झटपट चॉकलेट मफिन्स
पुन्हा एकदा पाक्रु कडे वळायचे ठरवले आहे. आता आधी सारखे वरचेवर पोस्ट करता येण अवघड दिसतंय पण प्रयत्न प्रामाणिक असेल. अवघड का? अहो, ११ महिन्याचा आमचा 'राजस' काही वेळ देईल तर नं! असो. आता पटकन मफिन्स करून बघा पाहू.
सामग्री:
१ १/४ कप मैदा
१/२ कप पिठी साखर
१ अंड
५० ग्राम वितळलेलं लोणी (मी अमूल बटर वापरलं )
१/४ कप दूध
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून व्हेनिला इसेन्स
३ मोठे चमचे चॉकलेट सिरप (हर्शीस)
कृती:
- ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस ला प्री-हिट करून घ्या.
- एका माफीन ट्रे मधे पेपर लायनर ठेऊन घ्या.
- एका मोठ्या भांड्यात, मैदा, साखर, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या. दुसऱ्या एका छोट्या भांड्यात अंड, दूध, बटर, चॉकलेट सिरप आणि इसेन्स फेटून घ्या. मग हे ओलं मिश्रण त्या कोरड्या मैद्याच्या मिश्रणात घालून त्याला एकजीव करा. खूप वेळ फेतात बसू नका, नाहीतर मफिन्स कोरडे होतील.
- मिश्रण ट्रे मधल्या पेपर कप मध्ये घालून (थोडी जागा बाकी ठेवावी, कारण मफिन्स फुगतात) ओव्हन मध्ये २० मिनिट बेक करा. गार झाल्यावर, हव असल्यास आयसिंग करा.
आयसिंग साठी:
२ मोठे चमचे जाडी साय
३ मोठे चमचे न्युटेला चॉकलेट स्प्रेड
१ टी स्पून दूध
५ मोठे चमचे आयसिंग शुगर (पिठी साखर वापरली तरी चालते, फक्त त्याने आयसिंग छान स्मूथ होणार नाही)
- आयसिंग च्या सर्व सामग्रीला नीट कालवून फेटून घ्या, गुठळ्या राहायला नकोत. मफिन्स तयार होऊन, गार झाल्यावर त्यावर हे आयसिंग लावावे. 💬 प्रतिसाद
ग
गणपा
गुरुवार, 11/29/2012 - 13:12
नवीन
तरीच म्हटलं कुठं गायबला होतात ईतके दिवस. :)
अभिनंदन !
केककृती आवडली.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 11/29/2012 - 13:21
नवीन
आहा.. क्या बात है.. खादाडताई परत आल्या म्हणजे आता मिपावरच्या मेजवान्यांत आणखीनच वाढ.... :)
वेलकम ब्याक... !!!
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 11/29/2012 - 13:32
नवीन
:)
फोटो फारच गोड आहेत.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 11/29/2012 - 13:46
नवीन
ओह्हो! किती गोड! तुमचा मुलगा आणि मफीन्स दोन्ही.
अभिनंदन अमिता.
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 11/29/2012 - 14:42
नवीन
तुम्हाला पोस्ट न करायला 'गोड' कारण मिळालेले आहे. :-)
मफिन आयसिंगशिवायही छान लागतील असे वाटते.
- Log in or register to post comments
ज
जयवी
गुरुवार, 11/29/2012 - 15:12
नवीन
अहा........एकदम सोप्पी कृती दिसतेय. मस्तच !!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 11/29/2012 - 16:47
नवीन
मफिन्स आवडले,
स्वाती
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/29/2012 - 16:52
नवीन
मफिन्स आणि राजस दोन्ही गोड आहेत!
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
गुरुवार, 11/29/2012 - 16:57
नवीन
पाकृ आवडली आणी राजस ही :)
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
गुरुवार, 11/29/2012 - 17:52
नवीन
पाकृ आणि पिल्लु दोन्ही मस्त.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 11/29/2012 - 18:22
नवीन
वरुन दुसर्या फोटोतला मफिन खूप जास्त आवडला..
- Log in or register to post comments
व
विशाखा राऊत
गुरुवार, 11/29/2012 - 19:45
नवीन
मस्त आहे राजस न मफिन्स दोन्ही :)
- Log in or register to post comments
प
पिंगू
Fri, 11/30/2012 - 05:17
नवीन
दुसर्या फोटोतला मफिन गोजिरा दिसतोय आणि तिसरया फोटोतला मफिन आताच उचलून तोंडात टाकावासा वाटतोय..
- पिंगू
- Log in or register to post comments
प
पियुशा
Fri, 11/30/2012 - 06:08
नवीन
मस्त , पण ज्यांच्याकडे ओव्हन नाही ते नाही बनवु शकणारे का हे मफिन्स ?
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
Wed, 12/12/2012 - 06:40
नवीन
पियुशा,
कुठल्या तरी प्रकार चा ओव्हन लागणार हे करायला.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 11/30/2012 - 06:13
नवीन
डोरा केक (पहिला फोटो वरुन तसा दिसतोय म्हणुन)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 11/30/2012 - 06:33
नवीन
वाह्ह ! :)
(चॉकलेट प्रेमी)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/03/2012 - 09:16
नवीन
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
Wed, 12/12/2012 - 06:37
नवीन
सगळ्यांचे खूप आभार :)
- Log in or register to post comments