Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मेडोविना (Medovina) ग्लु वाईन

M
Mrunalini
Tue, 12/11/2012 - 22:57
मेडोविना म्हणजे मधाची वाईन. चेक रिपब्लीक व स्लोवाकिया येथे हि वाईन ख्रिसमस मार्केट मधे खुप प्रसिद्ध आहे. हि वाईन मधापासुन बनवलेली असते. त्यात फळांचा जुस, फळे, मसाले व साखर टाकुन हि वाईन गरम केली जाते. ख्रिसमस मार्केटमधे मस्त थंडी (साधारण पणे -10 ते -15 degree celcius) असताना हि मेडोविना प्यायला खुप छान वाटते. हि प्यायल्या नंतर थंडी पुर्ण पणे गायब होते ;) मिपाकरांना आवडेल अशी आशा आहे. ;) साहित्यः मेडोविना - २ कप (मेडोविना नसल्यास कुठ्लीही स्वीट रेड किंवा व्हाईट वाईन) संत्री - २ सफरचंद - १ Lemon zest - १ छोटा चमचा दालचिनी - १ इंचाचा तुकडा चक्रीफुल - २ लवंगा - २ साखर - २ चमचे मिक्स्ड ड्राय फ्रुट्स - २ चमचे कॄती : १. दोन्ही संत्री कापुन घ्यावीत. त्यातील एका संत्र्याचा ज्युस काढावा व दुसर्‍या संत्र्याचे तुकडे करावेत. २. सफरचंदाचे तुकडे करुन घ्यावेत. ३. एका पातेल्यात वाईन घ्यावी. त्यात संत्र्याचा ज्युस, संत्री, सफरचंद व lemon zest टाकुन मिक्स करावे. ४. त्यात दालचिनी, चक्रीफुल, लवंगा, मिक्स्ड ड्राय फ्रुट्स व साखर टाकावे. ५. हे मिश्रण गॅसवर ५-१० मिनिटे अगदी मंद आचेवर गरम करावे. ६. ह्यास उकळी आणु नये. त्याच उकळी आल्यास त्यातील आल्कोहोल evaporate होइल. ७. ५-१० मिनिटांनी मेडोविना ग्लासात ओतुन, गरम वाईनचा मस्त थंडीत आस्वाद घ्यावा. m1 m2 m3

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3485 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Tue, 12/11/2012 - 22:59 नवीन
अग्ग्ग्ग्गग! भारी, अगदी सोनेरी दिसतीये. सोत्रींची आठवण आली. सुरेख फोटू.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Wed, 12/12/2012 - 00:04 नवीन
आईशप्पथ कसला भारी फोटु आहे ....... फोटु पाहुनच टांगा पलटी घोडे पसार :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 12/12/2012 - 07:23 नवीन
टांगा पलटी घोडे पसार अगदी अगदी!! फारच छान फोटो आहेत. मेडोविना. चला आता ही शोधणे आल.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 12/12/2012 - 01:13 नवीन
लिंबू, दालचिनी, चक्रीफुल, लवंगा इतकं सर्व घालून ही मसालेदार भारतीयत्व धारण करणारी कलाकृती तुम्ही निर्माण केली असेल तर कल्पनाशक्तीची दाद दिलीच पाहिजे, नुसते घटकपदार्थ वाचूनच थंडी पळेल :-) बाकी बहुधा mead-wine/ meodu-wine अशी व्युत्पत्ती असलेली ही medovina; यातला meodu हा olde English मूळ शब्द आणि आपल्याकडचा 'मधु' यातलं साम्य जाणवलं. (आणि अर्थातच हरिवंशराय बच्चन यांची 'मधुशाला'ही आठवली!)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 12/12/2012 - 07:30 नवीन
नाव वाचून एकदम 'मोनालिसा' आठवली.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 12/12/2012 - 08:15 नवीन
भन्नाट लागत असणार यात शेंकाच नाय. :) मध्यंतरी या मेडोविनाबद्दलच मिपावर वाचल्याचं आठवतय.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 12/12/2012 - 11:26 नवीन
काय दिसतंय, काय दिसतंय! फोटो एक नंबर आहेत. गेल्या शनिवारीच ख्रिसमस मार्केटमधे गरम वारूणीचा लुफ्त घेतला. पण इकडे अशी साग्रसंगीत नाही मिळत. लाल वारूणीत मसाले (ती पण फक्त दालचिनी असावी) आणि साखर घालून देतात.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 12/12/2012 - 21:00 नवीन
आम्हा दोघांना ही मल्ड वाईन आवडते पण मेडोविना (मध असलेली) वाईन कधी प्यायलो नाही फोटो बघूनच गट्ट्म करावीशी वाटत आहे खासकरून ह्या थंडीत :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 12/12/2012 - 21:31 नवीन
;) मला पण रेड वाईन पेक्षा मधाची वाईनच जास्त आवडते. मस्त लागते एकदम. इथे असच एक फ्रुट पुंच (पंच) पण मिळते. पण त्यात व्हिस्की, रम, फ्रुट ज्युस आणि हे मसाले असते. मी फक्त वाईन पिते, त्यामुळे ह्याची पाकृ नाही टाकली ;)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 12/13/2012 - 08:26 नवीन
नुसती पाहुनच नशा आली...भन्नाट लागत असणार ह्यात शंकाच नाही...इथे राजाच्या देशात बाकि सगळं काही आहे फक्त ह्याचं सुख नाही (अती दुखी: स्मायली)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा