Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

खमंग वडे

ग
गौरीबाई गोवेकर
Sat, 12/15/2012 - 09:00
साहित्यः तांदुळ, हरभ-याची डाळ, उडदाची डाळ, हळद मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, आले कढिपत्ता. प्रथम २ वाट्या तांदुळ, १ वाटी हरभ-याची डाळ, १/२ वाटी उडदाची डाळ हे एकत्र करून मिक्सरवर जाडसर दळून घ्यावे. या जाडसर पिठाला भरडा असे ही म्हणतात. मिरच्या व कढिपत्याची पाने बारीक चिरून घ्यावी, आले बारीक पेस्ट करून घ्या . दोन ते तीन वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे त्या मध्ये १ चमचा हळद घालावी चांगली उकळी आल्यावर वरील पिठ त्यात घालावे व लगेच गैस बंद करावा पिठ ढवळून लगेच झाकण ठेवावे. . वाफ जिरू द्यावी. तयास झालेल्या पिठाचा गोळा मळावा. मळताना त्यात चवी नुसार मिठ, हिरच्या मिरच्यांचे अगदी बारीक चिरलेले तुकडे, वाटलेले आले, कढिलिंबाची पाने बारीक चिरलेली हे घालावे. गोळा चांगला मळून घ्यावा. मळ्ताना पाणी वापरू नये. . या पिठाचे छोट्या पुरीच्या आकाराचे वडे थापून घ्यावे हे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी डिप फ्राय करावेत. खमंग व खुशखुशीत वडे तयार. टमाटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करावेत. . टिपः उकळीला पाणी ठेवताना जरूरीपुरतेच पाणी असावे पाणी जास्त नको. स्वादासाठी पीठ मळताना त्यात धन्याची पावडर घालू शकता. हे गरमच चांगले लागतात. डायट असेल तर या मळलेल्या गोळ्यामधे बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून त्याचे कमी तेलावर थालिपीठ करू शकता. ते सुध्दा छान लागते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10676 views

💬 प्रतिसाद
ग
गौरीबाई गोवेकर Sat, 12/15/2012 - 09:05 नवीन
दिलेली चित्रे मजकुराच्या मधे मधे दिसण्यासाठी काय बरे करावे? कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Sun, 12/16/2012 - 08:01 नवीन
वरच्या बारमध्ये मदत पान आहे त्याला क्लिक करा व त्यावरील मिसळपाववर फोटो कसा चढवावा?हा गणपाभाऊंनी दिलेला सचित्र लेख वाचा म्हणजे कळेल.
  • Log in or register to post comments
S
sunita123 Sat, 12/15/2012 - 12:59 नवीन
mast disat ahet vade....
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sat, 12/15/2012 - 13:02 नवीन
वा वडे मस्तच दिसतायत. चवीला नक्किच खमंग असणार. करुन बघेन एकदा...
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/15/2012 - 17:01 नवीन
वडे छान दिसतायत. चित्रांच्या मदतीसाठी गणपा व किस्ना प्रसिद्ध आहेत. वल्लीकडेही जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
ह
हिरवळ Sat, 12/15/2012 - 18:17 नवीन
फारच छान रेसिपी....दाल वडे म्हणतात ते हेच का?
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Mon, 12/17/2012 - 09:53 नवीन
मला वाटत दाल वडे म्हणजे हे नव्हेत. त्यात डाळी भिजवून+वाटून त्याचे वडे केले जातात.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/15/2012 - 18:29 नवीन
चहाबरोबर खायला मस्त खाणे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/15/2012 - 18:57 नवीन
आंम्हाला हे वडे श्राद्धाला खाऊन खाऊन जुने झालेले आहेत...पण तरी अवडले हे सुद्धा... :-)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 12/16/2012 - 06:28 नवीन
छान दिसताहेत वडे .. व्यायाम आणि आहार नियंत्रणावरच्या चर्चा वाचून जरा टेन्शनच आले होते. :( ही पा. कृ. वाचताना जरा बरे वाटले .
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 12/16/2012 - 13:16 नवीन
अरे वा.......मस्त मस्त :) वड्यांची ही नवी पद्धत वाचून तरी आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Mon, 12/17/2012 - 09:55 नवीन
:) मग आता हे पण करून बघ..
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव Wed, 12/19/2012 - 17:51 नवीन
छायाचित्र बघुन तोन्डाला पाणी सुटले...आज आम्च्याकडे बटाटावडयाचा बेत आहे...खायला सुरुवात करावी म्हणतो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा