Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी (हुबळी स्टाईल)

स
सस्नेह
गुरुवार, 11/22/2012 - 16:55
a पहिल्यांदाच सांगते, ही पाकृ माझी नाही हं. याची कर्ती-करवती माझी वहिनी शिल्पा. तिचं माहेर हुबळी.तीच या पाकृची अन प्रतिसादांची मालकीण. दिवाळीचा गोडधोड फराळ खाऊन झाल्यावर भाऊबीजेला भाऊरायाला ओवाळायला कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरची पद्धत अशी की दिवाळीचा फराळ खाऊन ‘गुळमाट’ झालेलं तोंड भाऊबीजेला ‘वशाट’ खाऊन खंगाळायचं ! घरोघरी भाऊबीजेला मटण ! या भाऊबीजेला आमच्या भावांना (मायंदाळ हैत ) खिम्याच्या गोळ्यांचा आठव आला. झालं ! शिल्पा हुबळीची. मग हुबळी स्टाईल खिमा-पालकबॉल्स ग्रीन करीची फर्माईश झाली. भाऊरायानं लगबगीनं बाजारात जाऊन कवळ्या मटनाचा ताजा खिमा आणला. शिल्पानं साहित्य जमा केलं. मी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला उभी राहिले. s d पाव किलो खिमा , १ लहान कांदा बारीक चिरून १ चमचा मीठ पाव चमचा हळद, २ चमचे टोमॅटोसॉस १ चमचा सोय सॉस १ वाटी तेल, १ चमचा लसूण पेस्ट १ चमचा मिरची पेस्ट f पांढरा मसाला : ७-८ लवंगा, ३ इंच दालचीन १ चमचा जिरे, ३ चमचे धणे ४ वेलदोडे २ इंच आले, १ वाटी खोबरे, १० पाकळ्या लसूण ३-४ काड्या कोथिंबीर देठासहित. g हिरवा मसाला : १ कांदा मोठे तुकडे करून १ टोमॅटोमोठे तुकडे करून १ वाटी बारीक चिरलेला पालक ७-८ मिरच्या ७-८ काड्या कोथिंबीर देठे काढून चिरलेली. या पाकृला तेल अंमळ जास्त लागतेबरं !-- कोल्हापूरपेक्षा हुबळीचे लोक तर्री खाण्यात माहीर. त्यामुळे कट पाहून नाके मुरडणार्‍यांनी इकडे पाहूच नये अशी णम्र इनंती. आता खिमा धुवून निथळत ठेवला अन दोन्ही मसाले तयार केले. पांढऱ्या मसाल्यासाठी काढलेल्या साहित्यातले गरम मसाले १ चमचा तेलात २ मिनिटे परतून घेतले व पांढऱ्या मसाल्याच्या इतर साहित्याबरोबर मिक्सरमध्ये वाटून घेतले. h हिरव्या मसाल्यासाठी कांदा व टोमॅटोचे मोठे तुकडे व मिरच्यांचे तुकडे १ चमचा तेलात वेगवेगळे परतून घेतले. मग चिरलेला पालक व कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घेतले. आवडत असल्यास यात थोडी पुदिन्याची पाने घातली तर वेगळाच स्वाद येतो. j आता खिम्यामध्ये पाव चमचा मीठ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर व लसूण मिरची पेस्ट घालून २-३ मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घेतले व या मिश्रणाचे तेलाचा हात लावून पेढ्यापेक्षा थोडे लहान लहान गोळे बनवले. k गॅस पेटवून वर कुकर ठेवून त्यात तेल घातले. तेल तापल्यावर शिल्पाने कांदा घालून परतला. २ मिनिटांनी हळद घालून हलवले. मग अलगद खिम्याचा एक एक गोळा तेलात सोडला अन गॅस मंद केला. k आता ५ मिनिटे बिलकुल हलवायचे नाही. ५ मिनिटांनीगोळ्यांचा रंग बदलून पांढरट होऊ लागला. मग अगदी हलक्या हाताने गोळे खालीवर करून पुन्हा २ मिनिटे ठेवले. मग त्यात प्रथम हिरवा मसाला घालून ३-४ मिनिटे हलकेच परतले. l मग पांढरा मसाला घालून तसेच परतले. z आता मीठ , सोया सॉस व टोमॅटो सॉस घालून मिसळले अन कुकरचे झाकण लावून पूर्ण आचेवर दोन शिट्ट्या केल्या अन मंद आचेवर पुन्हा ५-७ मिनिटे ठेवले. कुकर थंड झाला अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी खानेको तैय्यार ! x गरमागरम भाकरी, तांबडा रस्सा अन खिमा-पालकबॉल्स ग्रीन करी असे मस्त सजले ताट ! c v चला मंडळी जेवायला....!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5234 views

💬 प्रतिसाद
र
रामदास गुरुवार, 11/22/2012 - 17:07 नवीन
सजावट पण चांगली केली आहे. या अगोदर तुमच्या पाककृती वाचल्या नव्हत्या. हे पदार्पण असेल तर पहील्याच खेळीत सेंच्युरी !!!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 11/23/2012 - 08:12 नवीन
पहिल्याच खेळीत सेंच्युरी!
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 11/22/2012 - 17:35 नवीन
फटू दिसलेच न्हाईत. :-p
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/22/2012 - 18:27 नवीन
पाकृ आणि फोटो दोन्ही अप्रतिम! मागच्या वेळेस वांग्याची भाजी पण खास दिसली होती ना!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/23/2012 - 12:50 नवीन
वांगी अजून आठवणीत ठेवल्याबद्दल धन्स. एकदा करून बघच. नाहीतर इकडेच ये खायला !
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 11/22/2012 - 18:34 नवीन
वा.... superb.... एकदम टेस्टी दिसतय..तोंपासु :)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 11/22/2012 - 20:38 नवीन
फोटू आणि पाकृ छानच. शाकाहारी असल्याने चवीबद्दल काही सांगू शकणार नाही. हुबळीकर हे कोल्हापूरकरांपेक्षा जास्त तेलाचे खाणे पसंत करतात हे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/23/2012 - 06:54 नवीन
मीपण सध्या शाकाहारीच आहे !त्यामुळे या डिशकडे बघत बघत श्रीखंड-चपाती खाल्ली !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 11/23/2012 - 01:56 नवीन
मी लगेच मोबाईल घेऊन फोटो काढायला उभी राहिले बरीच दमली असशील नाही का? वैसे मला मराठी लिहावाचाय्ला येत नाही. त्यामुळे काहीही वाचले नाही. चष्म्या शिवाय दिसत नसल्याने काहीही पाहिले नाही. (खरतर घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत. त्यामुळे दिसत नसाव. हं! आमच कोल्हापुर)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/23/2012 - 06:56 नवीन
मग माहेरी गेल्यावर विश्रांती नको का ? आणि सजावटपण मीच केली ना !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/23/2012 - 06:58 नवीन
घरच्या आठ्वणीने डोळे भरलेत. डिश बघून घरीच आहेस असं समज. सध्या तरी. इथे आलीस कि मी करून खाऊ घालीन आपल्या हाताने.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 11/23/2012 - 05:33 नवीन
मेलो मेलो. ते कच्चे खिमा बॉल उचलुनच खावुन टाकावे असे वाटत आहे तेव्ह्ढा धीर नाहीये.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 11/23/2012 - 05:51 नवीन
अरे वा! दमदार पदार्थ दिसतोय.. घरी मांसाहार बनवणे वर्ज्य असल्याने तुमच्याकडे येऊनच चापावा लगेलसे दिसते ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/23/2012 - 06:51 नवीन
लैच भारी स्नेहातै. हुबळीचे सावजी खिमा ऊंडे (पालक नव्हते त्यांत) आठवले एकदम. भारीच :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 11/23/2012 - 08:02 नवीन
पालक आणि मटणाची युती एकदम भन्नाट लागते. तस्मात खीमा-पालक आवडल्या गेले आहे. :)
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Fri, 11/23/2012 - 09:40 नवीन
घरी मांसाहार बनवणे वर्ज्य असल्याने तुमच्याकडे येऊनच चापावा लगेलसे दिसते पूर्णतः सहमत :-P ;) :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/23/2012 - 09:56 नवीन
शेवटचा फटू निव्वळ जीवघेणा!!! नाद खुळा :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर मुतालीक Fri, 11/23/2012 - 10:08 नवीन
येत्या बेस्तरवारला गावाकड निप्पाणला चक्कर मारनार हाय. तुमची मर्जी असल तर खिम्याचा बेत जमिवतो. त्येवडंच निप्पाणला याच तुमानी कारन गावल. तुमी शीरकंड खा, चाल्तंय की. पावन्यास्नी घ्युन या. तुमचा सांगाव धाडा.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Fri, 11/23/2012 - 11:37 नवीन
पाहूनच खावासा वाटणारा पदार्थ :) काल गुरुवार होता म्हणून मुद्दाम प्रतिसाद दिला नाही पण सारखं सारखं बघून राहवेना. ह्या विकांताला बनवायचा विचार करत आहे :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा