झटपट ढोकळा.
साहित्यः-एक वाटी चण्याचे पीठ्.(बेसन)
पाऊण वाटी पाणी.
५-६ लसूण पकळ्या.
४-५ हिरव्या मिरच्या(तिखट असल्यास कमी घेतल्या तरी चालतील)
एक बोटाचे पेर आलं.
अर्धा चमचा सायट्रीक अॅसिड.
एक सॅशे इनो फ्रुटसॉल्ट.
मीठ.
एक चमचा साखर.
चार चमचे तेल.
मोहरी व तेल फोडणीसाठी.
ओल्या खोबर्याचा चव व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती :-प्रथम लसूण,आलं व हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेणे.एका मोठ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात वाटलेली पेस्ट
चवीपुरते मीठ्,साखर,तेल व सायट्रीक अॅसिड घालून मिक्स करावे.थोडे-थोडे पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे.
कुकरच्या भांड्याला तेल लावून ठेवावे.आता मिश्रणात इनो घालून जोरात एकाच दीशेने चांगले ढवळावे.तयार
मिश्रण कुकरच्या भांड्यात ओतावे.झाकण न ठेवता डबा कुकरमध्ये ठेवावा.शिटी काढून ढोकळा १५-२०
मिनीटे शिजवून घ्यावा.तयार ढोकळ्याचा डबा बाहेर काढून थंड करत ठेवावा.थंड झाल्यावर त्यावर मोहरीची
फोडणी करून घालावे.ढोकळ्याच्या वड्या कापाव्या.खोबरे व कोथिंबीर घालून सजवावे.
💬 प्रतिसाद
प
पियुशा
Mon, 11/26/2012 - 11:22
नवीन
फोटु फोटु फोटु .....
- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 11/26/2012 - 11:23
नवीन
दिसला दिसला दिसला ....
आवड्ता पदार्थ :)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 11/26/2012 - 11:40
नवीन
फक्त तीनच ?
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
Mon, 11/26/2012 - 11:49
नवीन
एव्हढे तरी आहेत हे नशिब नाहितर नुसती डीशच दिसली असती.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 11/26/2012 - 12:27
नवीन
मस्तच आहे की! इनो ऐवजी खायचा सोडा घातला तर कसे?
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 11/26/2012 - 16:14
नवीन
फोटू छान आलाय. यावरून आठवले की मला ढोकळा करता येत नसल्याने रेडी मिक्सचे पाकीट आणून ठेवले आहे. फार जुने होण्याच्या आधी संपवायचे आहे. कोणी कितीही सोपी पद्धत सांगितली तरी ढोकळा व गुळाच्या पोळ्या हे पदार्थ मला चांगले जमत नाहीत.
पैसाताई, सोडा घातला तरी चालतो पण मिपाकरांकडे नेहमी ईनो असतो म्हणून तसा उल्लेख केला असेल. ;)
- Log in or register to post comments
द
दीपा माने
Tue, 11/27/2012 - 02:04
नवीन
एकंदर पाकृ चित्राप्रमाणे हा ढोकळा हलका आणि चविष्टही झाला असेल. नक्कीच करुन पाहाणार.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 11/27/2012 - 03:57
नवीन
अय्यो ! बर झाल रेवती आठवण केलीस. आज पाऊसपण पडतोय अन घरातल रेडीमिक्स ढोकळ्याचक पाकिट संपवायच आहे. ठ्ञंक्यु!
तुमचा ढोकळापण आवडला . फोटोपण मस्तच.
- Log in or register to post comments
प
पिंगू
Tue, 11/27/2012 - 05:13
नवीन
ज्योतिताई, सायट्रिक अॅसिडएवजी लिंबू वापरला असता, तर आणखी उत्तम.
बाकी ढोकळा म्हणजे ऑलटाईम फेवरेट.
- पिंगू
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री अमित
Tue, 11/27/2012 - 09:05
नवीन
लिंबू किति वापरायचा सायट्रिक अॅसिडएवजी
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 11/29/2012 - 10:01
नवीन
अर्धा चमचा सायट्साठीअॅसिडएवजी दोन चहाचे चमचे लिंबाचा रस पुरेल.
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Tue, 11/27/2012 - 20:23
नवीन
आज रात्री बनवुन पहिला. चविष्टही झाला. माझ्या आईला खुप आवडला.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 11/28/2012 - 09:38
नवीन
ढोकळा छान दिसतो आहे, ह्या प्रकारानेही करुन पाहिन.
@ रेवती, चकलीच्या ढोकळा रेसिपीने केलेला ढोकळा मस्त होते, अजिबात बिघडत नाही, आणि त्यातून बिघडलाच तर अमिरी खमण करायचा ग, हाकानाका, ;)
स्वाती
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 11/28/2012 - 13:35
नवीन
माझा तर रेडी मिक्सचाही बिघडतो. ;)परवा केला तर त्याचे आमिरी खमणच करावे लागले. मुलाने विचारले की हे स्क्वेअर्स असतात ते असे काय झाले? म्हटलं ही नवी रेसिपी आहे. ;)
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Wed, 11/28/2012 - 10:58
नवीन
अतिशय सुंदर......................करुनच पहाते..... :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 11/28/2012 - 16:34
नवीन
मने तो ढोकलो बहु गमे छे ! ;)
- Log in or register to post comments
स
सविता००१
गुरुवार, 11/29/2012 - 10:14
नवीन
छानच होतो हा ढोकळा. परत पीठ भिजवून आंबवण्याची गरजही नाही. कधीही करता येतो. झकास.
- Log in or register to post comments
प
पियुशा
Sun, 12/02/2012 - 11:04
नवीन
येकसक्युजमी ज्योतिजि !!!
मी कालच ढॉकळा केला अन तो पुर्णपणे गंड्ला, स्पाँजी झाला पण आतुन कच्चा राहिला १५ -१७ मिनिट वाफवुनदेखील :(
मग ( घरच्यांची बोलणी खावी लागु नये म्हणुण मी गुपचुप तो कुस्ककरुन कांदा मिरची तिखटाची फोड्नी देउन जे काही उपम्यासद्रुश झाल होत ते दह्याच्या चटनीबरोबर सगळ्यांना खाउ घातल :( अन वेळ मारुन नेली हुश्श.........
- Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश
Mon, 12/03/2012 - 11:05
नवीन
शिजवताना झाकण ठेऊ नका. नाहितर झाकणाचं पाणी पडून कच्चा राहण्याची शक्यता असते.
- Log in or register to post comments
ज
जागु
Sun, 12/02/2012 - 19:13
नवीन
मस्त.
- Log in or register to post comments
र
रुमानी
Mon, 12/03/2012 - 11:17
नवीन
छानच दिसतोय (जमलाय)
- Log in or register to post comments