Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सप्तरंगी केक (Rainbow Cake)

स
सानिकास्वप्निल
Sun, 12/30/2012 - 18:15
साहित्यः रेडीमेड स्पाँज केक मिक्स (हे नाही मिळाल्यास बेसीक स्पाँज केकची पाकृ खाली दिली आहे) ५० मिली + २५ मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे) १ अंडं ६-७ खाण्याचे रंग (मी लाल,शेंद्री,पिवळा,हिरवा,निळा,गुलाबी रंग वापरला आहे. लाल्+निळा+पिवळा रंग एकत्र करून ब्राऊन रंग तयार केला आहे) फ्रेश क्रीम . पाकृ: ओव्हन २०० डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हीट करा. एका मिक्सींग बाऊल मध्ये केक मिक्स, अंडं व ५० मिली पाणी एकत्र करुन फेटून घेणे. त्यात आता उरलेले २५ मिली पाणी घालून चांगले फेटणे. फेटलेल्या मिश्रणाचे ७ भाग करावे व प्रत्येक भागात वेगवेगळा खाण्याचा रंग घालून मिक्स करावे. (वेगळे बाऊल व चमचे वापरावे म्हणजे रंग एकमेकांमध्ये मिसळणार नाही) केक टीनला बेकींग पेपर लावून घ्यावा किंवा बटर ने ग्रीज करून घ्यावे. आता टीनच्या मध्यभागी लाल रंगाचे मिश्रण ओतावे, चमच्याने अजिबात पसरवायचे नाही. लाल मिश्रणाच्या मधो-मध शेंद्री रंगाचे मिश्रण घालावे म्हणज लाल रंगाचे बॅटर आपोआप पसरेल. शेंद्री रंगाच्या मिश्रणाच्या मधोमध गुलाबी रंगाचे मिश्रण घालावे. असेच इतर रंगाचे मिश्रण मधोमध घालावे व केक टीन हलकेच आपटून घ्यावे म्हणजे हवेचे बुडबुडे निघून जातील. प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये केक टीन ठेवून १५-२० मिनिटे बेक करणे. विणायची सुई घालून पहावी, सुई स्वच्छ निघाली म्हणजे केक तयार झाला समजावे. केकला कुलिंग रॅकवर गार होण्यासाठी काढून ठेवावे. . केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे. एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा. त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते) आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे. पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे. गार झालेल्या केकचा बेकिंग पेपर काढून टाकावा व केकला सगळीकढून क्रीम लावून पसरावे. मी थोडेसे फेटलेले क्रीम बाजूला काढून त्यात खायचा गुलाबी रंग घातला व पायपींग बॅगने केकवर सजावट केली. . सजावट केलेला केक थोड्या वेळ फ्रिजमध्ये ठेवा. केक कापला की आतले सप्तरंग खुलून दिसतील :) . . नोटः ज्यांना केक मिक्स सहज उपलब्ध नाही त्यांनी घरीच स्पाँज केकचे मिश्रण तयार करावे. त्यांनी १७५ ग्राम मैदा चाळून घ्यावा. १२५ ग्राम बटर आणी १२५ ग्राम साखर एकत्र हलके होईपर्यंत फेटावे. त्यात एक-एक करत २ अंडी घालून चांगले फेटावे. १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा फेटावे. त्यात चाळून घेतलेला मैदा थोडा थोडा करून घालावा व मिश्रण फोल्ड करावे. ह्याच मिश्रणाचे सात भाग करून, त्यात रंग घालावे व पुढिल कृती वर दिल्याप्रमाणे करावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9358 views

💬 प्रतिसाद
M
Mrunalini Sun, 12/30/2012 - 18:36 नवीन
खुपच मस्त दिसतोय केक... आणि icing तर superb :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 12/30/2012 - 19:16 नवीन
अप्रतिम!!! रुचकर आणी सुंदर पदार्थ दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sun, 12/30/2012 - 19:17 नवीन
मस्त !!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/30/2012 - 19:18 नवीन
देखणा केक आणि देखणी सजावट. तू त्यात एवढा जीव का ओतलायस ते माहिती आहेच! :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 12/30/2012 - 20:52 नवीन
बघ बरं, मी काय म्हणालो होतो ते चुकीचं होतं का? ;)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 12/31/2012 - 12:38 नवीन
मग सांगा अपेक्षापूर्ती झाली का?? :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 12/31/2012 - 16:48 नवीन
अलबत. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 12/30/2012 - 21:02 नवीन
सु रे ख. आणि बाकी प्रतिसाद नेहमीचाच. समजून घ्यावा. :)
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Mon, 12/31/2012 - 05:39 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/31/2012 - 04:24 नवीन
अशक्य देखणा झालाय केक.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 12/31/2012 - 04:25 नवीन
मशत!& बेस्ट विशेस !
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 12/31/2012 - 04:32 नवीन
आहाहा !! क ह र !!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 12/31/2012 - 05:29 नवीन
जबरा झालाय केक :) किती निगुतीने करतेस ग ! अशा पा.क्रु बनवायला पेशंस लागतात त्यामुळे आम्ही तुर्तास असे केक बघण्यात समाधान मानु ;)आणी बेकरीतुन आणुन आयते खाउ ;)
  • Log in or register to post comments
र
रुमानी Mon, 12/31/2012 - 05:40 नवीन
अतिशय सुरेख मस्तच.......
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता Mon, 12/31/2012 - 07:38 नवीन
बघुन लगेच खावासा वाटत आहे. सजावट तर अप्रतिम.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 12/31/2012 - 07:53 नवीन
(नेहमीप्रमाणेच) सुंदरतेचा अन स्वादाचा अनोखा अविष्कार !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/31/2012 - 08:11 नवीन
अप्रतिम खाद्य कलाकृती :-)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Mon, 12/31/2012 - 12:21 नवीन
कसला जीवघेणा दिसतोय गं केक......!! लग्ग्गेच उचलून तोंडात टाकावासा वाटतोय ;)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 12/31/2012 - 12:47 नवीन
अप्रतिम दिसतोय केक!
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 12/31/2012 - 15:14 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 12/31/2012 - 16:06 नवीन
नवीन वर्ष अशीच रंगांची उधळण करो!!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 12/31/2012 - 22:36 नवीन
अगदी फेस्टीव्ह केक झाला आहे. आता तुम्ही तुमच्या पाकृंतीचे सचित्र पुस्तकच काढा.
  • Log in or register to post comments
स
समयांत Tue, 01/01/2013 - 03:51 नवीन
खूपच मस्त दिसतोय केक :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/01/2013 - 05:34 नवीन
शॉलिट्ट !!! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/01/2013 - 07:00 नवीन
भा हा री ही!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 01/02/2013 - 13:49 नवीन
केक आणि त्याची पाकृ दोन्हि कातिल आहेत....पण आपला पास!
  • Log in or register to post comments
अ
अबोलीच-ती गुरुवार, 01/03/2013 - 10:09 नवीन
अतिशय सुन्दर !!!!
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 01/03/2013 - 20:24 नवीन
गणपा, रेवती, सानिकास्वप्निल, मृणालिनी, प्रभाकर पेठकर यांनी पाककृती दिली की ती केवळ बघण्यासाठी मी हजेरी लावते. प्रतिसाद देतेच असे नाही. दरवेळी तेच तेच अप्रतिम, सुंदर, छान असे प्रतिसाद काय द्यायचे? :-) पण छान.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 01/04/2013 - 04:03 नवीन
पुर्ण केक चेपुवर पाहिला होताच, आवडला तर जाम होताच पण ही आतली कलाकारी आता कळाली. खुप खुप धन्यवाद आणि इथं पुन्हा एकदा या केकच्या संदर्भित प्रसंगासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 01/04/2013 - 08:09 नवीन
खल्लास.. असा केक तर विकत घ्यायला पण नाही भेटणार :-( --टुकुल
  • Log in or register to post comments
म
मानसी डेळेकर गुरुवार, 01/10/2013 - 13:27 नवीन
झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा