Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार.

ग
गौरीबाई गोवेकर
Fri, 11/30/2012 - 15:30
ढोकळ्याचा अगदी काही मिनीटात होणारा प्रकार. साहित्य: १ वाटी दही (अमुलचे तयार दही असल्यास उत्तम), १ वाटी दुध, १ वाटी रवा (नेहमीचा गव्हाचा रवा. आपण सांजा/शि-यासाठी वापरतो तो.), ईनो फ़्रुट सॉल्ट्चा १ पाउच (१ ते दीड चमचा) , अर्धा ईंच आल्याची पेस्ट, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट. मीठ. फ़ोडणीचे साहित्य. सर्वप्रथम ढोकळा वाफ़वण्यासाठी कुकर मधे पाण्याला उकळी येउ देणे. ज्या पात्रात ढोकळा वाफ़वायचा असेल त्याला आतून तेलाचा हात लावून तयारे ठेवणे व नंतर उर्वरीत कृति करावयास घ्यावी. एका दुस-या भांड्यात रवा घ्यावा. दही छान मोडुन घ्यावे पाणी घालू नये. त्या रव्यात हे मोडलेले दही घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत घोटावे आता त्यात दुध घालावे आल व मिर्चीची पेस्ट व मिठ घालून पुन्हा थोडे घोटावे. आता ईनो फ़्रूट सॉल्टचा पाउच कापून एका हातात तयार ठेवावा. वरील मिश्रणात तो घालून लगेच हलवावे. सॉल्ट घालताच मिश्रण फ़सफ़सेल. तसेच ते लगेच वाफ़वावयास ठेवावे. सॉल्ट मिश्रणात घातल्यापासून काही सेकंदातच वाफ़ेला पडले पाहिजे उशीर होऊन चालत नाही. तसेच मिश्रणात पाणी आजीबात घालू नये. पंधरा ते वीस मिनीटे शिटी न लावता वाफ़ द्यावी. हा ढोकळा अगदी स्पंजासारखा फ़ुगून येतो. थोडे थंड होताच वड्या कापाव्या. वरून हिंग मोहरीची फ़ोडणी द्यावी. गरमच सर्व्ह करावा. या बरोबर चिंचेची आंबटगोड चटणी द्यावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19406 views

💬 प्रतिसाद
ब
बहुगुणी Fri, 11/30/2012 - 15:42 नवीन
Image removed. फक्त ते टायमिंग साधणं महत्वाचं असावं (ते वेळेत वाफवायला ठेवलं नाही तर काय घडेल ते सांगितलं नाहीत? (प्रयोग फसल्यावर आपोआप कळेलच म्हणा! :-)) धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Fri, 11/30/2012 - 15:59 नवीन
आगो ते सांगायचे काय. वेळेत वाफ़वायला ठेवल नाही तर गाताना सम चुकली तर जशी गाणा-याची फ़जिती होते ना तशी होईल हो. बरोबर आहे ग. ते टायमिंग अगदी महत्वाचे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/30/2012 - 15:46 नवीन
सफेत ढोकळा! तांदुळाच्या रव्याचा माहित होता. हा पण चांगला लागेल. दिसतोय छान!
  • Log in or register to post comments
क
कुसुमिता१ Fri, 11/30/2012 - 15:48 नवीन
दही मोडून घ्यावे म्हणजे?? फेटून घ्यायचे का?? पाककृती छान आहे!
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Fri, 11/30/2012 - 16:02 नवीन
दही मोडायचे म्हणजे रवीने थोडे घुसळायचे पण अगदी ताक नाही करायच. दह्याच्या कवड्या मोडल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 12/01/2012 - 05:59 नवीन
चांगली आहे. करुन बघायला पाहिजे. पण अहो, ज्यांना दही मोडायचे माहित नाही त्यांना दह्याच्या 'कवड्या' कशा माहित असणार ? 'अदमोरं वगैरे शब्द कसे कळणार ? तिरशिंग आजोबा
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 12/02/2012 - 16:22 नवीन
नसेल कळत, तर मोवळं दही घ्या जरासं..
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 11/30/2012 - 16:23 नवीन
बरा दिसतोय पांढरा ढोकळा, चव कशी ती आता करुन बघितल्यावरच कळेल!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/30/2012 - 17:08 नवीन
फोटू टाकलात हे ब्येष्ट केलेत, गोवेकरीन मावशी !
  • Log in or register to post comments
व
विनटूविन Fri, 11/30/2012 - 17:50 नवीन
मावशी हळद घातल्यास नेहमीच्या ढोकळ्यासारखाच दिसेल काय? हा पण मस्त आहे. ज्याना बेसन चालत नाही, लो क्यालरी हवा त्याना तर बेस्टच!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 12/01/2012 - 05:42 नवीन
अरे वा.... हा झटपट ढोकळा करुन बघायला पाहिजे :) फोटू एकदम मस्त :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 12/01/2012 - 10:30 नवीन
झटपटच दिसतोय ढोकळा. कधी तरी सामान जमवून करेन. - पिंगू
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/01/2012 - 10:43 नवीन
आँ.......
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sat, 12/01/2012 - 11:43 नवीन
माझाही असाच ऑ झाला पिंगूचा प्रतिसाद वाचून :O :O :O अस्स्सा पण बहुतेक त्याने सामान ह्या शब्दावर श्लेष शाधला असावा ;) - (काहीही झटपट न करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/01/2012 - 11:55 नवीन
सामान नको, सामानं जमवा आणि मग आम्हाला देखील बोलवा.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/01/2012 - 17:27 नवीन
दुसर्‍या कोणी कशाला जमवायला पाहिजे. तुझं सामान तू जमव्....तेही शोधून! नाहीतर माझ्या ववसूमं मध्ये नाव नोंदव. तुझ्यासारखा शेलीब्रिटी आहे म्हटल्यावर लगेच लग्ने जमतील्.....बाकीच्यांची! ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/03/2012 - 12:49 नवीन
आम्ही ज्यांना गुळाची पोळी आणि ढोकळा बनवता येतो अशाच काकुंच्या ववसूमं नाव नोंदवायचे नक्की केले आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 12/01/2012 - 11:32 नवीन
बहुधा खमण आणि ढोकळा असे दोन प्रकार असावेत. किंवा एक खमण ढोकळा आणि एक नुसताच ढोकळा असे असावे. आपल्याकडच्या पोळ्या आणि पुरण पोळ्यांप्रमाणे. चण्याच्या पिठाचा तो खमण (हाच कुसकरून त्यावर बारीक शेव घातली की ते अमीरी खमण)आणि तांदुळाचा तो ढोकळा असे असावे.चूभूदेघे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 12/01/2012 - 17:32 नवीन
ही स्वातीताईची कृती. http://www.misalpav.com/node/21980 तांदळाचा जेंव्हा (थोडी उडदाची डाळ) दही घालून उबदार हवेत ठेवून ढोकळा करतात त्याला खट्टा ढोकळा म्हणताना ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 12/01/2012 - 16:04 नवीन
पाककृती चांगली आहे. पण पुढल्यावेळी छायाचित्रं स्वतः केलेल्या पदार्थाचं द्या. वा जालावरुन उचललेलं * असल्यास तसं सांगा. :) * वरून दुसरा फटू.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 12/01/2012 - 16:29 नवीन
Just to clarify: मी केवळ गोवेकरांच्या धाग्याच्या विषयाला दृष्य मदत व्हावी या सद्हेतूने त्यांनीच दिलेला image source code इथे धाग्यात फक्त embed केला आहे इतकंच. त्यांनी स्वतः ते चित्र कुठून घेतलं त्याची मला अर्थातच कल्पना नाही. (कुणास ठाऊक, कदाचित स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो घेतला असेल :-) - गोवेकर काकू: गंमत करतो आहे, हलकेच घ्या ही विनंती!)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 12/01/2012 - 16:36 नवीन
हा हा हा. काका तुम्ही केली तशी मदत मी ही करणार होतो.(धाग्यातच तो फोटु चढवून.) पण थोडं गुगलल्यावर कळलं की हा फटु जालावरुन उचललेला आहे. (आता त्या स्पॅन फूड्सवाल्यांनी गोवेकरांच्या पांढर्‍या ढोकळ्याचा फोटो उचलला असल्यास आम्ही आमचे विधान मागे घेतो. (म्हणुन स्वत:च्या कला कृतीवर एखादा हलकासा वॉटरमार्क टाकावा.) ) असो आज्जीबै खुलासा करतीलच.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 12/02/2012 - 16:25 नवीन
अहो, त्यांणा फटू येत नाहीत काढता ना चढवता. ढोकळा कसा दिसतो यासाठी त्यांच्या नातीने दिलं असेल एकादं जालावरचं चित्रं! तुम्हीपण ना! कित्ति पोटदुखी ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 12/02/2012 - 18:22 नवीन
पोटदुखी? असो. ज्याचं क्रेडीट त्याला मिळावं येवढंच म्हणण होतं. त्यास आमची पोटदुखी समजायचे असेल तर समजा. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 12/02/2012 - 18:25 नवीन
आजकाल उपहासाचा बी उपास घडाया लागलाय. अहो ते र्‍हेटोरिक लिव्लं होतं म्या!
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 12/01/2012 - 16:09 नवीन
खांसाहेब तालीम अगदी खायकीच्या अंगाने घ्यायचे. खमण आणि अमीरी खमण हा फरक अगदी भैरव आणि अहीर भैरवातला फरक समजावून सांगावा तसे सांगायचे. दही मोडून घेणे म्हणजे अगदी दह्याची आणि रवीची थोडीशी नोमथोम. अगदी अशाच काही शब्दात सांगीतलं असतं. असो .खांसाहेबांच्या आठवणी बर्‍याच आहेत. एकेक करून सांगीनच.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 12/01/2012 - 19:40 नवीन
और ये लगा सिक्सर!! गोलंदाज के डोके के उप्पर से..स्टेडीयम के बाहर!! :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sat, 12/01/2012 - 17:55 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 12/01/2012 - 19:36 नवीन
विजय चव्हाणनं म्हणे 'मोरुची मावशी' नाटकामध्ये 'स्त्रीपार्टी' फारच सुंदर वठवली. नंतर आलेल्या बर्‍याच नाटक चित्रपटांमध्ये त्यानं स्त्री भूमिका केली..... पण मोरुच्या मावशीला जे यश मिळालं ते इतरांना नाही मिळालं. असो. ढोकळा चांगला वठलाय. :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 12/02/2012 - 21:15 नवीन
प्यारे प्यारे +१ प्रतिसाद
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Sun, 12/02/2012 - 01:52 नवीन
छानच. ढोकळ्याचा अगदी सोपा प्रकार वाचून लगेच लिहुन ठेवला.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sun, 12/02/2012 - 18:55 नवीन
छानच झटपट ढोकळा आहे.
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Mon, 12/03/2012 - 09:55 नवीन
फोटोबद्द्लचा खुलासा: नात म्हणाली 'आजी आपण करतो अगदी तस्साच दिसणारा फोटो देउ का ग? मी म्हणाले पाह? ... तो पाहिला. अर्थात तो दुस-या कुणी केलेल्याचाच आहे पण अगदी हुबेहुब ह्या पाककृति प्रमाणे केल्यावर जसा होतो तस्साच होता. म्हंणून म्हणाले दे. ईतकेच. नाहितरी ज्योति म्हणाली होतीच की 'पा. कृ चा अंदाज येण्यासाठी फोटो हवा' ह्या फोटोने तो अंदाज येतो आहे. आणि एवढा काथ्याकूट करण्यापेक्षा करून पहा ना एकदा... साहित्य घरी असणारेच आहे. मुद्द्दाम काही जमवाजमव करायला नको. पण 'केला. चांगला होतो' अस मात्र लिहीणार कुणि नाही.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 12/05/2012 - 14:45 नवीन
आज घरी मुलांची बँड प्रॅक्टीस आहे. काहीतरी खायला करायचं पण तळकट नको म्हणून म्हटलं ही रेसीपी ट्राय करुन बघते. आत्ताज ताजा ताजा तयार झालाय. एकदम झक्कास झालाय. माझ्याकडे ऑरेंज इनो होतं त्यामुळे त्याचाही एक मस्त फ्लेवर आला. मी मिश्रणात मिर्ची पेस्ट ऐवजी मिर्चीचे अगदी पातळ काप घातले. गौराबाई ....या झटपट रेसीपीसाठी मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर Wed, 12/05/2012 - 16:42 नवीन
धन्यवाद मा़झ्यावर विश्वास ठेउन ही रेसीपी ट्राय केल्याबद्दल. अभिनंदन. ती झकास झाल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 12/05/2012 - 16:20 नवीन
फोटु कुठाय ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा