Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

कोर्लई चा किल्ला आणि पोर्तुगीज (क्रिओल) भाषा....

स
संदीपसाठे
गुरुवार, 11/08/2012 - 11:15
💬 5
अलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला "नौ लिन्ग" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे. इ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही "क्रीओल" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे. या कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे. किल्ला हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून त्यावर एक दीपगृह आहे.किल्ल्यावरून रेवदंडा, अलिबाग परिसराचे व समुद्राचे विलोभनीय दर्शन होते.येत्या दिवाळीच्या सुट्टीत अलिबाग व मुरुड ट्रीप आखत असाल तर त्यात या कोर्लईच्या किल्ल्याचा अवश्य समावेश करा- पैसा वसूल !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3563 views

💬 प्रतिसाद
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/08/2012 - 11:18 नवीन
क्रिओलबद्दल अजून डीटेल्ड माहिती वाचायला आवडली असती, काही वाक्ये/शब्दांच्या माध्यमातून, असो. :)
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 11/08/2012 - 16:53 नवीन
हं.. शीर्षकात 'भाषा' शब्द वाचल्यावर जे आठवले ते अगदी दिसलेच इथे :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/08/2012 - 17:00 नवीन
या भाषेबद्दल मागेच सविस्तर वाचलं होतं. लिंक शोधतोय.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/08/2012 - 18:25 नवीन
पूर्वी मिपावरच एका प्रतिसादात सदर जमातीविषयी थोडेसे लिहिले होते. आता सापडत नाही! असो, माझी माहिती थोडी वेगळी आहे. ही मंडळी धर्मांतरीत नसून मूळचीच पोर्तुगीज होती. उत्तर कोकणातून पोर्तुगीज हटले आणि त्यांचा अन्य मूळ पोर्तुगीजांशी संपर्क राहिला नाही. तशातच मिश्र विवाहामुळे रक्तातील पोर्तुगीज अंशदेखिल पातळ होऊ लागला! आता ही मंडळी पूर्ण भारतीयच आहेत.
यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल" असे संबोधले जाते
क्रीऑल नावाची अशी कुठली एक भाषा नसते. दोन वा अधिक भाषांच्या मिश्रणातून बनलेल्या "सुधारीत" भाषेस क्रीऑल अशी संज्ञा आहे. (मिश्र "असुधारीत" भाषेस पिजिन अशी संज्ञा आहे) बाकी तो संपूर्ण पट्टा मनोहर आहे, यात शंका नाही!
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 11/08/2012 - 20:05 नवीन
मॉरिशस् मध्येही स्थानिक भाषा ही फ्रेंच च्या गडद प्रभावाखाली असलेली क्रिऑल आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा