Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सेब कि चटपटि तरकारी...

द
दिपक.कुवेत
गुरुवार, 12/27/2012 - 09:50
Kate seb Tayar Sabji साहित्यः १. हिरवी सफरचंद - २ २. कांदा - १ (पातळ उभा कापुन) ३. लसुण पाकळ्या - २ (पातळ कापुन) ४. सुख्या लाल मिरच्या - ३ ५. आख्खे धणे - १ चमचा ६. बडिशेप पावडर - १ चमचा ७. आमचुर पावडर - १/२ चमचा ८. तिळाचि पावडर - १ चमचा ९. हळद - १/२ चमचा १०. हिंग / मीठ / मोहरि - चवीनुसार ११. तेल - १ पळि १२. कोथिंबिर कृती: १. सुख्या लाल मिरच्या आणि आख्खे धणे कोरडेच भाजुन मिक्सरमधे भरडसर वाटुन घ्या २. तिळ सुध्धा कोरडेच बाजुन बारिक पुड करा (पाणि न घालता) ३. रेडिमेड बडिशेप पावडर असेल तर ठिक नाहितर बडिशेप पण कोरडिच भाजुन बारिक पुड करा ४. हि तयारि झाली कि कांदा / लसुण पातळ उभा चिरुन घ्या ५. आता सफरचंदाचे मध्यम तुकडे करुन घ्या ६. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाका ७. तेल तापले कि मोहरि, हिंग, हळद टाकुन फोडणी करा ८. मोहरी तडतडली कि कांदा / लसुण घालुन परता ९. कांदा / लसुण मोठया आचेवार परता...थोडेसं जळलं तरि हरकत नाहि...नव्हे तसं कराच कारण नंतर त्याच्यामुळे भाजी मस्त खमंग लागते १०. आता सफरचंदाच्या फोडि टाकुन परता व वाफेवर शिजवा ११. मधे मधे हलक्या हाताने परता म्हणजे फोडि मोडणार नाहित १२. आता सफरचंदाची साल मउ झाली कि अनुक्रमे मिरची-धणे पुड, बडिशेप, आमचुर, तिळाचि पावडर, चविनुसार मिठ टाकुन हलकेसे परता १३. ५ मि. गॅस बंद करुन बारिक चिरलेली कोथिंबीर पेरा १४. गरमा गरम चटपटित भाजी पोळि, गर्लिक नान, फुलक्या सोबत सर्व करा...:)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5406 views

💬 प्रतिसाद
ग
गणपा गुरुवार, 12/27/2012 - 10:08 नवीन
तुमच्या पाककृती नेहमी हटके असतात. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/27/2012 - 10:33 नवीन
सहमत. वेगळीच पाकृ. सफरचंदाची भाजी.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/27/2012 - 10:36 नवीन
अगदी अगदी. सफरचंदाचे फूल काय देखणे झालेय.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 01/12/2013 - 04:45 नवीन
तसं सफरचंद कापायचे एक यंत्र मिळते. कॉमन आहे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 12/27/2012 - 10:36 नवीन
अरे वा... सहिच.... पण मग ही भाजी गोडसर लागेल ना????
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 12/27/2012 - 11:02 नवीन
हटके रेशिपी आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 12/27/2012 - 11:11 नवीन
मस्तच पाकृ; खरंच चटपटीत असणार! अशीच मी एकदा द्राक्षांची आंबटगोड भाजी केली होती.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 12/27/2012 - 11:42 नवीन
धन्यवाद. मृणालिनि: हि सफरचंद जरा अगोडच असतात. नेहमीच्या लाल सफरचंदाची केली तर कदाचीत गोड लागेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/27/2012 - 13:00 नवीन
आणि फोटो पण फारच देखणे आलेत. सफरचंद हिरवी म्हणजे कच्ची आहेत की त्यांचा रंग असाच असतो? जरा आंबटसर असणार बहुतेक चवीला.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 12/27/2012 - 14:16 नवीन
जरा तुरट लागतात. टिकायलाही उत्तम आहेत. शीतपेटीत १/२ महिने अगदीच टवटवीत राहतात.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/27/2012 - 14:32 नवीन
अगदी वेगळी भाजी. फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 12/30/2012 - 06:50 नवीन
लई भारी, अशीच भाजी हल्ली मिळणा-या बिन चवीच्या बटाट्याएवढ्या बोरांची करता येईल ना ?
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 12/30/2012 - 13:29 नवीन
वेगळीच पाककृती सफरचंदाची भाजी एकदम छान दिसतेय.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 12/31/2012 - 04:17 नवीन
हटके. हिरवी सफरचंद आहेत घरात करुन पहाते.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 12/31/2012 - 15:19 नवीन
मस्त असेल. कधी इमॅजिन ही केले नव्हते. पण छान असेल असे वाटते. करून पाहेन.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 12/31/2012 - 23:02 नवीन
कल्पक आणि चविष्ट पाकृ करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 01/01/2013 - 03:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 01/01/2013 - 03:59 नवीन
मी केली होती आज. मला तरी मसाला आवडला. घरचे अ‍ॅपल? अ‍ॅपल करी? अशी टिका टिप्पणी करत होते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/01/2013 - 17:27 नवीन
अरे वा... एकदम हटके पाकॄ दिसतेय ! :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 01/10/2013 - 02:19 नवीन
आताच बनवली. मस्त आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 01/12/2013 - 05:11 नवीन
थंड व्हायच्या आता वाढा हो! लय भुका लागल्यात.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा