतच सोडलेले असायचे, त्यामुळे वेगळं तिखटही घालत नसत. (अशी आठवण. आमच्या घरची पाकृ कोणे एकेकाळीच गेली.)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/12/2013 - 04:19 नवीन
कढी गोळे वेगळे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 02/11/2013 - 22:35 नवीन
एक अवांतर प्रश्न - साहित्यामध्ये चवलीच्या (चवळीच्या) डाळीचा उल्लेख आहे. 'चवळीची डाळ' मी प्रथमच ऐकतो आहे. तुरीची, हरभर्‍याची (चना), उडदाची, मुगाची, मसुरीची, मोहरीची वगैरे ऐकल्या / वापरल्या आहेत...
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/12/2013 - 04:18 नवीन
चवलीची डाल किराणा दुकानात मिळते. आपल्या इतर दालींसारखीच असते.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/12/2013 - 14:53 नवीन
'चवलीची डाल' 'ळ' लिहायला CAPS 'L' वापरा. हे वरचं चवली वाचून शाळेत मराठीचे सर अतिशयोक्ती अलंकार शिकवताना वापरायचे ते उदाहरण आठवलं 'चवलीपावलीचं तेल आणलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला' असं काहीसं.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/12/2013 - 00:57 नवीन
फुणके? कधीच न ऐकलेला पदार्थ. हे एव्हढ खाल्लकी पोट भरत असेल ना? कारण डाळी तश्या जड असतात. चल करुन पहाते आजच. आणि हो, फोटोज डायरेक्ट चढवा ना ग? कशाला अ‍ॅटॅचमेंट मध्ये टाकताय?
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/12/2013 - 04:17 नवीन
अपर्णा ताई फोटो डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न केला पण मला जमतच नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/12/2013 - 04:23 नवीन
मदत -मिपावर फोटो चिकटवणे. यासंबंधी काही प्रश्न असल्यास जरूर विचारा...
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 02/12/2013 - 04:34 नवीन
माझा आवडता पदार्थ :) http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 02/12/2013 - 04:51 नवीन
महिती नाही पण पाकृ आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/12/2013 - 07:23 नवीन
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त :-)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 02/12/2013 - 07:54 नवीन
नविनच पदार्थ दिसतोय....ट्राय करायला हरकत नाहि. रात्रिच्या जेवणाला मस्त पर्याय
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 02/12/2013 - 08:24 नवीन
छानच आहे.. - पिंगू
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 02/12/2013 - 09:29 नवीन
सध्या असल्याच पौष्टिक आणि पोटभरू पाककृतींच्या शोधात आहे. ढन्स. :)
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Tue, 02/12/2013 - 10:11 नवीन
एक्दम वेगळी मस्तच आहे
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 02/12/2013 - 15:37 नवीन
त्याची भजी पण छान होतात. पाक्रु.झकास!!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 02/12/2013 - 15:56 नवीन
ह्याला फुंदके ही म्हणतात का? पाककृती मस्तचं आहे , पौष्टीक आहे :)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/12/2013 - 16:37 नवीन
नाही. फुंदके नाही. आमच्या कडे खानदेशात फुणकेच म्हणतात.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 02/13/2013 - 00:16 नवीन
अग मस्त झाली होती ही रेसीपी. मला वाटल होतं डाळींमुळे जड होइल पण आजिबात नाही. अन चवदार किती म्हणुन सांगु? अगदी तस्सेच उचलुन खायला सुद्धा छान वाटले. मे बी नेक्स्ट टाइम एखादी भाजी मिसळेन त्यात म्हणजे न्युट्रीशीन व्हॅल्यु वाढेल.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 02/13/2013 - 16:36 नवीन
धन्यवाद अपर्णा ताई. मलाही वाफौन जास्त आवडतात. गरम गरम फुणके, कढी. आणि याबरोबरच काण्योले पण केले जातात.म्हणजेच छोट्या पुरी एवढे लाटून पुढे दिलेल्या आकारात घडी घालून फुणके वाफवतानाच वाफून घेणे. व फुणके बरोबर खायचे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा