Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मका बटाटा टोस्ट

N
neeta
Tue, 11/06/2012 - 09:35
साहित्य : चार ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे दोन, उकड्लेले मक्याचे दाणे अर्धीवाटी,१ सिमला मिरची बारीक चिरून, मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट १ चमचा, लिंबाचा रस थोडासा, १ चमचा बटर. एका कढईत थोडेसे बटर घेऊन वितळल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला, नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची , कुस्करलेले बटाटे, उकड्लेले मक्याचे दाणे, मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालून थोडे ढवळावे व खाली उतरवावे. मिश्रण गार करावे. ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याला बटर लावावे त्यावर हे मिश्रण घालावे त्यावर किसलेले चीझ घालावे व दुसरा ब्रेड्चा स्लाईस ठेवावा व टोस्टरमध्ये घालून टोस्ट करावा. टोमटो केचप बरोबर खायला द्यावा. ( हे टोस्ट पटकन होतात, मुलांना ड्ब्यात सुद्धा देता येतात. ही रेसीपी आधी केली असल्यामुळे फोटो देता आले नाहीत,पण जरुर करुन बघा)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5995 views

💬 प्रतिसाद
म
मेघना पूराणीक Tue, 11/06/2012 - 09:44 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 11/06/2012 - 10:04 नवीन
फोटो न लोडवता टाकलेली रेसेपी ही मेक-अप न केलेल्या हिरोइनसारखी वाटते ;) (ह्.घ्या.)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/06/2012 - 12:50 नवीन
+१ पाककृती विभागात नवोदितांकडून फोटू टाकायची परंपरा लुप्त होत चाल्लि आहे ..
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/06/2012 - 13:30 नवीन
+२. जेंव्हा पाकृ कराल तेंव्हा मिपावर द्या पण फटू हवाच. ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 11/06/2012 - 14:48 नवीन
काही नवोदित याला अपवाद आहेत हो. पा. क्रु. सोपी आणि मस्त वाटते आहे.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 11/15/2012 - 21:32 नवीन
चहाच्या वेळेचा आणखीन नवा पदार्थ. खुपच आवडला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा