मैदा चकली
मैदा चकली
हाय मिपाकर्स ..
कशी झाली दिवाळी ?
आज माझी रेसेपी बघून तुम्हाला पिवशी डोक्यावर पडलीये का असा प्रश्न पडू शकतो ? दिवाळी झाल्यानंतर चकलीरेसेपी ?
असो .....
मैदा चकली :
साहित्य : ३ वाट्या मैदा , बटर / तेल एक चमचा , तीळ २ चमचे , ओवा १ छोटा चमचा , जिरे १ छोटा चमचा , हिंग छोटा अर्धा चमचा , हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार , एक वाटी शिजवलेली मुग दाळ, लालतिखट १ चमचा (ऑप्शनल )
कृती :
मैद्याची सुती किंवा तलम कापडामध्ये पुरचुंडी बांधून घ्या.
आता ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावा.
कुकरमध्ये अर्धा डब्बा बुडेल इतपत पाणी घेऊन त्यात हा मैदा (पुरचुंडीचा डब्बा ) १५ -१० मिनिट वाफवून घ्या . साधारण ४-५ शिट्ट्या होतील.
कुकरची वाफ गेल्यावर हा मैदा काढून घ्या ह्याचा मोठा ढेकूळ तयार झाला असेल तो लाटण्याने फोडून घ्या अन मग चाळुन घ्या.
आता ह्यात जीर ,ओवा ,मीठ, बटर /तेल हिंग लालतिखट अन शिजवलेली मुगाची डाळ घालून एकजीव गोळा करा .
दाळ शिजवताना जे पाणी घालतो त्याच पाण्यात हा मैदा मळुन घ्या पीठ कणकेसारखे मऊ असावे ,घट्ट नको नाही तर चकली पाडताना तुमचे हाताचे मसल्स टाईट होतील ;) आता हा गोळा १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
आता तेल गरम करा तेल कडकडीत झाल कि आच मंद करा. सोरयाला तेलाचा हात लावून यात मिश्रण घालून एका ताटात आधी चकल्या पाडून घ्या. अन मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्या . ह्या चकल्या अगदी कुरकुरीत अन तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात.
हुस्श्श.....आतापर्यंत ( पा.कृ . साठी ) घेतलेल्या कष्टाचे कुरकुरीत अन खुसखुशीत फळ घरच्यांना चाखायला मिळाल्यावर हरबरयाच्या झाडावर चढण्यासाठी तयार असा ;)
* ह्या चकल्यांना साउथकडे मैदा मुरुक्कु म्हणतात फक्त यात मुगाची डाळ अन तिखट नसते
आता ही पुरचुंडी एका डब्यात घालून डब्याला घट्ट झाकण लावा.
कुकरमध्ये अर्धा डब्बा बुडेल इतपत पाणी घेऊन त्यात हा मैदा (पुरचुंडीचा डब्बा ) १५ -१० मिनिट वाफवून घ्या . साधारण ४-५ शिट्ट्या होतील.
कुकरची वाफ गेल्यावर हा मैदा काढून घ्या ह्याचा मोठा ढेकूळ तयार झाला असेल तो लाटण्याने फोडून घ्या अन मग चाळुन घ्या.
आता ह्यात जीर ,ओवा ,मीठ, बटर /तेल हिंग लालतिखट अन शिजवलेली मुगाची डाळ घालून एकजीव गोळा करा .
दाळ शिजवताना जे पाणी घालतो त्याच पाण्यात हा मैदा मळुन घ्या पीठ कणकेसारखे मऊ असावे ,घट्ट नको नाही तर चकली पाडताना तुमचे हाताचे मसल्स टाईट होतील ;) आता हा गोळा १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
आता तेल गरम करा तेल कडकडीत झाल कि आच मंद करा. सोरयाला तेलाचा हात लावून यात मिश्रण घालून एका ताटात आधी चकल्या पाडून घ्या. अन मंद आचेवर चकल्या खरपूस तळून घ्या . ह्या चकल्या अगदी कुरकुरीत अन तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात.
हुस्श्श.....आतापर्यंत ( पा.कृ . साठी ) घेतलेल्या कष्टाचे कुरकुरीत अन खुसखुशीत फळ घरच्यांना चाखायला मिळाल्यावर हरबरयाच्या झाडावर चढण्यासाठी तयार असा ;)
* ह्या चकल्यांना साउथकडे मैदा मुरुक्कु म्हणतात फक्त यात मुगाची डाळ अन तिखट नसते 💬 प्रतिसाद
ग
गणपा
Mon, 11/26/2012 - 09:01
नवीन
चकलीसाठीचं नवं काँबीनेशन (मैदा+मुगडाळ) आवडले गो.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 11/26/2012 - 09:22
नवीन
चकली अस्सल पुणेरी दिसते ! नाही, म्हणजे दोनच नाssजुक वेढे दिसताहेत म्हणून म्हटलं.
आमची कोल्हापुरी हि अशी घसघशीत दिसते.

- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 11/26/2012 - 10:01
नवीन
पुणेरी ??
काकु मी नगरकरिन आहे ;)काय्ये ना हा माझा पहिलाच प्रयत्न होता म्हणुन दोनच नाजुक वेढे घातले :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 11/26/2012 - 11:29
नवीन
@हा माझा पहिलाच प्रयत्न होता म्हणुन दोनच नाजुक वेढे घातले >>>
असेच शिक्षण चालू राहो...आंम्हाला वेढे आवडले.
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Mon, 11/26/2012 - 20:21
नवीन
वेढे वेड लावण्यासारखे हैत नै गुर्जी ?? ;)
:P
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 11/27/2012 - 03:50
नवीन
हांग अस्शी. एक बशीभर एक चकली. काय खमंग असते म्हणुन सांगु. मी पण करते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 11/26/2012 - 09:28
नवीन
चकल्या अगदी खुसखुशित झालेल्या दिसताहेत.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 11/26/2012 - 09:31
नवीन
या प्रकारच्या चकल्या पूर्वी केल्या आहेत. पण कॉम्बिनेशनला मूगडाळ आणि कणीक घेतली होती. गोव्यातली अॅडिशन म्हणजे जरासा गूळ घालतात. चकल्या मस्त होतात आणि आजपर्यंत कधी बिघडल्या नाहीत.
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Mon, 11/26/2012 - 09:37
नवीन
छानच गं पिवशे! मीसुद्धा या दिवाळीत भाजणीच्या चकल्यांसोबत या चकल्या केल्या होत्या. मस्त लागतात आणि तुझी चकली तर छान खुसखुशीतही झालेली दिसतेय.
फक्त चकलीच्या आकाराने जरा मार खाल्लाय... पण जमेल सरावाने :)
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 11/26/2012 - 10:53
नवीन
'चकल्या', आकारांत किंचित 'चुकल्या' पण दिसताहेत खास. करून पाहिल्या पाहिजेतच. अभिनंदन.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 11/26/2012 - 10:58
नवीन
चकल्या आकारात गंडल्या आहेत. बाकी रेशिपी उत्तम. अशा प्रकारे कधी करुन पाह्यल्या नाहीत पण या चकल्या फार तेल पितात अशी ऐकीव माहीती आठवतेय.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 11/26/2012 - 11:32
नवीन
हिच पद्धत वापरुन , पण ज्वारीचे पीठ आणि थोडी थोडी बाकी पीठे घालुन मस्त चकल्या होतात..
- Log in or register to post comments
स
स्मिता शितूत
Mon, 11/26/2012 - 12:21
नवीन
मला फोटु दिसलेच नाहित
- Log in or register to post comments
स
सर्वज्ञ
Mon, 11/26/2012 - 12:23
नवीन
आग खुप छान चकल्या अगदी खुसखुशित झालेल्या दिसताहेत..मला ख्यावीशी वाट्ते ग...
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 11/26/2012 - 16:18
नवीन
छान झाल्यात चकल्या.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
Mon, 11/26/2012 - 17:21
नवीन
वाह वाह
चकल्या चांगल्या जमल्यात गं ...
अशाच कणकेच्या उकडीच्या चकल्या ही करतात :)
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Mon, 11/26/2012 - 19:30
नवीन
हायला! नवीनच प्रकार दिसतोय! सहीच.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 11/27/2012 - 03:53
नवीन
मैद्याची चकली नाही ग कधी केली, पण गव्हाच्या पिठाची केली आहे.
हे जरा नविन दिसतय, विथ मुग डाळ.
मस्त दिसताहेत.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Tue, 11/27/2012 - 04:07
नवीन
आता बाकीचाही फराळ येऊ दे क्रमाक्रमाने. ;)
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Tue, 11/27/2012 - 06:33
नवीन
छान ,मला हि चकली खूपच आवडते उगाच भाजणी बनवण्याची गरज नाही ;)
http://mejwani.in/
- Log in or register to post comments
स
सुहास..
Tue, 11/27/2012 - 06:50
नवीन
मला सुरुवातीला मैदा मुरूक्कु च वाटले होते ..असो ..मस्त लागतात या चवीला !
अवातंर : बाकी एक चकली एका घासाला पण पुरणार नाही ;)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 11/27/2012 - 12:41
नवीन
ओय ट्विटी... तुमने चकली बनाने के लिया शॉर्ट कट मारेला हयं,बोले तो ये एकदम नॅनो चकली दिखरेली हय ! ;)
लेकीन वांदा नय ! अपुन इधर कडबोळा खाता हय वैसेइच ये "मैदा राउंड" चकली समझके खा सकता हय ! ;)
जाते जाते हुए :--- लाटणे के नया इस्तेमाल आज मेरेकु समझ में आ गया ! ;)
(करंजी प्रेमी) ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/27/2012 - 13:54
नवीन
दिवाळीचा सगळ्यात भारी आवडता आयटम म्हणजे चकली...
चकली एका टोकापासून सुरुवात करत करत हळू हळू संपवत खायची नि संपली की थोडीशी हळहळ करत..... दुसरी हातात घ्यायची. आधी गरम गरम नि मग गार झाल्यावर कुडुम कुडुम करत!
आहाहा....!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 11/27/2012 - 21:51
नवीन
अग पिवशे इतके दिवस गप बसून बसून एकदम चकली?
दिवाळीच्या सुट्टीत फराळातले अजून काय काय शिकली?
- Log in or register to post comments