Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

गाज अर्र हल उवा अल अमिरी..(गाजर हलवा)

अ
अत्रन्गि पाउस
गुरुवार, 12/13/2012 - 11:51
साहित्य : १. लाल बुंद गाजरे १ किलो a. स्वच्छ धुवून व कोरडी ठक्क पुसून वरचे वर किसून..(मधला पिवळट पांढरा भाग घेवू नये) २. १ लिटर ताजे निरसे दूध ३. साखर : २- ३ मोठ्या वाट्या... ४. केशर : २-३ चिमट्या ५. बदाम : १०० -१५० ग्राम्स मामरा बदाम ज्यास्त चांगले ६. पिस्ते : १०० ग्राम्स (अफगाणी पिस्ते जे विशेष करून प्रशांत कोर्नेर ठाणे येथे मिळतात) ७. बेदाणे : १०० ग्राम्स (अफगाणी ...वरच्या पिस्त्यान प्रमाणेच) ८. काजू : १०० ग्राम्स/ १५० ग्राम्स मोठे ९. तूप : ५०० ग्राम्स घरी कढवलेले : साजूक (चितळ्यांच्या लोण्याचे असेल तर फारच उत्तम) १०. मोठे जाड बुडाचे पातेले २ ११. तुमची इंग्लिश डिक्शनरी कृती : एका पातेल्यात दूध मंदाग्नीवर तापायला ठेवावे...कोमट झाल्यावर साखर घालून हलकेच ढवळावे.. बदाम पिस्ते काजू जाड जाड क्रश करून घ्यावे त्याच्यातले १/३ ३ च्माचे तुपात १ मिनट परतून घ्यावे व बाहेर काढावे... दुसऱ्या पातेल्यात सुमारे ३०० ग्राम्स तूप माध्यम आचेवर पातळ करून हळू हळू मुठी मुठीने किस्लाले गाजर घालुन परतत राहावे..गाजराच्या प्रत्येक कणाला तूप लागले पाहिजे .. थोडी आंच वाढवा ...गाजराच्या मध्ये खड्डा करा व बाजूने हलकेच दाबत राहा म्हणजे गजराच्या किसातील पाणी मध्ये येईल..ढवळा - खड्डा -ढवळा...बर्यापैकि पाणी निघेउन गेल्यावर २ /३ चमचे तूप टाकून पुन्हा ढवळा... इकडे दुधाला माफक उकळि आली असावी...आता त्या दुधात केशर तळहातावर चुरून टाका..बेदाणे सोडून बाकीचे ड्राय फ्रुट्स (साधे व तळलेले )घाला व थोडी आंच वाढवा...दुधाला फर्मास उकळी आली पाहिजे... एकीकडे गाजरे व दुसरीकडे दूध चालू देत ढवळणे...कंटाळा आला कि मधून मधून १-२ चमचे तूप टाकत राहा गाजरावर.. दुधाला थोडे आटले कि त्याला झकास केशरी रंग येईल..पिस्ते उत्साहाने वर तरंगू लागतील.. आता थोडी काळजी पूर्वक कृती.... उकळते दूध शिजनार्या गजरांवर ओतायचे आहे...वाफ हातावर येऊ देऊ नका...दुधाच्या पातेल्यातील तळाला व बाजूला चिकटलेला मसाला नीटकाढून गाजारावर टाका... ह्या मिश्रणावर उरलेल्या तुपातले ४ चमचे काढून घेउन बाकीचे तूप टाका..व ते जे काही समोर दिसते आहे ते हलक्या हाताने एक जीव करत राहा ...आंच माध्यम ... ५-७ मिनिटांनी बेदाणे घाला व आंच थोडी वाढवा...हे मिश्रण आटून येईपर्यंत धीर धरा (१० -१५ मिनटे)...खाली लागू देवू नका. आंच बंद करून झाकण ठेवा.. आणि हो ते उरलेले ४ चमचे तूप द्या सोडून कडेने... आता इंग्लिश डिक्शनरी उघडा...calories diet weight हे शब्द नाहीसे झालेत ह्याची खात्री करून ते झाकण उघडा आणि तुटून पडा.. वरील कृती साधारण १ माणसाला एका वेळी पुरी पडावी....:-)))))

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5411 views

💬 प्रतिसाद
प
पिलीयन रायडर गुरुवार, 12/13/2012 - 11:56 नवीन
काल गाजर आणले आणि आज ही पा.कृ...!!! धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/14/2012 - 12:40 नवीन
डिक्शनरी कशाला ते वाचून ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 12/14/2012 - 13:46 नवीन
काय प्रॉब्लेम आहे सिलेंडर सहाच, म्हणून खव्याचे विचारले नाहीतर आपल्या क्रुतीला तोड नाही. फोटो दिसत नाहीय त्यामुळे या शाही हलव्याचा अंदाज येत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 12/14/2012 - 15:26 नवीन
अन जरा ह्याची आठवण असू द्या
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 12/14/2012 - 16:25 नवीन
फोटु शिवाय प्रतिसाद नाय. (पाकृ वाचून .पिस्त्यासारखा उत्साहाने वर तरंगू लागलो आहे) सोबत आइसक्रीम मिळाले तर तर बरे या विचारात -रामदास
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 12/14/2012 - 16:29 नवीन
मी तर फक्त फोटु साठी पाक्रुझ बघते .. :) करायला तितकासा हुरुप नसतो बै मला :-/ गाजर हलवा खैला खुप आवड्तो :)
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Sat, 12/15/2012 - 09:10 नवीन
छानच....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 12/15/2012 - 10:05 नवीन
एक किलो गाजरे किसून झाल्यावर पाऊण किलो होतील. त्यात अर्धा किलो तूप अन एक लीटर दूध ? आणि सुमारे अर्धा किलो सुकामेवा ? हलवा 'कुपोषित' लोकांसाठी आहे काय ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 12/15/2012 - 12:37 नवीन
कुपोषित नाही...अट्टल खवैय्यांसाठी आहे ....करून पहा खावून पहा...नक्की आवडेल खरं तर किंचित जायफळ आणि वेलची सुद्धा बरी लागते ह्यात पण वेलची चे दाणे चावातांना खान-समाधीत व्यत्यय येतो-..
  • Log in or register to post comments
स
सूड Sat, 12/15/2012 - 10:18 नवीन
थोडक्यात, गाजराचा किस तुपात तळून घ्यायचा आहे. रेसिपी प्रचंड आवडली आहे, पण फोटो नसल्याने दहातून एक मार्क वजा करणेत येत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 12/15/2012 - 12:40 नवीन
साहित्य आणायाला चाललो आहे..करून झाला कि फोटो टाकतो... पहिल्याच पाककृतीला मिळालेल्या प्रतिसादाने उल्हासित होत्साता (अतरंगी पाउस )
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 12/16/2012 - 09:43 नवीन
साहित्य आणलं का ? मग करा बघू हलवा अन लौकर फटू टाका राव. अन तोपर्यंत आमचा गरिबाचा हा घ्या.. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 12/16/2012 - 14:22 नवीन
धन्यवाद स्नेहांकित!!! एका दुसऱ्याच कामात अडकलोय...पण झाल कि नक्की टाकतो...घरी पण हलव्यासाठी बंदुका रोखलेल्या आहेत आता :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 12/18/2012 - 06:25 नवीन
नक्की करून पहाते. झक्कास. बाकी डिक्शनरीची आयडिया लै भारी:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा