Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोंबडी मसाला(मालवणी पद्दत)

ज
ज्योति प्रकाश
Mon, 11/26/2012 - 11:38
साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती) तीन मोठे बारीक चिरलेले कांदे. एक मोठी वाटी लसूण. अर्धी वाटी चिरलेले आलं. मीठ. दोन चमचे हळद. एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार) एक चमचा धणे. ५-६ लवंग. ८-१० काळी मिरी. एक मध्यम उभा चिरलेला कांदा. तेल. बारीक चिरलेली कोथिंबीर. अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले. कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट करत ठेवावे.भांड्यात तेल घालून तापले की त्यात बारीक चिरलेला कांदाघालून मऊ होईपर्यंत परतावा. नंतर त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे.त्यातच मालवणी मसाला घालून चांगले परतावे.पाणी घालून चांगले शिजू द्यावे.कढईत थोडे तेल घलून त्यात प्रथम धणे,लवंग्व मिरी परतून घ्यावे त्यातच उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.नंतर त्यात खवलेले खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. चिकन शिजले की त्यात हा वाटलेला खोबर्याचा मसाला घालावा.पाहिजे तेव्हडे पातळ करून चांगली उकळी येऊ द्यावी.त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.सर्व्ह करतांना वरून सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालावी. चपाती,ब्रेड किंवा भाकरी बरोबर खायला द्यावे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10427 views

💬 प्रतिसाद
स
सस्नेह Mon, 11/26/2012 - 11:42 नवीन
मालवणी मसाला कसा बनवावा ?
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Mon, 11/26/2012 - 11:45 नवीन
गणपाभौ मी दिलेली मालवणी मसाल्याची रेशिपी जरा डकवा कि राव हिथं.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/26/2012 - 12:18 नवीन
मालवणी मसाला इथे पहावा. अवांतर : टोंपासू :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/03/2012 - 11:55 नवीन
गणपा शेठ. आता इकडे रवांडात शहाजिरे शोधणे आले. बाकी ही पाककृती कोंबडी न घालता कशी बनवता येईल ?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 11/26/2012 - 11:45 नवीन
एकदम जबरदस्त असेल यात शंकाच नाही पण...... एक सांगा एक वाटी लसुण ... ठीक आहे अर्धी वाटी आलं ....आलं अर्धी वाटी ??????????
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Mon, 11/26/2012 - 11:47 नवीन
जरा चमचमीत लागतं हो. नाहितर एकदमच मिळमिळीत होतं.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 11/26/2012 - 11:51 नवीन
ते ही खरचं म्हणा. पण ह्या आल्यामुळे " आलं" आणी "गेलं" अस नाही ना होत ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/26/2012 - 14:00 नवीन
@" आलं" आणी "गेलं" अस नाही ना होत ...>>> Image removed.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Mon, 11/26/2012 - 14:44 नवीन
ते खाउन झाल्यवरच समजेल... :) बाकी तुम्हाला धोका नाही.. :bigsmile:
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 11/26/2012 - 15:27 नवीन
देवा मी मालवणी घरात का नाही जन्मलो म्हणजे तारुण्यात प्रवेश करेपर्यंत ह्या उदर भरणाच्या मालवणी स्वर्गीय सुखाला मला मुकावे लागले नसते.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 11/26/2012 - 17:19 नवीन
अप्रतिम दिसतयं चिकनः)
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Tue, 11/27/2012 - 02:14 नवीन
चिकन अनेक प्रकारे करता येते. तुमची पध्दत आवडली. जनरली तयार केलेला कुठल्याही रश्याच्या चिकनला दुसर्‍या दिवशी आणखीनच चव येते-उरल्यास.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री अमित Tue, 11/27/2012 - 09:01 नवीन
मसाला पण एक वाटि आहो तुमचि वाटि किति मोठि आहे ते तरि लिहा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 11/27/2012 - 09:06 नवीन
सुंदर आणि चवदार दिसतंय! या रविवारी हेच करणार!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 11/27/2012 - 10:18 नवीन
अहा..... एकदम झक्कास दिसतंय :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/27/2012 - 18:29 नवीन
Image removed. आधी केले, मग सांगितले!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 12/03/2012 - 11:38 नवीन
बाई ग! प्रत्येकवेळी प्रतिसाद द्यायला आले की गेल्यासारख होउन रहातय त्या इरसालरावांमुळे. पण आज अजिबात वर न बघता टंकते. लय भारी. करुन पाहेन अन कळवेन.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 12/03/2012 - 12:22 नवीन
मस्त दिसतासा चिकन. एकदम साग्रसंगीत मसाले-वाटण-घाटणासकट!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Tue, 12/04/2012 - 11:44 नवीन
धन्यवाद मंडळींनु.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा