Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

झिंगा खिचडी

J
jaypal
Sat, 12/22/2012 - 14:59
साहीत्य १०/१२ मोठे झिंगे(कोळंबी) १/२ चमचा हळद १ लिंबु १ वाटी घट्ट फेटलेल दही. ३ ते ४ चमचे मिठ ३/४ चमचे आल लसुन पेस्ट १०/१५ काजु ३ लाल टोमॅटो ४/५ कांदे पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या ४/५ १०० मि.ली. तेल ४ चमचे साजुक तुप लाल ति़खट आवडीप्रमाणे सुमारे ३०/४० मिनीटे भिजवलेला ३ वाट्या तांदुळ (बासमती असल्यास उत्तम) खडा मसाला ७/८ काळी मिरी, १ मोठी वेलची, तमालपत्र, ५/६ लवंगा. गरम पाणि अंदाजे ६/७ वाट्या. झिंगे/कोलंबी धागे काढुन स्वच्छ धूउन घ्या. त्यांना हळद,मिठ व ३/४ चमचे लिंबुरस लाऊन बाजुला ठेवा. z1 एका जाडबुडाच्या कढईत जाडसर उभा चिरलेला कांदा टाकुन ब्राऊन होई पर्यंत परतुन घ्या. z2 घरात उपलब्ध असल्याने मी मिक्स भाजी पण घेतली आहे. z3 कांदा सोनेरी दिसायला लागला की त्या मधे सगळा खडा मसला+काजु+आल लसुण पेस्ट+१/२ हळद+लाल तिखट + हिरव्या मिरच्या टाका आणि थोडावेल परतउन घ्या. खमंग वास यायला लागला की टोमॅटो + मिक्स भाजी घालुन परत एकदा २ मिनिटे परता. z4 ह्या मिश्रणात दही घालुन १ मिनिट परता आणि बाजुला ठेवलेली कोळंबी घालुन पुन्हा ३/४ मिनिटे परतवुन घ्या. z5 वरील मिश्रणात भिजवुन ठेवलेला तांदुळ घाला आणि परत एकदा ३/४ मिनिटे परता. या मधे गरम पाणि घाला. z6 झाकण लाउन भात शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा. z7 भात शिजल्यावर सर्व बाजुंनी तुप सोडुन परत झाकण लाउन ३/४ मिनिटे ठेवा. आणि मनपसंत सजावट करुन सर्व्ह करा. z8 राज की बात - खर म्हणजे हा माझा फसलेला बिर्यानिचा प्रयोग आहे. भात सुटा न होता गिचका झाला म्हणुन खिचडी नाव दिल पण हा प्रयोग चवित यशस्वि झाला होता एवढ नक्की.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8328 views

💬 प्रतिसाद
त
त्रिवेणी Sat, 12/22/2012 - 16:33 नवीन
चवीला छान झाल्यावर बिर्याणी म्हणून खाल्ले काय किवा खिचडी म्हणून खाल्ले काय भात खाण्याशी मतलब. शेवटचा फोटू मस्तच भातप्रेमी
  • Log in or register to post comments
श
शैलेंद्रसिंह Sat, 12/22/2012 - 17:07 नवीन
खुपच छान दिसतेय खिचडी..काजु टाकायची आयडीया भारीच..आज-उद्याच ट्राय करतो बनवायचा. मी मागच्या आठवड्यात केली होती...त्याचीही खिचडीच झाली. मग मी युट्युब वर रेसिप्या पाहिल्या. त्यानुसार नुसती बिर्याणी किंवा फ्राईड राईस सारखी खायची असेल तर भात भरपुर पाण्यात ९०% शिजवावा..पाणी फेकुन द्यावे..अगदी ड्राय करावा...आणि मग तुम्ही जो मसाला आणि कोळंबी आधी परतुन घेतलीय त्यात टाकुन मग वाफ़ेवर मंद आचेवर शिजवावा...जर स्टर फ़्राईड राईस खायचा असेल तर खुप जास्त फ़्लेम वर झाकण न ठेवता परतवावा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/22/2012 - 17:42 नवीन
फटु लै भारी! आणि बिर्याणी फसून खिचडी झाल्याचा कबुलीजबाब देण्याचा प्रामाणिकपणा त्याहून भारी. आता कधीतरी माझ्या पोरांसाठी अशी खिचडी फसून बिर्याणी करता येते का ते बघते!
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Sat, 12/22/2012 - 23:50 नवीन
पाकृ फारच आवडली. असेच करता करताच शिकता येते. आणखी पाकृ तुमच्याकडून येवोत.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 12/23/2012 - 05:44 नवीन
लपलप !
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 12/23/2012 - 06:07 नवीन
व्वा झिंगा खिचडी आवडली :) वरुन ३ र्या नं च्या फोटुत ते काड्यासद्रुश काय आहे ?दालचिनी आहे का ? अन असेल तर ती इतक्या प्रमाणात घालायची ? स्ट्रॉंग नाही का होणार टॅस्ट ?
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 12/23/2012 - 08:55 नवीन
पिवशे, मला तरी ते आल्याचे लांब तुकडे वाटताहेत..
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 12/23/2012 - 10:42 नवीन
नै रे पिंगु ते आलं नै वाटत ,तुमरे चस्मा का नं बढ गवा क्या ? ;)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 12/23/2012 - 11:29 नवीन
ते 'आलं' च आहे. majority wins!! ;) पिवशे, खर्र खर्र सांग, तुला स्वैपाकातलं कै कळत नै नं?? :D
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 12/23/2012 - 11:33 नवीन
ए माउ ...बेट लावते का माझ्याशी ५० ची क्याडबरी ;) कॉलींग .....जयपाल अंकल ;)क्याडबरी का सवाल है ;)
  • Log in or register to post comments
J
jaypal Sun, 12/23/2012 - 14:25 नवीन
मेजॉरीटी विन्स. पियुशा ते आल (ज्युलीअन्स) आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 12/23/2012 - 16:44 नवीन
पिवशे, आता दोन क्याडबर्या पाठवून दे.. - पिंगू
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 12/23/2012 - 07:12 नवीन
कदाचित ते तांदूळ जे चार पाच तास भिजवले ना त्यामूळे खिचडी झाली असावी. असो फसलेला का असेना पण या प्रयोगा निमित्त्याने गृहीणीला निवांतपणा मिळाला असावा अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
J
jaypal Sun, 12/23/2012 - 14:28 नवीन
मी तर ३०/४० मिनीटे लिहल आहे आणि तेवढ्याच वेळ भिजवले होते :-(
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 12/23/2012 - 08:57 नवीन
जयपालशेठ, मानलं तुम्हाला. झिंगा खिचडी छानच झालेली दिसतेय.. - पिंगू
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 12/23/2012 - 09:16 नवीन
खिचडि कतिल लग रहि है...बघुनच भुख लागली
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sun, 12/23/2012 - 14:24 नवीन
tempting आहे एकदम... आता २-३ दिवस सुट्टी आहे... तेव्हा नक्की ट्राय करुन बघते.
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 12/23/2012 - 17:51 नवीन
रेसिपी आवड्ली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/24/2012 - 17:09 नवीन
चव उत्तम आलि कि पदार्थाचे नाव काही का असेना... आणि वरच्या फोटो वरून...हा प्रकार म्हणजे जमलेला तानपुरा वाटतो....लयीच भारी....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/03/2013 - 05:56 नवीन
तिन वाट्या तांदूळात फक्त १०-१२ कोलंब्या फार कमी वाटताहेत. तसही, छायाचित्रात कोलंब्या दुप्पट दिसताहेत. २२ ते २४ असाव्यात. तांदूळ भिजवलेले असतील तर पाणी दिडपट घ्यावे आणि अगदी मंद आंचेवर बिर्याणी शिजवावी. जेवढ्यास तेवढे पाणी घेऊनही भात शिजतो पण फार फडफडीत होतो. दिडपट पाणी योग्य होतं. आणि प्रत्येक तांदूळाच्या प्रतीला पाण्याचे प्रमाण वेगवेगळे लागते. त्यामुळे बिर्याणीसारखा पदार्थ करताना तांदूळ 'माहितीतला' असावा. कोलंबी जास्त शिजता कामा नये. जास्त शिजल्यास 'रबरी' होते. कमी शिजल्यास पचनास जड होते. कोलंबीच्या आकारमानानुसार एक वाफ घेऊन तांदूळ मिसळल्यास कोलंबी व्यवस्थित शिजते. कोलंबी लहान असेल तर एक वाफ घ्यायचीही गरज नाही, भाताबरोबर शिजते. ताजी कोलंबी, बासमती तांदूळ आणि साजूक तुप (वापरल्यास) बिर्याणी अप्रतिम होते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा