ग्रील्ड अॅपल अँड व्हेज सॅलॅड
साहित्यः
१ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी (तुम्ही हिरवा, पांढरा कुठलाही कोबी वापरु शकता, मी जांभळा वापरला आहे)
१ वाटी पातळ उभे चिरलेले गाजर
१ मोठ्या सफरचंदाचे पातळ स्लाईस
४-५ लाल मुळ्याचे पातळ स्लाईस
अगदी थोडासाच पातळ चिरलेला पांढरा कांदा
७-८ पुदीन्याची पाने
७-८ अक्रोड
लेमन ड्रेसींगसाठी साहित्यः
१ टेस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
मीठ चवीनुसार
ड्राईड हर्ब्स आवडीनुसार
पाकृ:
सफरचंदाच्या स्लाईसेस ना ग्रील पॅनवर दोन्ही बाजूने ग्रील करुन घ्या.
सॅलॅड ड्रेसींगचे सर्व साहित्य एकत्र करुन फेटून घ्या.
एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, कांदा, मुळा व पुदीना घालून एकत्र करा.
त्यावर तयार लेमन ड्रेसींग ओता व हलक्या हाताने एकत्र करा.
सॅलॅड तयार आहे :)
सर्व्ह करतेवेळी वरुन अक्रोड घाला व खायला सुरु करा हे पौष्टीक सॅलॅड :)
नोटः
ह्यात तुम्ही आवडत असेल तर लेट्युसची पाने, पालकाची पाने, Arugula ही घालू शकता.
आवडीप्रमाणे ह्यात बदाम, मनुके किंवा पाईन नट्स ही वापरु शकता.
लेमन ड्रेसींगऐवजी अॅपल साईडर व्हिनेगर, दालचिनीपूड आणी मधाचा ही वापरु शकता.
सॅलॅड तयार आहे :)
म