Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कोफ्ता करि....उपासाची

द
दिपक.कुवेत
Tue, 11/13/2012 - 08:34
Tayar Kofte Kofta Curry नमस्कार मंडळी, सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. हि दिवाळि सगळ्यांच्या सगळ्या ईच्छा / आकांक्षा सुफळ सपुर्ण करो. तर इतके दिवस मीपाचा नीयमीत वाचक होतो आणि इथे प्रकाशित होण्यार्या सर्व गोष्टींचा मनापासुन आनंद घेत होतो आणि राहिन. आता हा आनंद अजुन द्विगुणित करण्यासाठि मी सुरु केलेला हा छोटासा प्रयत्न. वाचताना काना, मात्रा, वेलांटया चुकलेल्या दिसतील...तेव्हा सांभाळुन घ्या. कोफ्ता करि....उपासाची साहित्यः १. कोफ्त्या साठि १. किसलेलं कच्च केळं - १ २. उकडलेला बटाटा - १ ३. कोथिंबिर, आलं, हिरवी मीरची पेस्ट - १ चमचा (पाणि न घालता वाटणे) ४. जीरं पुड - १/२ चमचा ५. राजगीरा / साबुदाणा पीठ - प्रत्येकि १ मोठा चमचा किंवा उपासाची भाजणी २ मोठे चमचे ६. चवीनुसार मीठ ७. ताक किंवा पाणि - गरजेप्रमाणे पीठ मळण्यासाठि ८. तळण्यासाठि तेल किंवा तुप २. ग्रेव्ही साठि: १. दाण्याचं कुट - २ मोठे चमचे २. ओलं खोबरं, कोथिंबिर, आलं, हिरवी मीरची पेस्ट - १/२ छोटि वाटि (मुलायम वाटुन घेणे) ३. तुप, जीरं - फोडणी साठि ४. चवीनुसार मीठ / साखर कृती: १. प्रथम एका मोठ्या बाउल मधे कोफ्त्यासाठि दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. गरजेप्रमाणे ताक किंवा पाणि घालुन गोळा मळावा. शक्यतो ताक / पाणि लागत नाही कारण केळ्याचा ओलसरपणा पुरतो. २. तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन मंद आचेवर तेलात किंवा तुपात तळावेत. कमी तेलकट / तुपकट करणयासाठि सानिका नि सांगीतल्याप्रमाणे आप्पे पात्राचा वापर करावा ३. आता ग्रेव्ही साठि एका कढईत तुप - जीर्याची फोडणी करावी ४. त्यात तयार केलेली पेस्ट (नंबर २ मधे दिलेली) टाकुन जरा वेळ परतावे ५. मग दाण्याचं कुट टाकुन पाणि घालावे. ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याच प्रमाण ठरवणे ६. चवीनुसार मीठ / साखर घालुन मंद आचेवर एक ५ मीनटं ग्रेव्ही उकळु द्यावी आणि गॅस बंद करावा ७. बाउल मधे तयार कोफ्ते ठेउन वरुन ग्रेव्ही घालावी गरमा गरम कोफ्ता करी वरी तांदुळाचा भात, वरुन साजुक तुपाची धार, लिंबाचं लोणचं आणि भाजलेला / तळलेला बटाट्याच्या पापडा सोबत सर्व करावी... टिपा: १. कोथिंबिरिमुळे ग्रेव्ही ला छान हिरवा रंग येतो पण माझ्या मते उपासाला कोथिंबिर वापरत नाही पण जर चालत असेल तर कोथिंबीर एवजी खायचा रंग घालु शकतो...जाणकारांनी प्रकाश टाकावा. २. केळि उकडुहि शकतो पण मळताना मीश्रण एकजीव होइल हे पहावे म्हणजे तळताना कोफ्ते फुटणार नाहित ३. दाण्याच्या कुटामुळे ग्रेव्ही लवकर आळु शकते म्हणुन गरज असल्यास वाढते वेळि थोडे पाणि घालुन ग्रेव्हि सारखि करावी ४. कोफ्ते अगदि आयत्या वेळेस घालावे म्हणजे त्याचा लगदा होणार नाही ५. नुसते कोफ्तेहि नारळाच्या चटणि सोबत छान लागतात चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5344 views

💬 प्रतिसाद
ज
जयवी Tue, 11/13/2012 - 10:54 नवीन
अरे वा..... पहिल्या पोस्टबद्दल अभिनंदन दीपक :) पाककृती एकदम झकास :) फोटो पण मस्तच आलेत. आता लिहिता रहा... :) शुद्धलेखनाचं मात्र बघ रे..... !!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/13/2012 - 15:10 नवीन
मिपावर स्वागत! नवीन आणि एकदम वेगळीच पाकृ. फोटोही सुरेख आलेत. असेच लिहीत रहा!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/13/2012 - 15:26 नवीन
अरे वा! वेगळी पाकृ.
  • Log in or register to post comments
प
प्रास Wed, 11/14/2012 - 06:07 नवीन
आयला, हे छान आहे की! करून बघायला हरकत नै. पण ठरल्याप्रमाणे नेहमीचा प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर नै, नै का? ;-) धागा वाचला. फोटो पाहिले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 11/14/2012 - 08:03 नवीन
जयश्रि, पैसातै, रेवती आज्जी आणि प्रास...सगळ्यांना धन्यवाद
  • Log in or register to post comments
N
neeta Wed, 11/14/2012 - 09:35 नवीन
सुंदर, करुन बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 11/14/2012 - 10:21 नवीन
असे पदार्थ असतील तर उपास करावेच लागतील.तेवढेच उपासाचे पुण्य!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/14/2012 - 11:15 नवीन
सोप्पी आणि मस्त पाकृ. बादवे. कोथिंवीर उपासाला चालते. खाण्याचा रंग कोथिंबिरीच्या चविची जागा घेउ शकत नाही. ५. नुसते कोफ्तेहि नारळाच्या चटणि सोबत छान लागतात. या टिपबद्दल धन्यु. परन्तु पाकृ वाचण्यापुर्वी फटु पाहील्यावरच हे डोक्यात आले होते.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 11/15/2012 - 21:28 नवीन
मिपाच्या पाकृ विभागात आपले स्वागत. ही नविन पाकृ करायला आणि खायला आवडेल. नविन पाकृच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sat, 11/17/2012 - 04:01 नवीन
अरे वा नविनच !!! http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 11/19/2012 - 06:17 नवीन
कोफ्ते भारीच पण आलं उपवासाला चालत का ? क्रुपया शंकानिरसन करावे
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 11/19/2012 - 07:08 नवीन
सगळ्या रसिक खवय्यांचे मनापासुन धन्यवाद. पियुशा...आलं उपवासाला चालत...म्हणजे घालु शकतेस :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा