Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पिठल्याची पुरी

त
त्रिवेणी
Fri, 01/11/2013 - 10:55
साहित्य- उरलेले पिठले- मी 1 ½ वाटी घेतले, जिरे – ½ चमचा तीळ- ½ चमचा ओवा- ½ चमचा गव्हाचे पीठ- आवशकतेनुसार मीठ- चवीनुसार तेल- तळण्यासाठी कृती- पिठल्यात जिरे, ओवा, तीळ, मीठ घालावे. या सर्व साहित्यात मावेल इतके गव्हाचे पीठ घालून घट्ट मळावे. 10-15 मिनिटे झाकून ठेवावे. कढईत तेल कडकडीत गरम करून पुर्‍या तळाव्यात. (मी उरलेले पिठले बाजरीच्या पिठ + चवीपुरते मीठ मिक्स करून मळून घेते व त्याची भाकरी करते, ते जास्त छान लागते) a

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8177 views

💬 प्रतिसाद
क
किसन शिंदे Fri, 01/11/2013 - 11:02 नवीन
ते वडे असतात ना, तसं दिसतंय. छान लागत असावंच. एकदा प्रयत्न करून पहायला हवाय.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 01/11/2013 - 12:02 नवीन
मी कुचुन "वेडे" वाचल.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 01/11/2013 - 11:52 नवीन
उरलेल्या पिठल्याचा एकदम मस्त उपयोग केलाय. :)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/11/2013 - 11:57 नवीन
वाह वाह !!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 01/11/2013 - 12:03 नवीन
मला शिळ पिठल, त्यातल्यात्यात ते पातळ असेल तर फार आवडत तसच खायला. शिळ्या पातळ पिठल्यात कच्च शेंगातेल घालुन खाणं म्हणजे स्वर्ग सुख.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/11/2013 - 12:06 नवीन
सर्वकाही तसंच, पण पातळ ऐवजी वडी होईल असं फ्रीजमधून काढलेलं कालचं पिठलं इतकं आवडतं की ते खायची संधी सोडून त्याची पुरी ऑर अदरवाईज करण्याचा विचारही मनाला शिवत नाही. पण पाकृची आयडिया झकास आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले गुरुवार, 02/07/2013 - 11:55 नवीन
अगदी अगदी.... :) :)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 01/11/2013 - 12:13 नवीन
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/11/2013 - 12:44 नवीन
दुप्पारच्या छा संगाट लै झ्याक लागतील बगा...!
  • Log in or register to post comments
म
मन१ Fri, 01/11/2013 - 12:44 नवीन
आवडेश. दह्याचं पिठलं माझं फेव्हरिट. तेसुद्धा ह्या पाकृ मध्ये चालून जावं असं वाटात्य. बहुतांश वेळी आमच्याकडे तव्यवरचं दह्यातलं पिठलं उरतच, कारण पहिल्यांदा आमची उडी पडते ती काळसर्-आंबूस "खरवड" खाण्यावर. बाकी सब बाद में. तेच खाउन अर्ध पोट भरतं नि शेवटी पिठलं थोडंसं उरतच. आता करुन पाहतो घरी हा प्रयोग मातोश्रींच्या मार्गदर्शनात.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/11/2013 - 12:48 नवीन
पुरी/भाकरी दोन्ही प्रकार छान होतील.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 01/11/2013 - 14:47 नवीन
पुय्रा केल्यात म्हणजे डाळीचच असणार! छान दिसतायत पुय्रा!!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Fri, 01/11/2013 - 14:50 नवीन
हो हो चण्याच्या पिठाचे
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 01/11/2013 - 15:14 नवीन
तुमच्याकडे पिठलं उरतं ? भाग्यवान आहात. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/11/2013 - 15:21 नवीन
खुसखुशीत झालेल्या दिसतायत पुर्‍या. छानच.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 01/11/2013 - 15:36 नवीन
पिठलं खूप दिवसात केलेले नाही. करीन म्हणते. अपर्णासारखच मलादेखील पातळ पिठलं आवडतं. मस्त कांदा मिरची, चिंचकोळ घातलेलं.ख्नारळ/खोबरं मात्र तितकसं आवडत नाही पिठल्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 01/13/2013 - 12:37 नवीन
मी उरलेले पिठले बाजरीच्या पिठ + चवीपुरते मीठ मिक्स करून मळून घेते व त्याची भाकरी करते, ते जास्त छान लागते
अरे! मग, भाकरीची पाककृती द्यायची होती आणि 'एक वेगळा प्रकार' म्हणून पुर्‍यांची पाककृती द्यायची. असो. दोन्ही करून पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 01/13/2013 - 14:00 नवीन
छान छान.... पण असे प्रकार करेपर्यंत पिठले उरतच नाही.....ताज्या पिठल्याचेच करुन पहायला हवेय..!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
क्श्मा कुल्कर्नि Mon, 01/14/2013 - 10:28 नवीन
पीठल उरण अशक्यच आहे !!
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर गुरुवार, 02/07/2013 - 09:01 नवीन
नविनच प्रकार. आवडला.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/07/2013 - 12:05 नवीन
शिळं पिठलंच अत्यंत आवडत असल्याने पाकृ बर्‍याचदा पास होईलसं दिसतंय. पण ऐडीयाची कल्पना आवल्डि
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा