Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

नाणेघाट

स
स्पा
Tue, 01/29/2013 - 09:01
💬 68
नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक उंची : अंदाजे २७०० फूट जिल्हा: पुणे कसे पोहोचाल : १. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात २. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते . भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो. थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं. हा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. झाडांच्या आवाजाने आजूबाजूला पाणी वाहत आहे कि काय असं वाटत होत. १. नाणेघाटाचे प्रथम दर्शन a वाटेत टिपलेले काही क्षण २.z ३.भूछत्री az ४.gb मधेच रस्त्यात जे दिसेल त्याला सातवाहन कालीन म्हणण्याची हुक्की आली , दगड दिसलं कि सातवाहन कालीन, एके ठिकाणी जुनाट डाळींब असत तसं फळ दिसलं तेही सातवाहन कालीन ( वल्ली महाराज कि जय ) ! वल्ली काका मध्ये मध्ये फोन करून खुशाली विचारात होते. फारसा दम न लागता, तब्येतीत वर पोचलो . आधीपासून एक ग्रुप वर आलेला होता, ते पुण्याहून आलेले होते, त्यामुळे त्यांना आम्ही ह्या मार्गाने आल्याचे कौतुक वाटले ( का ते समजले नाही :) ) घाटात वर पोचल्यावर एक पुरातन सातवाहन काळातली खोदलेली एक गुहा दिसते ५ . n नाणेघाट हा साधारण अडीज हजार वर्षांपूर्वी खोदला गेला. त्याकाळी तो कल्याण बंदर आणि जुन्नर यांना जोडणारा महत्वाचा राजमार्ग म्हणता येईल , व्यापारी दृष्टीने या मार्गाला महत्वाचे स्थान असे, सदर मार्गावरून प्रवास करण्यासाठी 'करही ' गोळा केला जात असे . कल्याण बंदरात उतरणारा व्यापारी माल , हा घोडे बैल यांवर लादून थेट सातवाहनांची राजधानी ' पैठण ' येथे नेला जात असे . सदर गुहा हि अतिशय प्रशस्त असून , पन्नास साठ माणसं सहज यात राहू शकतात ६.lm ७. pl या लेण्यांमधील तिन्ही भिंतींवर शिलालेख कोरलेले आहेत, हा लेख २०,२५ ओळींचा दिसतो ,
या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो. या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे.
संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था ८. शिलालेख A गुहेच्या आत जाऊन मस्त आराम केला , सोबत आणलेली खादाडी संपवली , बाहेर बरीच माकडं होती , त्यांच्या माकड चेष्टा टिपण्याचा मोह आवरला नाही :) सायबानू मीच त्यो ९. lk छोटा परिवार सुखी परिवार १०. qa गुहेच्या वर जी प्रचंड कातळाची भिंत दिसते , त्याला नानाचा अंगठा असे म्हणतात,वर तीन,चार पाण्याची टाकी आहेत. पाणी कायच्या काय थंड होतं घाटातून चढून वर आलो ११. A १२. z डावीकडे एक भला मोठा दगडी रांजण दिसतो, त्यात म्हणे जकात भरली जात असे, खरे खोटे माहित नाही 13 az उजव्या बाजूला एका लहानश्या गुहेत गणेशाची मूर्ती आहे . १४. gb १५. lk १६. lm आता उन्हात आल्याने ,मस्त उब जाणवत होती. थोडं अजून वर चढलो आणि आजूबाजूच्या भव्य प्रदेशाच दर्शन झालं. मागच्या बाजूला भैरवगड , हडसर अशा किल्ल्यांची रांग होती १९. A २०.lm प्रचंड ,भणाणत्या वाऱ्यात समोरचा जीवधन , वानर लिंगी लक्ष वेधून घेत होती. त्यामागेही काही किल्ले दिसत होते. २१.qa प्रचंड माणूस हातपाय पसरून बसलाय कि काय असं वाटत होतं. हि आवळ्याची लिंगी २२.lm २३.gb समोरच्या बाजूने गोरखगड , सिद्धगड , माहुली सुद्धा दिसतात थोड्याच वेळात खाली उतरायला लागलो . एके ठिकाणी पांगारा (? )फुललेला होता, तिथेही थोडा क्लिकक्लीकाट केला २४. qa २५. lm २६.z २७. lk साधारण तीन च्या सुमारास खाली आलो सुद्धा , एका दिवसात मुंबई - पुणेकरांना करण्याजोगा सहज ट्रेक आहे . दोन दिवस असतील तर जीवधन - नाणेघाट करता येतो . जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम, जंगलात लाकूड फाटा बराच असल्याने गुहेतही मस्त जेवणाचा बेत करता येऊ शकतो .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21536 views

💬 प्रतिसाद
N
nishant Tue, 01/29/2013 - 15:04 नवीन
सुंद्र्र ट्रेक आणि छान फोटो. अत्ताच ट्रेकिंगला जावं असं वाटतंय !! :)
  • Log in or register to post comments
म
मनराव Tue, 01/29/2013 - 15:13 नवीन
मस्त रे श्पांडु......!!! झक्कास फोटो...
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 01/29/2013 - 17:12 नवीन
लगे रहो. फोटो मस्तच
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 01/29/2013 - 17:30 नवीन
१२, २१, २२, २३ हे फोटो अफाट आहेत! १५ मधली घंटा बघून जी. ए. यांच्या कथांमधलं गूढ वातावरण आठवलं. पळसाचे फोटो इतके मोहक आहेत, की हात लांबवून फुलं तोडायचा मोह होतोय! :)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 01/29/2013 - 18:29 नवीन
तु सिग्रेट हो :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/29/2013 - 19:04 नवीन
पांगार्‍याच्या फुलांचे फोटो प्रचंड आवडले आहेत. त्यावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या खुणा न उमटवण्यासाठी विशेष आभार. जर कधी कुठे फोटो वापरलेच तर तुमचा नामोल्लेख नक्की करण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 01/31/2013 - 04:43 नवीन
फोटो व वर्णन दोन्हीही आवडले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/31/2013 - 13:51 नवीन
स्पा फारच छान ! १. रांजणाबद्दल हा अखंड दगडात कोरलेला नसून अचूक मापात वेगवेगळे तुकडे कोरून नंतर जोडले आहेत त्यामुळे तो जकातिसाठीच असणार . सातवाहन काळ म्हणजे दुसऱ्‍ या शतकाअगोदर आणि तो शिलालेख त्यामुळे रांजण अतिशय महत्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे .
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/31/2013 - 14:31 नवीन
नाणेघाट मार्ग . जर तुमच्याकडे तुमचे वाहन नसेल तर . . . कल्याण एस टि डेपोत या , शक्यतो आळेफाटा/जुन्नर /घोडेगाव कडे जाणाऱ्‍या बस वाहकाला नाणेघाटला जायचे आहे हे सांगा/विचारा . हो म्हणाल्यास तुमचे काम सोपे होईल . तुम्हाला तिकिट पण मिळेल आणि जेथून नाणेघाटची पायवाट सुरू होते तिथेच तुम्हाला उतरवेल . नाहितर वैशाखरे गावाच्या थांब्यावर उतरुन रस्त्याने ३ किमी चालल्यावर ती वाट येईल . हा विनंती थांबा आहे . परतताना दुपारी ३ ते ४ दरम्यान ८ ते१० बस जातील हात दाखवून बस थांबवा . पाच नंतर एखादिच बस येते .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 01/31/2013 - 14:37 नवीन
अस नसत करायच, वैशाखरे सांगुन गाडीत बसायच आन पुढ उतरायच.. (अनुभवी )
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 01/31/2013 - 14:55 नवीन
फोटो काय दिसत नाय हपिसातून पन क्यामेरा नवा अन तु अनुभवी असल्याने चांगलेच असतील
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 02/05/2013 - 12:19 नवीन
व्वा व्वा काय फोटु आलेत :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/05/2013 - 12:31 नवीन
नाणेघाट आम्ही नाईट ट्रेक केला होता तो ही पावसाळ्यात! खरं म्हंजे नाईट पेक्षा पहाट ट्रेक म्हणायला हवा. मुंबईतून मध्यरात्री निघालो, पहाटे पायथ्याशी.. फटफटल्यावर सूर्योदयाला माथा तिथे पावसाळ्यात जाताना वाटेत तीन मोठ्ठाले ओढे लागतात, ते एकमेकांचे हात धरून - साखळी करून - पार केल्याचं आठवतंय.. त्या वयात तेच 'लै भारी थ्रिल' वाटलं होतं :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/05/2013 - 12:32 नवीन
आणि हो.. वरचे लख, फटु सगळे आवल्डे! स्वगतः वल्लीशेटबरोबर अशाच एखाद्या गडावर भटकायचा योग कधी येतोय देवच जाणे
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 02/05/2013 - 13:58 नवीन
सहीच रे.... मज्जा केलीस... फोटो खूप आवडले
जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम,
हल्ली जेवणाची सोय तिथे आरामात होते.. थोडी चौकशी केल्यावर तुला जेवण काय, अंथरूण-पांघरूण सगळं सगळं मिळतं ;-) :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 02/19/2013 - 09:59 नवीन
सुंदर वर्णन आणि फोटो. एकच अपडेट असा की नाणेघाट ला वर जेवणाची, चहाची शिवाय गुहेत रहायचं नसल्यास घरात राहण्याची उत्तम सोय होते. आम्ही गेलो होतो ६ महिन्यांपूर्वी तेंव्हा आमची सोय झाली. संपर्क ९५५२७ ५०१३३
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 02/19/2013 - 13:45 नवीन
शम्मत आहे..
  • Log in or register to post comments
म
माणिकमोति Wed, 09/18/2013 - 09:51 नवीन
ह्या रविवारिच 'नाणेघाट' ला जावून आले.. जाण्याआधि तुमचा हा लेख वाचून गेले होते.. त्यामुळे खूप मदत झाली.. 'नाणेघाट' खरच खूप सुंदर आहे.. ऐका दिवसात जावून येण्यासाठी एकदम मस्त..!! तुम्ही लोक परत कधी ट्रेकला जाणार असाल तर सांगा.. मिपाकराना भेटायला मला खूप आवडेल..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा