Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

दिलखुश क्रंच (गोजिरवाण्या घरातली बाळं)

ज
जयवी
Tue, 02/05/2013 - 08:18
साहित्य : १. तीळ – अर्धा किलो २. गूळ – अर्धा किलो पेक्षा थोडा कमी ३. डिंक बारीक तुकडे – ५ टेबल स्पून ४. जाड पोहे – अर्धी वाटी ५. वेलदोड्याची पूड - १ टीस्पून ६. तूप कृती : १. तीळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घेतले. २. मग तीळ मस्त खमंग, गुलाबीसर रंगाचे होईस्तोवर भाजून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेतले. मिक्सरमधे बारीक करतांना थोडा वेळ जास्त फिरवलं त्यामुळे तीळाचं छानपैकी तेल निघून तीळाचा ओलसर गोळा झाला. ३. गूळ बारीक किसून घेतला. ४. तूपात डिंक आणि पोहे फुलवून घेतले. ५. मग तीळाचं कूट, गूळ , तळलेला डिंक, तळलेले पोहे, वेलदोड्याची पूड हे सगळं एकजीव केलं. ६. गोल आकार देऊन वर हलवा लावून “दिलखुश क्रंची बॉल्स” तयार केले. सजावट : १. आधी बारीक नूडल्स वाफवून घेतल्या. मग एका छोट्या चाळणीत त्याला बाऊल सारखा आकार देऊन तेलात तळून घेतलं. चाळणीतून बाहेर काढल्यावर तयार झालं घरटं. २. वरच्या “दिलखुश क्रंच” चे चपटे ओव्हल गोळे बनवले. त्यावर लवंगीचे डोळे, पिस्त्याच्या कापाचे नाक आणि बदामाच्या कापाचे ओठ केले. बेकींग कप्स ची टोपी करुन ती टूथपीक ने प्रत्येक गोळ्याच्या डोक्यावर घातली. आधी तयार केलेल्या घरट्यात ही गोजिरवाणी बाळं ठेवली. ३. एका ट्रे मधे माती घालून त्यात मूग, मोहरी पेरली. हे झालं घराचं अंगण. त्यावर फुलांचे वाफे आणि मिर्च्यांचं कुंपण तयार केलं. अंगणात नूडल्सचं घरटं आणि घरट्यात “दिलखुश” गोजिरवाणी बाळं !!! A

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5970 views

💬 प्रतिसाद
स
स्मिता. Tue, 02/05/2013 - 11:00 नवीन
खाद्य पदार्थाची अशी सजावट एकदम अफलातून आहे. मस्तच!
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 02/05/2013 - 11:06 नवीन
मस्तच जयवी ताई... सजावट पण भन्नाट. :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/05/2013 - 11:08 नवीन
नंतर अशी गोंडस बाळं खाऊन टाकलीत? ;) बाकी सजावट आवडली
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 02/05/2013 - 11:09 नवीन
सहीच....सजावट तर निव्वळ अप्रतिम :) :)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Tue, 02/05/2013 - 11:10 नवीन
गोजिरवाणी बाळं बघून तोंपासु! पण खाण्याआधी त्यांचे डोळे काढावे लागतील. :D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/05/2013 - 11:18 नवीन
@त्यांचे डोळे काढावे लागतील. smiley>>> __/\____/\____/\__
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/05/2013 - 11:14 नवीन
फोटो पाककृतीमधे डकवला आहे. पाकृ छान आहे. पण गोंडस बाळं म्हटल्यावर खाववेल असं वाटत नाही... गोंडस बाळांनाच खायला देता येतील.. :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 02/05/2013 - 11:34 नवीन
तुमच्या कलाकृती आणि पाकृही आवडली. काही लोकांना कलाकुसर, पाकनिष्णात, काव्यातली गती,सगळं देतो नं देव ! कौतुक आहे तुमचं!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 02/06/2013 - 13:27 नवीन
असेच म्हणते......................:)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 02/06/2013 - 13:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 02/05/2013 - 12:08 नवीन
किती कला आहेत ग तुझ्या अंगात ? ;) थोड्या मला उधार दे ना ;) झक्कास जमलिये :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 02/05/2013 - 13:57 नवीन
मस्त सजावट!!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 02/05/2013 - 15:01 नवीन
अगं किती गोंडस दिसतायेत बाळं सुंदर सजावट व पाकृ पण छान :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 02/05/2013 - 16:05 नवीन
चांगली पाकृ आणि सजावट. अभिनंदन जयवीताई.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 02/06/2013 - 01:35 नवीन
फारच छान अन डोकेबाज कलाकृती.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 02/06/2013 - 07:31 नवीन
गोजिरवाण घर, घरातली बाळं, बाजुची सजावट.....सगळ एकदम हुच्च! मेहनतीच सार्थक न झालं तर नवल! पुनश्च अभिनंदन
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 02/06/2013 - 13:03 नवीन
गोंडस बाळं फारच आवडलीत ,उत्कृष्ट सजावट http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 02/06/2013 - 13:50 नवीन
तहे दिल से शुक्रिया यारो :) सुखावलेय हे सांगायलाच हवं का ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 02/06/2013 - 13:56 नवीन
अरे वा... अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II गुरुवार, 02/07/2013 - 05:43 नवीन
जानेवारी मध्ये हे अपलोडवल असत तर संक्रांति निमित्त नवीन प्रकार करता आला असता, पण पाकृ वरून तरी छान झाले असावेत. आवडलं एकदा नक्की ट्राय करेन.
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर गुरुवार, 02/07/2013 - 08:41 नवीन
आटीस्टच आहेस अगदी. मस्तच.
  • Log in or register to post comments
व
विलासिनि गुरुवार, 02/07/2013 - 10:11 नवीन
खूपच छान पाककृती व तिचे सादरीकरण.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा