Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

गाजराचं रसरशीत लोणचं

ज
जयवी
Wed, 12/26/2012 - 10:10
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे. Pickle साहित्य : मस्त लाल गाजरं - ५-६ लसूण पाकळ्या ५-६ मीठ चवीप्रमाणे गूळ - चवीप्रमाणे लिंबाचा रस - चवीप्रमाणे केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर मोहरी हिंग कृती: १. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं. २. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या. ३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं. ४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं. एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण खाऊ शकतात ;) अधिक टिपा: फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो. ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट. आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं. गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8054 views

💬 प्रतिसाद
स
सूड Wed, 12/26/2012 - 10:26 नवीन
किती दिवस टिकतं ?
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 12/26/2012 - 11:15 नवीन
हे लोणचं फार दिवस टिकत नाही. फ्रीजमधे ठेवावं लागतं. पण हे टिकण्यासाठी उरतच नाही हा माझा अनुभव आहे :)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 12/26/2012 - 11:36 नवीन
फोटू छान दिसतोय. चवही मस्तच असणार. माझ्या घरी असे लोणचे बऱ्याचदा करतात आणि त्यात कांद्याच्या बियांची (कलौन्जी) फोडणी घालतात.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 12/26/2012 - 11:41 नवीन
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
केप्रचं तयार गाजर लोणचं मिळत नाही का? :)
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Wed, 12/26/2012 - 14:25 नवीन
आजच फ्लोवर्,गाजराच लोणचं घातलं.पन लसूण घातली नाही.परत तुमच्याप्रमाणे करून बघेन.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/26/2012 - 14:30 नवीन
रसरशीत धागा... ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/26/2012 - 14:38 नवीन
अरे वा! सोपं लोणचं आहे. मी हे नक्की करणार. मला केप्रचा मसाला शोधावाही लागणार नाही (वाचतोयस ना परा?). फोटू पाहूनच रसरशीतपणाचा अंदाज येतोय. मस्त. हे लोणचं लोणच्यासारखं खाल्लं जात नाही. ;)
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 12/26/2012 - 17:11 नवीन
येता जाता टपल्या मारायच्या ... वांड असेल पण मनानी अगदी श्यामसारखा आहे हो पोरगा !!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/26/2012 - 23:10 नवीन
कोण? परा? काय म्हणता? ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/27/2012 - 06:56 नवीन
मी पायाला, मनाला, लेखणीला कुठ्ठे कुठ्ठे घाण लागू नये म्हणून सतत जपत असतो बरे. बाकी काकूंना तिकडे केप्रचा मसाला कुठे मिळाला म्हणे ? इकडच्या फुजीच्या इंडिया मार्ट मध्ये सगळी बोंबच आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/27/2012 - 14:59 नवीन
इकडे केप्रचा मसाला, भाजणी (साधी/उपासाची), अगदी शेवभाजीचा मसालाही मिळतो (मी तो कधी वापरला नाही). सातूचे पीठ मिळते. आता तू इकडेच का रहायला येत नाहीस? साधा समुद्र तर ओलांडायचाय. ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 12/27/2012 - 06:26 नवीन
श्याम कोण ?
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 12/27/2012 - 07:43 नवीन
मानव?! :P
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 01/08/2013 - 17:07 नवीन
अंहं, मनोहर.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 12/26/2012 - 14:42 नवीन
कसलं टेप्टिंग दिसतय. करायला पण एकदम सोप्प...पण आता इथे केप्रचा मसाला कुठे शोधु?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/26/2012 - 15:53 नवीन
मस्तच दिसतय!
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 12/26/2012 - 23:37 नवीन
काय सुपर्ब फोटो आहे :)
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 12/27/2012 - 06:43 नवीन
धन्यवाद लोक्स :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/27/2012 - 17:33 नवीन
फो.............टूऊऊऊऊऊऊऊउ Image removed.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 12/30/2012 - 13:27 नवीन
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलयं नक्की नक्की करून बघणार , घरात लोणचं मसाला आहेच :) धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 12/31/2012 - 23:08 नवीन
लोणच्याचा रसरशीतपणा बघुनच तोंडाला पाणी सुटलं म्हणुन लगेच लिहुन ठेवली पण प्रतिसाद द्यायचा राहुनच गेला तो आता देते आहे. जातीच्या कलावंताला काहीही सुरेखच जमते. तुमचे आणि तुमच्या आईंचे आभार.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 01/01/2013 - 12:54 नवीन
आणि तोंडाला पाणी सुटलं....
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/10/2013 - 07:05 नवीन
हे लोणचं तर मातोश्रींनी केल्याकेल्या भाजीगत खाऊन संपवत असू आम्ही. आहाहाहा काय आठवण करून दिलीत वाह!!!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 01/11/2013 - 10:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Tue, 01/15/2013 - 14:42 नवीन
खुप छान रेसेपि आहे,करुन पाहील्,आवड्ले घरी सगळयाना.
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Tue, 01/15/2013 - 17:27 नवीन
पण एक शन्का, केप्र लोणचे मसाला ण मिळाल्यास पर्याय काय? घरी मसाला करता येइल का?
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 01/16/2013 - 07:02 नवीन
धन्यवाद :) जर्मनीकर...... मसाला मिळाला नाही तर तिखट, थोडी मोहरीची पूड घालून मेकप करता येईल :)
  • Log in or register to post comments
स
समंजस Wed, 01/23/2013 - 14:02 नवीन
गाजराचं लोणचं अतिशय आवडतं (मिरचीच्या लोणच्या व्यतिरीक्त). मोठ्या लांब फोडी असल्यास उत्तम :) (घरी केलेलं लोणचं लवकरच खराब होत असल्यामुळे विकत घेणे हाच पर्याय सध्या आहे).
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा