Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पेठा

ग
गणपा
Tue, 01/01/2013 - 10:08
समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवं वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा !!! साहित्य :  १/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड) १/२ किलो साखर. १-२ चमचे खायचा चुना. तुरटी. गुलाब/केवडा वॉटर. कृती :  कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे. या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.   चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी. दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.   एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे. कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.   एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.  मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं. एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे. (झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........ हे असं.   (ऐसी अक्षरे दिवाळी अंकात पुर्वप्रकशित)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25702 views

💬 प्रतिसाद
प
पिंगू Tue, 01/01/2013 - 10:19 नवीन
पेठा असा बनवतात होय.. माहितच नव्हतं.. बोला गणपा गुरु की जय... - पिंगू
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 01/16/2013 - 21:36 नवीन
असेच म्हणते. मस्त लागतो पेठा. आग्र्याचा प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 01/01/2013 - 10:20 नवीन
लै झ्याक !
  • Log in or register to post comments
र
रुमानी Tue, 01/01/2013 - 10:31 नवीन
मस्त .......!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/01/2013 - 10:34 नवीन
पेठा कसा बनवतात, हे प्रथमच कळले, धन्यवाद. याप्रकारे बनवलेला पेठा हे पेठ्याचे मूळ स्वरूप असावेसे दिसते. आग्रा वगैरेला अनेक प्रकारचे पेठे मिळतात, त्यांचे आकारही विविध असतात, आणि ते अगदी नेमक्या आकारचे, गुळगुळीत असतात. ते कसे बनवतात? तसेच अंगूरी पेठा कसा बनवतात?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/01/2013 - 10:36 नवीन
वा ! :) सर्व मिपाकरांना नविन वर्षाच्या ग्वाड ग्वाड शुभेच्छ्या ! :) राजकीय ठोंब्यांना राष्ट्रहिताचे / जनहिताचे निर्णय घेण्याची सुबुद्धी होउ दे... अशी या नविन वर्षी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 01/01/2013 - 10:49 नवीन
आवडीचा प्रकार. नक्की करून बघेन.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 01/01/2013 - 10:54 नवीन
आता थोडे फ्लेवर्ड पेठेही बनव रे
  • Log in or register to post comments
अ
अनुप कुलकर्णी Tue, 01/01/2013 - 11:00 नवीन
पेठ्याचं आणि आमचं फार कधी जमलं नाही... पण ८ तासांच्या मेहनतीसाठी तुम्हाला सलाम तुरटीमुळे नक्की काय होते ते समजलं नाही...
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 01/01/2013 - 11:10 नवीन
आहा! पेठा म्हणजे अगदी जीव की प्राण! बाहेर मिळणारा पेठा पांढराशुभ्र असतो, त्यात काही वेगळं घालतात का? आणि असंच 'पानपेठा' प्रकाराचीही रेसिपी द्याल कय?
  • Log in or register to post comments
प
प्रेक्शक Tue, 01/01/2013 - 11:13 नवीन
आभारी आहोत.तुमच्या मुलेच मि पा वर आलो. बाकी मी फक्त प्रेक्शक. बायको प्रयत्न करते पन फोतोतल्या सारखे नाही येत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/01/2013 - 12:08 नवीन
गंपादादा की जय हो.........! Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 01/01/2013 - 12:13 नवीन
बापरे... पेठा हा आवडता पदार्थ असला तरी तो बनवताना ईतकी मेहनत घ्यावी लागते हे माहिती नव्हतं. आणि बनवण्यासाठी लागणारे जिन्नस तर हटकेच आहे. कोहळा, तुरटी, खायचा चुना...
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Tue, 01/01/2013 - 12:15 नवीन
ही कृती वैदिक आहे का? अंडी घालून करता येईल का?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/14/2013 - 07:50 नवीन
ही कृती वैदिक आहे का? अंडी घालून करता येईल का? ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झाला आहे त्यावर अवलंबून आहे
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 01/01/2013 - 12:21 नवीन
झक्कास........ :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 01/01/2013 - 12:56 नवीन
झक्कास झाली नवीन वर्षाची सुरूवात!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 01/01/2013 - 14:31 नवीन
पेठ्यात कोहळ्याचा किस लागतो असे मला वाटायचे...पण असो हे झकास दिसतंय म्हणजे तसेच चवीला तसेच असणार...
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Tue, 01/01/2013 - 14:36 नवीन
नव वर्षाच्या पेठामय शुभेच्छा गंपा भौ व समस्त मिपाकरांना आवडेश हो पेठा :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/01/2013 - 14:58 नवीन
मस्त. वरकरणी सोपी तरी जाम मेहनतीची आणि लैच हटके पाकृ आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/01/2013 - 15:03 नवीन
छान. पेठा आवडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/01/2013 - 15:50 नवीन
कुरियर कर.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 01/01/2013 - 15:59 नवीन
मिठाईच्या दुकानातला ख्रिश्चन नववधूसारखा पाढरी जाळीदार ओढणी घेऊन बसलेला तो फिकट हिरवा क्यूट क्यूब असा बनवतात होय...!
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 01/01/2013 - 17:03 नवीन
आजपासून आग्रा तुझ्या नावावर केलंय .
  • Log in or register to post comments
क
कौशी Tue, 01/01/2013 - 18:54 नवीन
पेठा आवडला.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 01/02/2013 - 01:28 नवीन
__/\__ यु आर ग्रेट!! पेठा तर छानच दिसत आहे पण तुमच्या मेहनतीला विशेष सलाम :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 01/02/2013 - 07:57 नवीन
गणपाभौ, तुस्सी ग्रेट हो!!!!!!
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 01/02/2013 - 08:26 नवीन
यम्मी ... भारी दिसतोय. पण हा पेठा एवढा गोड असतो कि एकाच्या वर खाववत नाही :(
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Wed, 01/02/2013 - 09:03 नवीन
पेठा म्हणजे माझा अगदी जीव की प्राण. खुप दिवसांपासुन याची पाककृती शोधत होते.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 01/02/2013 - 09:10 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/02/2013 - 12:13 नवीन
"पेठा करण्याचे कसब असण्यापेक्षा गणपाची मैतरकी अधिक गोडीची" असंच खरंतर पुलंना म्हणायचं होतं बरं का! अप्रतिम पाकृ, गणपाजी, तुम्हाला मानलं बुवा! पेठा माझ्या फेव लिस्ट मध्ये आहेच. अवांतर: याच रीतीने भोपळ्याचा वगैरे पेठा करता येईल का?
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 01/02/2013 - 12:24 नवीन
पेठा अतिशय आवडतो पण त्याची कृती एवढी टाईम कन्झ्युमिंग असेल असं वाटलं नव्हतं. तेवढा संयम बाळगणार्‍या गणपाभाऊंना दंडवत!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/02/2013 - 13:05 नवीन
खरं तर पेठा अजिबात आवडत नाही. पण गणपानं केलेली पाककृती म्हटल्यावर न राहवून इथे आले. जबरी आहे बाबा कृती. इतका खटाटोप.. मान गये उस्ताद !!
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 01/03/2013 - 20:16 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 01/02/2013 - 13:57 नवीन
पण खटाटोप फार असल्या कारणाने भारतवारित विकतचा खाईन. गणपाभाऊंच्या ईच्छाशक्ति आणि संयमाला दंडवत...लगे रहो
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/02/2013 - 14:08 नवीन
सलाम गणपाभौंच्या पेठ्याला आणि गणपाभौंनाही!!!! वरती चित्रगुप्त म्हणतात त्याप्रमाणे अंगूरी पेठा कसा बनवतात हे जाणण्याची इच्छा मलादेखील आहे. आग्र्याला गेलो असताना तिथला प्रसिद्ध ब्रँड "पंछी पेठा" चा अंगुरी फ्लेवर आणला होता. लै म्हंजे लै भारी होता. पिवळसर, पाकाने माखलेला आणि केशराच्या अवलेपनाने प्रचंड टेम्प्टिंग दिसत होता.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 01/02/2013 - 17:14 नवीन
एकदम वेगळी पाकृ... एकदा करुन बघीतले पाहिजे... आता त्या साठी आधी कोहळा शोधायला लागेल, आणि तो इथे मिळणे महामुश्कील..
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 01/04/2013 - 12:01 नवीन
वा पेठा हा माझा एक आवडता पदार्थ आहे. एवढी मेहनत घ्यावी लागते हे माहीत नव्हत. खुप छान. आता करुन पाहीन एकदा. आमच्या इथे दत्त जयंतीला जत्रा असते. तेंव्हा मी त्या जत्रेतून नेहमी हा पेठा घेते.
  • Log in or register to post comments
N
niranjan गुरुवार, 01/17/2013 - 08:04 नवीन
..
  • Log in or register to post comments
स
समंजस Wed, 01/23/2013 - 13:58 नवीन
अतिशय आवडणारी मिठाई (माफक प्रमाणात गोड असल्यास). तयार करण्या मागे मेहनत खुप असल्यामुळे विकत घेणेच पसंत करतो :)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 05/16/2015 - 05:35 नवीन
ह्याच ऍशगॉर्ड ची पेठया सारखी अजुन एक ज़रा जास्त पाकात न्हालेली मिठाई असते नाव तिचे केसर गंडेरी!!अप्रतिम असते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा