Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

१. सफरचंद आणि लाल भोपळा सुप / २. भोपळ्याच्या सालींची (उरलेल्या) चटणी

द
दिपक.कुवेत
Tue, 12/11/2012 - 09:48
१. सफरचंद आणि लाल भोपळा सुप २. भोपळ्याच्या सालींची (उरलेल्या) चटणी नमस्कार मंडळी, थंडि / पावसाळा सुरु झाला की हे सुप करा आणि धुंद वातावरणाचा मस्त लुफ्त घ्या. Soup साहित्यः १. सुप साठि १. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम २. तमालपत्र - १ ते २ छोटी ३. किसलेला लाल भोपळा - १/२ वाटि ४. किसलेलं किंवा बारीक फोडी केलेलं सफरचंद - १ मध्यम ५. पाणी - गरजेप्रमाणे दाटपणासाठि ६. चवीनुसार मीठ / मीरपुड ७. तेल - १ पळि ८. कोथिंबिर / पुदीना - सजावटीसाठि कृती: १. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन त्यात तमालपत्र व कांदा घालावा २. कांदा परतुन मउ झाला की कीसलेला लाल भोपळा घालावा २. भोपळा चांगला परतला की किसलेलं / बारिक फोडी केलेलं सफरचंद घालावं ३. गरजेपुरतं पाणी घालुन वाफ आणावी ४. मीश्रण थंड झालं की मीक्सर मधे मुलायम वाटुन घ्यावं (तमालपत्र काढावे) ५. आता त्याच कढईत वाटलेलं मीश्रण घेउन, घनतेप्रमाणे पाणी घालुन एक उकळि आणावी ६. चवीनुसार मीठ / मीरपुड घालुन गॅस बंद करावा ७. तयार सुप बाउल मधे काढुन कोथिंबिर / पुदीना घालुन सजवावे आणि अजीबात वेळ न दवडता गट्ट्म करावे... कॉम्बिनेशन थोडं वेगेळ आहे पण जरा हटके आणि चवीष्ट आहे... टिपा: १. सफरचंदाची सालं काढलीत तर उत्तम नाहीतर सुप पीताना कचकच लागण्याची शक्यता आहे २. सफरचंद अगदी घालायच्या वेळेस कीसावे/कापावे म्हणजे काळे पडणार नाही २. भोपळ्याच्या (उरलेल्या) सालींची चटणी साहित्यः १. किसलेल्या भोपळ्याच्या साली - सुप केल्यावर उरतील त्या किंवा १/२ वाटी २. तीळ - २ चमचे ३. ओलं खोबरं - २ चमचे ४. चवीनुसार मीठ / साखर / हीरव्या मीरच्या ५. तेल - २ पळि ६. कोथिंबिर / पुदीना ७. मोहरी / जीरं - फोडणी साठि कृती: १. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन भोपळ्याच्या साली परताव्या २. साली कुरकुरीत झाल्या कि ओलं खोबरं आणि तीळ टाकुन परतावं ३. सतत परतावे म्हणजे खोबरं खाली लागणार नाही ४. ५ मी. गॅस बंद करावा ५. मीश्रण थंड झालं की मीक्सर मधे चवीनुसार मीठ, साखर, हीरव्या मीरच्या, कोथिंबिर / पुदिना घालुन वाटावं ६. गरज लागल्यास वाटताना पाणी घालावे नाहीतर खोबर्याचा ओलसरपणा पुरतो ७. मोहरी / जीर्याची फोडणी तयार चटणीला द्यावी आणि झक्कास तोंडिलावणे तय्यार! टिपा: १. कोथिंबिर / पुदिना अगदी थोडा घालावा म्हणजे तीळाची चव जाणार नाही चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4116 views

💬 प्रतिसाद
ज
जयवी Tue, 12/11/2012 - 10:31 नवीन
अरे वा.......एकदम वेगळ्या रेसीपीज........नक्की करुन बघेन :) फोटो तर एकदम मस्त :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 12/11/2012 - 11:03 नवीन
मस्त दिसतंय सूप.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 12/11/2012 - 11:12 नवीन
सजावट लै भारी करतात.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 12/11/2012 - 11:19 नवीन
अरे वेगळच आहे हे कॉम्बो :) ट्राय करुन बघेन
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 12/11/2012 - 11:29 नवीन
वा, मस्तच दिसतंय सुप! लाल भोपळा मिळाला की नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/11/2012 - 11:51 नवीन
हे सूप वाजवलं पायजे एकदा... :-)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 12/11/2012 - 13:56 नवीन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद्...सुप आणि चटणी दोन्ही करुन बघा.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 12/11/2012 - 13:57 नवीन
चटणी केली जाते, अशीच दुधी भोपळ्याची पण छान होते. सूप मात्र ह्टके आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/11/2012 - 14:09 नवीन
भोपळा आणि सफरचंद हे कॉम्बिनेशन एकदम वेगळंच आहे. निदान दिसतंय छान!
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Tue, 12/11/2012 - 15:07 नवीन
छानच दिसतय सूप. भोपळ्याच्या सालींची चटणी मी करते. पण सूप नविनच आहे. मध्यांनीच्या सारंगासारख छान रंगलय. सूपाच्या पृष्ठभागावर तरंगत रेंगाळणारी पुदिन्याची पाने म्हणजे सारंगातला ठसठशीत लावलेला रिषभच वाटतो. आणि बाऊल, पार्श्वभूमी म्हणजे संवादी पंचमच. एकंदर छान रंगलाय रागरंग. :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 12/11/2012 - 15:20 नवीन
तुमच्या प्रतीसादामुळे सूप एकदम सूरमयी होउन गेलं...
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/11/2012 - 15:39 नवीन
अगदी छान पाकृ. फोटू तर झकासच!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा